परवाच लोकसभेच्या निवडणुका झाल्या देशाच्या हाजारो वर्षातील इतिहासाला वेगळी कलाटणी देऊन जन्माने ओबीसी असलेले नरेंद्र मोदी पंत प्रधान झाले. मोदी व त्याचा भाजपा त्या भाजपावरील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा अंकुश. तो अंकुश ठेवणारी जन्माने ब्राह्मण असलेली मंडळी. या मंडळींचा हजारो वर्षा पासुनचा लबाडीचा धंदा मी याच सदरात उघड केला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्या नंतर राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेस व कॉंग्रेस च्या शरद पवारांना बेंबिच्या देठा पाासून जे वाटते ते बाहेर पडू लागले. त्यांच्या या मराठा प्रेमा समोर दारूण पराभव होऊन सुद्धा ओबीसींचे तारणकर्ते म्हणुन मिरवणारे खरे कारण स्पष्ट जेंव्हा करताना दिसले नाहीत तेंव्हा ओबीसी एजंटांची किव करावी वाटली व पवारांच्या मराठा प्रेमाची कदर करावी वाटली म्हणुन हा पत्रप्रपंच.
ज्या समाजात जन्मलो त्या समाजासाठी धडपड करणे हा गुन्हा नव्हे तर त्याचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य पवार करित आहेत या बद्दल त्यांचे अभिनंदन ही करावे तेवढे थोडेच आहेत.ते ज्या गरिब मराठा समाजा विषयी आज बोलत आहेत ते गेली दहा बारा वर्ष आपले शिष्य बहेर सोडून वातावरण निर्माण करतील हे पहात होते. अगदी त्यांना सर्व प्रकारे सहकार्य ही मिळत गले हा योगायोग नव्हे तर ही एक पडद्या मागची हालचाल होती. ती त्यानी यशस्वी पणे पार पाडली त्याबद्दल काही मत नाही. मत या विषयी आहे ते जे म्हणतात की मराठ्यांना आरक्षण दिले नाही म्हणुन पराभव झाला. ही त्यांची लबाडी आहे ही लबाडी उघडी करण्याची हिंमत आज त्यांच्या बरोबर असलेल्या ओबीसींत जन्म घेतलेल्या दलांलाच्याकडे नाही. पवारांनी टाकलेल्या सत्तेच्या खुर्चीवरून पाय उतार होवू ही भिती तया सर्व ओबीसी दलालाकडे आहे म्हणुन आपण काही गोष्टी तपासून घेऊ.
मंडल आयोग स्थापन झाल्या नंतर त्याला पहिला प्रखर विरोध ब्राह्मण्य छावणीत झाला. तो स्थापन होताच या देशातील राजकारणाची केंद्रे बदलली. यातूनच भाजपाने कमंडल हाती घेऊन राममंदिर हे तुमच्या विकासाच्या मंडलपेक्षा श्रेष्ठ आहे हे स्पष्टपणे सिद्ध केले. मराठ्यांच्या चिरेबंदी वाड्यात कॉंग्रेसच्या रूपाने सत्ता सुखात नांदत होती तीला पहिला धक्का हा जनता पक्षाच्या रूपाने बसला यातूनच मंडल नेमताच तो नेमताच ब्राह्मण्यपणाने कमंडल बाहेर काढून तो मंजुर होताच मंडलला न्यायालयात बांधून टाकला. जो काय मुठभर मिळाला त्याला ही हिंदुत्व जपणारे बाळासाहेब ठाकरे विरोध करू लागताच भुजबळ साहेब शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडले. शिवसेनेच्या उभारणीच्या काळात भुजबळांनी कॉंग्रेस जी मराठ्यांच्या चिरबंदी वाड्यात सुखात नांदत होती तिला अक्षरश: खिळखिळे केले होते. परंतु हिंदुत्व निष्ठेच्या नावाखाली कोहिनुर ठरलेल्या ब्राह्मण्याला मोठे पण मिळू लागले तेंव्हा भुजबळ बाहेर पडले. पवारांनी मंडल राबवला सांगितले जाते पण हे खोेट आहे. केंद्राने मंजुर केला म्हणुन तो राबवू लागला. कारण पवार आपल्या हाताने स्थानिक स्वराज्य संस्थेतील मक्तेदारी संपवणारे नव्हते. कारण मुळात त्यांनी राष्ट्रवादी हा पक्ष स्थापन करताना किंवा पुलद आघाडी स्थापन करताना सर्वांचा केंद्र बिंदू मराठा हाच ठेवला आहे. त्यांची वाटचाल मुळात या बिंदूशी निगडीत आहे. आमचे ओबीसी नेते सत्ता दिसताच राष्ट्रवादी (मराठावादी) मध्ये सामील झाले. सत्तेत वाटा मिळाला पण समाज आहे तेथेच ठेवला नव्हे तर राज्याच्या मुख्यप्रवाहातू ओबीसी अलग पडू लागला.
