आरती संताजी चरणी ठेवितो माथा ।
संत तुकारामाची तुने तारीली गाथा ॥धृ.॥
जनम जनम ची पदरी होती भक्ती विठोबाजी,
रे संतु भक्ती विठोबाची ।
या जन्माला साथ मिळाली संत तुकोबाची ।
विठोबापंत धन्य जाहला तुझा जन्मदाता ।
आरती संताजी चरणी ॥1॥
चाकण ग्रामे जन्म घेतला, तुझाच अधिकार,
रे संतु तुझाच अधिकार ।
स्वरूप आपुले पाहून होती जनता भवपार ।
तुझ्या भक्तीने तुच झाला, नाथाचा नाथा ।
आरती संताजी चरणी ॥2॥
संत तुकारामच्या मेळ्यात मुख्य टाळकरी,
रे संतु मुख्य टाकळकरी ।
तुकारामाची गाथा तुने बुध्दीने केली ।
कंठाशी रे प्राण येती तुला आठविता ।
आरती संताजी चरणी ॥3॥
आध्यात्मिक मार्गाने जगा दाविले सुख,
रे संतु दाविले सुख ।
तीन मुठी मातीने तुझे लोपविले मुख ।
अफाट किर्ती केली तुने वैकुंठी जाता ।
आरती संताजी चरणी ॥4॥
मार्गशिर्ष वद्य तेरसला तुझी पुण्यतिथी,
रे संतु तुझी पुण्यतिथी ।
संतु या प्रेमळ नावाने तुला अळविती ।
अंतरभावे भक्ती करती तुझे ज्ञान गाता
आरती संताजी चरणी ॥5॥