झुंझरकं व श्री संत संताजी
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
काळी कुट्ट रात्र
सुर्य अस्ताला पोहचला
जसा भरवस्तीत माणसाळेलेल्या रस्तयावर
सत्याला उलट टांगावे आणी असत्यालाच
सत्य म्हणा म्हणून आदेश येतो तसा सुर्य गर्भगळीत
काळ्या रात्री अबाधीत राज्य करू लागले अतीरेकी
त्या दिवसाची संताजी तुमची वाट
तेली गल्लीतली मटकून बसलेली माणस
तोंडच बघायच नाही हा आदेश दिलेला
म्हणून तोंड दाखवायचे नाही
गावच्या देवाला तेल मागण्याचा हाक्क
पण अंधारातल्या देवाला उजेडात
आणनारी तेली गल्लीतले घाणा चालवणारी
तशी सर्वजन
इथल्या वस्तीने तडीपार कलेलेी
ही माणस जगत होती
जागवत होती पोटच्या लेकरांना
हे जळवांचे विश्व कधी संपेल
ही सात कप्यात कोरलेली अक्षर
तशीच धुळीला सोबत देऊन
शेकडो वर्ष त्या जागेवर होती
देवच बंदिस्त केलेला
स्वत:ला देवाचा बाप
म्हणवणार्या अतीरेक्यांनी
हे अतीरेकी कोल्हला सुद्धा शरमंदा करतिल
कोल्हा त्यांच्या कडे बघत बघत
तो मनात झुरायचा
अरे आपल्या पेक्षा शेकडो पअ लबाड
ही देवाला मुठीत ठेवणारी ही पिल्लावळ
कोल्हा त्यांना पाहून लाजून गेला
त्याने त्यांच्याकडून शिकतो म्ह्ंटले
पण त्याच्या ही आवाक्या बाहेर
राजवट मुसलीम
पण त्यांच्या दरबारात यांचाच वट
येथून हुकूम घ्यावा
संचलन करावे
शिट्टीच्या आवाजात ढोलांच्या तालात
कवायत करावी पोरांनी
जर चुकलाच तर
कानाखाली जाळ
असा जाळ नको म्हणून गावचा मोकाशी
हुकमत गाजवत गावभर फिरायचा
त्याच्या मुठीत गाव
मोकाशी पाटील देवाच्या बापाच्या मुठीत
एवढेच नव्हेतर
देवही यांच्याच मुठीत धर्माचे ठेकेदार म्हणून
हे धर्माचे ठेकेदार म्हणून
मुसलीम सत्तेचे हे वाहन कर्ते
संताजीचा जन्म झाला तेंव्हा
तेली गल्लीतील तमाम घाणेकरी मंडळी
पाटलाच्या व देवाच्या मुठीत होती
जगाव त्यांनी सांगेल तसे
मरावे त्यांनी सांगेल तसे
अक्षर गिरवू नये
पैसा साठवू नये
घाण्याच्या बैलाला तरी कुठे अक्षर येते
त्याला कुठे वैरण साठवण्याचा हाक्क
फक्त डोळ्याला झापड बांधताच
चालायच थांबा म्हणले तो पर्यंत
किती साध सुध काम
त्या बैलाला ही दिले
व घाणा घेणार्याला दिले
हाक्क नाहीत
मागणी मुळीच नाही
आशा माणसात संताजी जन्मले
गावात चक्रधर मंदिर
मंदिरा शेजारी देवाचे बाप म्हणवीणार्या
अतिरेकी वस्ती
याच वस्तीत
घरात देवाच्या बापाची परंपरा
परंपरा कसली तर मिताक्षरी पेक्षा
आपण सोडून शुद्र व्हावेत
ही शुद्र कमलाकर नजर
अशा अतिरेकी छावणीत
संताजी लहानपणी वावरत होते
प्रश्न एकच ---- ?
सुतार आळी, माळी आळी, नाभीक आळी
शिंप्याची घरे, कुंभार आळी आशी
सर्व बलुती, आलुती,
चांभार वाडा, म्हार वाडा, मांग आळी
अशी मटकून बसून जगणारी
माझ्या तेली आळी सारखी
भळभळणारी जखम
त्या जखमेला बरे करणे देवाचे काम
पण तो देवाचा बाप म्हणवीणारा
उलट गिधाडाचे रूप घेऊन
लचके तोडतोय
चाकणचा संताजी ही वेदना घेऊन
घाणवडीत वाढत होते.
याच घानवडीत सुर सापडला
देवळीत ठेवलेली नामदेव गाथा वाचत
नामदेव मनात बसू लागला
अशीच गिधडे समाजाचे लचके तोडताना
या माणसाने
सुतार, तेली, न्हावी, सोनार, माळी, गुरव
कुंभार म्हार यांना एकत्र केले
केले काय ?
तर ही देवाचे बाप म्हणून
लचके तोडणार्या गिधाडांची टोळी
लुळी पांगळी केली
पण याच टोळीने नामदेव कोपर्यात
व आपल्याला हवे तसे रचले.
आणी गिधडांच्या टोळ्या बनवल्या
यातील काही मुसलीम सत्तेत
आपल्या पोरी देऊन मुसलीमांचे सोयरे बनले
हे सोयरे पण कवटाळून अतिरेकी पणालाच धर्म ठरविला
असल्या अतीरेक्यांना नामदेवाने वेचून वेचून
ठेचून काढले
इथ संतांजींना जीवाचा धागा सापडला
आपण यांना लोळवू शकतो
आपण यांना हिसका दाखवू शकतो
हे गुपीत सापडले
उगवता सुर्याला नमस्कार करून
सुर्याच्या उन्हात वावरतात
पण संताजींनी आखा सुर्यच घेतला डोक्यावर
आणी कुरतड जगणार्या घरा घरात
ते घेऊन गेले
यारे या सर्व या
देवाच्या बापांना वठणीवर आणावयास या
पण...