संत तुकाराम स्वत:ला कुणबी समजत होते नव्हे तर मी जन्माने कुणबी आहे याचा त्यांना अभिमान होता. या उलट जातीय गर्व बाळगून वावरणार्या सांगत होते आरे बरे झाले मी कुणबी झालो नाही तर मी सुद्धा बसाच गर्वाने संपून गेलो असतो. खरा कुणबी व खोटा कुणबी ही आजची अस्तीत्वात असलेली एक समस्या आहे. या समस्येतून खरा कुणबी व खरा ओबीसी उध्वस्त झाला आहे. पवारांच्या जवळचे सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना विदर्भात जे पुर्वी कुणबी होते परंतू मराठा तितूका एक करून महाराष्ट्राची सत्ता मिळवणे व टिकवणे यासाठी बरेच कुणबी झटकून मराठा झाले. एका रात्रीत यांनी जात बदलली मंडल लागू होताच प्रथम मंडलला विरोध याच समुहातमन प्रखर झाला. आपले हिसकावून घेतले ही जाणीव त्यांना रस्त्यावर घेऊन गेली. तेथे ही काम होत नाही तेंव्हा अपणच कुणबी आहोत याची जाणीव झाली आणि सुशिल कुमार शिंदेच्या सहीने मराठा कुणबी ही नवी जात जन्माने घातली आणी विदर्भा पुरता असलेला हा प्रश्न महाराष्ट्रात धुमाकुळ घालू लागला.
पुणे, नगर ,सातारा, कोल्हापूर,सोलापुर हे जिल्हे बहुसंख्य मराठा वस्तीचे. इथे इतर समाजाला ग्रा. पं. सदस्य होणे म्हणजे आमदार होण्या सारखे त्यांच्या डोळ्या देखत तेली, माळी, नाभीक, सुतार आशा जाती सत्ेतत बसल्या तर त्यांना सहन होणार नाही इतक्या जात अभिमान नस नसात भरलेला. महाराष्ट्र शासन हे मराठा समाजाच्या ताब्यात यातून कोट्यावधी रूपयांचा निधी यांच्या साठी खर्च झाला. यातून आलेली श्रमंती गप्प बसू देणार नाही. गावच्या ग्रामपंचायत मध्ये गळ्यात किलोभर सोने मिरवणारी फौज निर्माणा झाली यात गुंड विचारांचा भरणा पहाता पहा झाला आशी ही सगळी फौज आपल्या पक्षाला एक निष्ठ राहिली. स्ज्ञनिक स्वराज्य संस्थेत आपन एक किंवा दोन नंबर वर नेहण्यास ही फौज फार उपयोगी पडली. कारण या फौजचा अमाप पैसा. या फौजेचा जात दांडगे पणा. या फौजेचा नात्याचा गोतावळा राष्ट्रवादी वरिष्ठ मंत्र्यांचा उघड पाठिंबा म्हणजे या फौजेची खरी शक्ती. या फौजेने काय करावे राष्ट्रवादी एक नंबर होण्यासाठी स्थानिक स्वराज्याच्या निवडणूकी दरम्यान कलेक्टर कचेरी समोर येरझार्या सुरू केल्या इथे एजंटांची दुकाने हुडकली पाच ते दहा लाखात कुणबी मराठा हे जात प्रमाणपत्र मिळवले. पैसा देऊन ही प्रमाणपत्र मिळत नसेलत तर त्या कलेक्टरला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मराठा मत्र्यांचा फोन येत आसे आगदी मुदत संपता संपता अशी प्रमाण पेत्रे मिळाली सुद्धा आहेत अशी प्रमाण पत्र घेऊन ही जात दांडगी यात बर्याच गुंडांचा ही समावेश बहुसंख्य आहे. ही मंडही निवडणूकीला उभी राहिली तेंव्हा त्यांच्या समोर तेली, माळी खरा कुणबी सुतार या जलाती दोन हात ही न करता घरात गप्प बसली पवार साहेब ही तुमच्या राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेसची वाटचाल यावर चिंतन आपण कोंलत ?
