संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सवाचे औचित्य साधुन तेली समाज मंडळ नवखळा. संताजी फाउंडेशन नवखळा नागभीड द्वारा संजय येरणे लिखित यमुना - संताजी जगनाडे महाराजांची सावली या जगात सर्व प्रथम साकार झालेल्या कादंबरी चे प्रकाशन मा. आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे हस्ते मा. शामरावजी सातपैसे यांचे अध्यक्षतेत संपन्न झाले.
यमुना संताजी महाराज यांच्या पत्नीचा शिवकालिन इतिहास सामाजिक स्त्री चरित्रमय दृष्टीने यामुळे सर्वप्रथम उपलब्ध झालेला आहे. ही साहित्यदृष्ट्या ऐतिहासिक नोंद दखल घ्यायला भाग पाडणारी आहे असे विचार आमदार महोदयांनी केले. यापुर्वीही लेखकाने संताजी जगनाडे एक योद्धा ही कादंबरी जगात सर्वप्रथम साकार करण्याचा मान मिळविला असून चारोळी कवितेवर समिक्षा हा महाराष्ट्रात सर्वप्रथम ग्रंथ त्यांचेच लेखनितुन सिद्ध झाला आहे. कथा. कादंबरी शैक्षणिक कविता समिक्षा असे सतरा ग्रंथ प्रकाशित असून अनेक पुस्तके सन्मानप्राप्त झालेत. ही साहित्यातील भरीव कामगीरी होय.
प्रकाशन प्रसंगी मा. उमाजी हिरे न,प. अध्यक्ष. मा. गणेश तर्वेकर न.प. उपाध्यक्ष. मा. डाँ. श्रीकृष्ण देव्हारे. मा. वसंतभाऊ वारजुकर. मा. डाँ. श्वेता राखडे. मा. मुखपृष्टकार बंसी कोठेवार. साहित्यिक पुनाराम निकुरे. व समाज कार्यकारिणी प्रमुख यांच्या उपस्थितमध्ये यमुनाच्या तैलचित्राचे अनावरणही सर्वप्रथम करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे यंगीस्तान व समाजमंडळीने अथक परिश्रम घेत साकार करीत नवी नोंद घ्यायला भाग पाडली.