इथे ही उंबर्या आडचा आक्रोश
अचिंबीत होत होता
हा कोण तर चाकणचा तेली
म्हणजे आपलाच माणुस
हा आपला माणूस सुर्य घेऊन
वावरतोय
पण ----
ही देवाचे बाप म्हणून मिरवणारे
गावचे मोकाशी पण मिरवणारे
पाटील---
यांच्याशी पंगा ?
संताजी सह देहूचे तुकाराम
आता रणसंग्राम उभा राहिला
याच रणसंग्रामात देवाच्या बापांनी
अतिरेकी पणा प्रतिष्ठा केला
पण विचाराचा पक्का पणा
त्यांच्या अतिरेकी पणालाच ढासळू लागला
अतिरेक्यांचे शेकडों वर्षांचे डोंगर डळमळू लागले.
त्यांचे देवाचे बापपण ---
वस्त्रहिन होऊ लागलो
आलुती बलुती दलित
सगळी कारू नारू मंडळी
पाटलाच्या मुठीत
पाटील देवाच्या बापाच्या नजरेत
साक्षात देव देवाच्या बापाच्या मुठीत
याच मंडळींनी आपल्या पुर्वजांची पुस्तके हुउकली
आगदी त्यांचा भूसा केला
जेंव्हा भुसा झाला तेंव्हा मात्र
त्यांनी वाघोलीच्या धर्मपीठा कडे धाव घेतली
न्यायधीश देवाचा बाप
आरोप करणारे देवाचा बाप
आरोपी शुद्र
या गदारोळात एकच तांडव
एक तेली
एक कुणबी
यांना अधीकार शुन्य
आम्ही देव निर्माण करतो
आगदी गरज असेल तो देव
तो ही देव आमच्या गरजे पुरता
जेंव्हा ती संपते तेंव्हा ---
दुसरा निर्माण करतो.
तेंव्हा आम्ही कोण तर
देवाचे बाप
बापाचे डोंगर कोसळणारे हे कोण
या धर्मावर आमचा अधीकार
तो मोउणारा तुकाराम कुणबी
तो संभाळणारा संतु तेली
कर्ता म्हणुन गुन्हेगार तुकाराम
मानवतेलाच सुळावर चढविले
महा भयंकर वादळ उमटले
हे ठरवून होते
या वादळात तुकोबा संपणार
या वादळात संताजी संपणार
आगदी देवाच्या बपांना दिलेले अव्हान
या चक्री वादळाने भुईसपाट होणार
पण या देवाच्या बपांना ही कळले नाही
कळले फक्त पंढरपूराच्या विठोबाला
आरे ही टोळ धाड उध्वस्त करणारा
चाकणाचाच संताजी उभा रहाणार
त्या अंधारात काजवा ही नव्हता
डोळ्यात बोट घालून बुबळे काढलेला माणूस
जसा असतो तशी निर्माण झालेली रात्र
आता ही मध्यरात्र ढळणार नाही.
जे झुझरूक म्हणतो --
म्हणजे अंधार संपून माणसाला माणूस दिसतात
आणी पहाता पहात सुर्य उगवावा
ते होणारच नाही
देवाच्या बापांचा हा आदेश
प्रत्यक्ष देवाला ही मोडता येत नव्हता
आणी
परंतू
पंढरीच्या विठोबाला हात जोडून
चाकणच्या संताजीने कागद व लेखनी घेतली
लेखनी तुन तोंडपाठ अंभग उतरवले
उतरवेलेले अभंग काखोटीला बांधुन
देहू परिसर पिंजून काढला
गावो गावच्या माणसांना सांगीतले
अरे...
घाबरू नका या देवाच्या बापांना उध्वस्त
करण्याची ताकद तुकोबांनी दिली
ती दिली म्हणून अभंग पाण्यात बुडवले
पण त्यांचे अभंग माझ्याकडे
तो अधीकार आपण सर्वांचा
हा सुर्य त्यांनी लपवलाय
तो पुन्हा ढगातून बाहेर काढावयास चला
बघता बघता मटकून बसलेली माणस
ताठ उभी राहिली
आणी
तेराव्या
दिवशी
देहूत देहूकरासह इंद्रायणी कडे निघाली
चाकणच्या संताजीने अभंगाचा सुर्य
आपल्या डोक्यावर घेतला
वाटेत आलेले देवाचे बाप
त्या तेजाने
होरपळले
उध्वस्त होऊ लागले
संताजींने ते अभंग तुकोबा समोर ठेवले
तेरा दिवस उपवास करणारे संत तुकाराम
सावध झाले
चाकणच्या संताजी तेल्याने हे केले
परिवर्तनाचे चाक
परिवर्तनाचा घाना फिरवला
देवाच्या बापांचा कायदा
देवाच्या बापांचा न्याय
देवाच्या बापांची दहशद
देवाच्या बापांचा अतिरेकीपणा
पायदळी तुडवला
संत नामदेवा नंतर
एक जबरदस्त अव्हान
तुकोबांनी दिले
पण शेवटचा वरमी तडाका
संताजींनी लोक समुहातुन दिला
देवांच्या बापांना उध्वस्त करणारा
महा मानव
शेकडो वर्षानी भेटला
स्वत: साठी तयार केलेली धर्मशास्त्रे
उपडी तर पडलीच
उलट पोरकी झाली
पुन्हा शेकडो वर्ष बेवारास केली
मध्यरात्रीला ढकलून
झुुंझरूक
आणनारा
महामानव
संताजी