राज्य मागास वर्ग आयोगाच्या एका ओबीसी सदस्याला परवा मराठा कुणबी ह्या भानगडी विषयी विचारले तेंव्हा ते म्हणाले जे पुर्वी कुणबी होते त्यांच्या एैतिहासिक कागद पत्रात कुणबी हा उल्लेख आहे त्यांनाच फक्त सर्व पुराव्यानीशी सादर केल्या नंतर वैद्यता देणारी कमिटी पत्र देते. परंतु राष्ट्रवादी (मराठावादी ) व कॉंग्रेस यांच्या राजवटीत हजारो प्रमाण पत्र मिळवलीत त्याला कसल आलाय आधार ? तो आधार आहे यंत्रणत असलेला यांचा आधार व मोक्याच्या राष्ट्रवादी मधील एक डवरी समाजचे माझे मित्र आशाच मराठा उमेदवाराकडून सलग दोन वेळा पुणे महानगर पालीकेत पराभुत झाले. त्यांनी रितसर न्यायालयात लढाई सुरू केली. ना खिश्यात पैसा ना कुणाची सोबत. राष्ट्रवादी आपली मानून राबवणारा हा कार्यकर्ता त्याची समाजाची मते तो राष्ट्रवादी देतो. परंतू राष्ट्रवादी (मराठावादी) त्याला साधी सोबत ही करित नाही. कारण दुसर्या पक्षात असला तरी तो मराठाच आहे ही सुद्धा राष्ट्रवादी मधील नवी साठवण समोर येते राज्य मागास वर्ग आयोगाच्या सदस्यांना विचारणा केल्या नंतर त्यांनी न्यायलयीन लढा सुरू करा हा उपदेश सादर केला. या साठी प्रचंड पैसा आणावा कोठून आणि लढाई जिंकला तर राष्ट्रवादीच्या एकाही मराठा याचे काही होणार नाही. अडचणीत येतील अशी खोटी वैद्यता प्रमाण पत्र देणारी मोठ मोठे अधीकारी राष्ट्रवादीने जे सिंचन घोटाळ्यात केले ते इथे होणार.
सहकार ही कल्पना बहुजन हिताय बहुजन सुखाय आपल्या कॉंग्रेस संस्कृतीने मुळे रोवली व विकास साधू लागला नजर फिरताच ही सगळी चळवळ मराठा समाजाच्या हातात गेली. त्याद्वारे विकास इतका झाला की छटाकभर दुध गोळा करणारी सोसायटी हातातून जावू दिली नाही शासनाचा निधी अनेक उपक्रमाच्या नावाखाली इथे आनला विकास कुणाचा झाला. विकास झाला प्रस्थापित मराठ्यांचा विस्थापीत मराठे विस्थापीतच ठेवणार आपल्याच फौजेत सामील आहेत. साखर कारखान्याच्या निवडणूकीत मराठ्या विरूद्ध मराठा निवडणूक होत. कोट्यावधी रूपयाचा चुराडा करून चेअरमन व सदस्य निवडून येतात. विरोधात व सत्तेत हेच आसतात. संगनमताने गुंतवलेल्या पैशा पेक्षा अधीक पैसा वसुल केला जातो यातुन सहकारी संस्था दिवळखोरीत निघते. आसे दिवळे वाजलेल्या संस्था व साखर कारखाने कवडी मोलाने घेऊन प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष विकत घेऊन पुन्हा नफेखोर कोण ? सहकारी ही अवस्था तयार झाली. न्यायालयाच्या आदेशा नंतर सहकारी संस्थेतील सदस्यांची मर्यादा कमी झाली. ५२ टक्के ओबीसींनी एक जागा राखीव होती ती सुद्धा नष्ट करणारे कोण ? इथे ही तुम्हाला खरा ओबीसी नकोच आहे.
