विठोबापंत पिता, त्यांचा झाला ।
मथाबाईच्या पोटी, अंकूर वाढला ॥धृ॥
जो जो बाळा जोरे जो...
श्रावण महिना, शुद्ध पंचमीला ।
सोळाशे चोविस, साली जन्मला ॥1॥
जो जो बाळा जोरे जो...
पुणे जिल्हयातील, खेड तालुक्याला ।
चाकणं गावीला, जन्म झाला ॥2॥
जो जो बाळा जोरे जो...
बराव्या दिवशी, बारसे केले ।
मुलाचे नाव, संताजी ठेवले ॥3॥
जो जो बाळा जोरे जो...
लिहीता-वाचता, इतके शिकले ।
तुकारामाचे अभंग, लिहिले ॥4॥
जो जो बाळा जोरे जो...
पाच वर्षाचे, संताजी झाले ।
दुष्काळाचे दृष्य, डोळ्यांनी पाहिले ॥5॥
जो जो बाळा जोरे जो...
वयाच्या सोळाव्या वर्षाले ।
संत तुकारामाला भेटले ॥6॥
जो जो बाळा जोरे जो...
कर्तन प्रसंगी, असे सोबतीला ।
चौदा टाळकर्यात, प्रमुख झाला ॥7॥
जो जो बाळा जोरे जो...
तेलघाणीचा व्यवसाय केला ।
समाजाला ज्ञानाचा, धडा दिला ॥8॥
जो जो बाळा जोरे जो...
म्हणे पांडूरंग, भक्त गणाला ।
म्हणावा पाळणा जन्म दिनाला ॥9॥
जो जो बाळा जोरे जो...
- पांडूरंग भु. खोडे