यंदाच्या सुदूंबरे येथील श्री संताजी महाराज जगनाडे तेली पुण्यतिथी महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. सुलोचना सुभाष करडिले आहेत. त्यांचा जन्म कोतुळ ता. अकोले, जि. अहमदनगर येथे झाला त्यांचे वडील कै. दामोधर जयराम काळे हे नगर जिल्ह्यातील धाडसी आणि कर्तबगार व्यापारी होते. तसेच ते नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजीक कार्यकर्ते होते. सौ. सुलोचना करडिले यांचा विवाह पुण्यातील श्री. सुभाष शंकरराव करडीले यांचेशी 1976 रोजी झाला. त्यांचे सासरे मामा उर्फ शंकरराव भाऊशेठ करडिले हे सुद्धा तेली समाजात लोकप्रिय समाज कार्यकर्ते होते. त्यांना मुलामुलींची विवाह जमविण्याचा छंद होता. त्यांचे मेव्हणे कै. शंकरराव नानासाहेब कर्पे, कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे यांनी कै. रघुनाथशेठ प्रधान तसेच कै. रावसाहेब केदारी यांचे समवेत श्री क्षेत्र संताजी महाराज जगनाडे तेली यांचे सुदुंबरे येथे मंदिराचा जिर्णोद्धार करून संस्था स्थापन केली. आज तिचे वटवृक्षांत रूपांतर झालेले आहे. अशा सर्व पार्श्वभुमिवर सौ. सुलोचना सुभाष करडिले यांनी सुदुंबरे येथे रथ ठेवण्यासाठी जागा नव्हती. तेथे 500 स्क्वेअर फू. आर. सी.सी. मध्ये रथस्थान बांधून दिले आहे. तसेच यावर्षी श्री संताजी महाराज पुण्यतिथी चा महाप्रसादाचा भार उचलून फार मोठे सहकार्य केलेल आहे. तसेच विविध वधु-वर मेळाव्यात सहभाग घेऊन सामाजिक कार्यरित असतात. या त्यांचे सामजिक कार्यामध्ये परमेश्वर उदंड यश आणि दिर्घायुष्य लाभो.