ना. भुजबळ साहेब लोकसभेत पडले त्याचे ना दु:ख ना आनंद आम्हा ओबीसी बांधवांना आहे. कारण ते ओबीसींचे नेते आहेत. महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष आहेत. सर्व ओबीसींच्या आशा आकांक्षा त्यांच्यावर आहेत हे सर्वांनाच माहित आहे. हे ओबीसी नेतृत्व त्यांच्या सोबत ना. जयदत्त क्षिरसागर, ना सुनिल तडकरे ही ओबीसी मंडळी आहेत. परंतु पवारांनी दिलेली खुर्ची त्यांना इतकी प्रिय आहे की त्या खुर्ची पुढे पवारांच्या राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेसने कलेले अत्याचार कसपटा समान आहेत. ही कल्पना या ओबीसी नेत्यांनी करून घेतलेली आहे. आपली राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेस स्थापन झाली तेंव्हा भुजबळ साहेब पहिले अध्यक्ष होते. सेना भाजपा सत्तेत होते या युतीला पळती भुई कमी होईल अशी अवस्था भुजबळांनी केली होती. क्षिरसागारांच्यामुळे बहुसंख्येचे असलेला तेली आपल्या जवळ आली. त्या विश्वासाच्या चिंध्या करणारे कोण ? ही राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेसच आहे ना. माळ्याला, तेल्याला, नाभीकाला मत देऊ नका. त्याच्या विरोधातील मराठ्यांना द्या सांगणारी निती महाराष्ट्रात रूजवणारे कोण ? मराठा मराठा आणि मराठाच निवडून यावा या साठी धडपडणारे कोण ?
ओबीसी विकास महामंडळाला हे तुमच्या वेळी निर्माण केले गेले नाही त्यामुळे याचे श्रेय आपल्या कडे जात नाही. पण गुंडगुळे करण्याचे श्रेय जरूर आपणाकडे जाते. ओबीसी विकास महामंडळ महाराष्ट्र शासनचे ओबीसी विकास व्हावी ही संकल्पना काय चालते या ठिकाणी या ठिकाणचा जिल्हा प्रमुख बदली होईल त्या ठिकाणी प्लॉट किंवा फॉल्ट खरेदी करतो. कोट्यावधी रूपयाचा निधी मधल्या मधे हाडप केला जातो. हा हडप करण्यासाठी आपण ओबीसी आहोत म्हणून कर्ज घेणार असाल तर किती जाचक अटी असाव्यात याला मर्यादा. अर्ज केल्या नंतर दोन तिन वर्षानेी कर्ज मंजुर त्या नंतर शासकीय जातीनदार त्या जामीनदाराच्या सक्षम अधीकार्याने लेखी द्यावे हे कर्ज कर्जदाराने दिले नाहीतर जामीनदाराकडून वसुलीची जबाबदारी घेईल. हेच ते राष्ट्रवादी मराठावादी कॉंग्रेसचे ओबीसीप्रेम. सहकार खात्याला मोजता येणार नाही इतका निधी देऊन ही त्या संस्था मोडीत काढल्या. इतर महामंडळांना सुलभ कर्ज आणि ओबीसी बांधव साठी वेगळा न्याय का ? आलेला निधी कर्ज रूपाने देताना ही खोट्या ओबीसींना प्रथम संधी कारण तो टक्केवारी देतो हि टक्केवारी अधीकारी मंडळींना स्थावर मालमत्ता करावयास उपयोगी येतो. कारण हे अधिकारी ही ओबीसी नाहीत. ओबीसींच्या पेकाटात या लाथाा आपण कमी आहेत म्हणून आपल्या राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेसने ओबीसींची लायकीच वेशीवर टांगली. आगदी चार दशका पुर्वी बारा बलुतेदार खादी ग्रामोउद्योग हे बुजगावणे उभे केले कोकणात संपत्ती ठेवली पण याच्या चाव्या तालुका ते राज्यपातळीवरच्या प्रमुखा जवळ हा प्रमुख कोण असावा तर जातीने मराठाच. आपवाद सुनिल पोटे सारखे असतील की जी मांडीखाली येऊ शकतील. म्हणजे कॉंग्रेस संस्कृती मधील आपल्या राष्ट्रवादी (मराठावदी) पक्षाने जे ओबीसींची आब्रु वेशीवर टांगली ती आपल्या परंपरेने प्रमाण मानुनच या विकास महामंडळाचे आध्यक्ष आज पर्यंत मा. बापूसाहेब भुजबळ, मा. कैलास कमोद होते. परंतु परवा ओबीसी विकास महामंडळाचे अध्यक्ष केलेत ते जैन समाजाचे ही आपली अनितीची वाटचाल या नंतरचा अध्यक्ष मराठाच असणार ही काळ्या दगडावरची रेष.
पवारांनी पराभवाची जी कारणे सांगीतली ती पहाताना त्यांची किव करावी वाटते. मराठा समाजाला आरक्षण नाही म्हणुन पराभव. आपल्या राष्ट्रवादी (मराठावादी ) मधील गावोगावच्या शहरो शहरातल्या किलोभर सोने घेऊन फिरणार्या मराठ्यांनी. आपल्या पक्षाची आमदारकी भोगणार्या ९६ कुळी मराठा आमदार सर्व घरच कुणबी करून नगरसेवक सुद्धा घरादाराला केले. ज्याच्या हातात पैसा ज्याच्या मनगाटात ताकद आसे गुंड ही आपण पोसले यांना ओबीसी करून आपण महाराष्ट्रात एक नंबर झाला होता. दया प्रस्थापीत मराठ्यांनी जसे ओबीसींना छळले तसेच स्वजातीय गरिबांना ही पोळले आहे. ही चिड आपणास दिसत नाही किंवा डोळे झाक करून मराठा आरक्षण ही धुळ फेक करून पुन्हा सत्तेवर येऊ पहात. आपण मराठवाडा विद्यापीठ नामांतर किंवा मंडल लागू करणारे मुख्यमंत्री हे रेय घेता आपणास जाणता राजा म्हंटले जाते. पण सत्य हे मराठा आरक्षणामुळे उघडे पडले . नाईकांचे उदाहरण दिले जाईल. ते स्वतच्या म्हणजे ओबीसींच्या ताकदीवर मुख्यमंत्री नव्हते तर होते कॉंग्रेसच्या ताकदीवर त्यामुळे ते राबले कॉंग्रेस साठी हा काळ जर सोडला तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी होऊ शकला नाही होऊ दिला नाही. तुमच्या पक्षाचा उपमुख्यमंत्री होते पण ते किती काळ व किती मोठ्या विरोधाला समोरे जाऊन हे ही पहा. आपली मुलगी कमी मताने निवडून आली त्याला कारण धनगर मग या समाजाला सवलत द्या. पण आपण आसे म्हणता का की या समाजाचे पाच दहा धनगर आमदार होऊन सत्तेत वाटेकरी करावेत आपल्या फौजेतील मंडळी गावचा सरपंच जिथे ओबीसी होऊ देत नाहीत टिकू देत नाहीत तेथे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपण ओबीसी कसे होऊ देणार. नरेंद्र मोदी यांचा धर्मवादी पक्ष. नरेंद्र मोंदीचे मुसलीम समाजाविषयी असलेली अमानवी वृत्ती, विकासाचा खोटा प्रार हे वादाचे मुद्दे आहेत. आणि या विरोधात ओबीसी सेवा संघ सातत्याने लढत आसतो. हा वादाचाविषय बाजूला ठेवून सांगावे लागते तुमच्या विरोधी पक्षाने जाणीव पुर्वक देशातील ५२ टक्के मतदार हा अतर्ंगत ओबीसी गट सक्रीहय केली यातुन मोदी सत्तेवर गेले हे सत्य का विसरता विरोधक धर्मवेडे जरूर आहेत. परंतू त्यांच्याच पक्षातून जास्त संख्येने ओबीसी आमदार खासदार जास्त निवडून येतात. व आजही आहेत. आपल्या राष्ट्रवादी (मराठावादी) मध्ये याउलट आहे. उलट तळातला ओबीसी आपल्या पासून दूर गेला यावरच चिंतन केले का ? त्यांची गरज ही वाटत नसणार कारण गावचा पाटील किंवा देशमुख फौजेत आसला की दांडगाईने मतदान होणार हि संकल्पना स्पष्ट होते परंतु ही दांडगाई संपवु शकतो हे मा. नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसीं सेवा संघ, महाराष्ट्र राज्य.