प्रिय समाजबांधव व भक्तगण, बंधू-भगिणी, सर्वांना माझा आदरपूर्वक, स्नेह नमस्कार
तेली समाजाचे आदरस्थान व श्रध्दास्थान म्हणजे संतश्रेष्ठ संत संताजी महाराज जगनाडे यांचे समाधी स्थळ सुदूबरे हे होय.
सालाबाद प्रमाणे या वर्षी ही हा सोहळा 16 डिसेंबर 2017 ला मार्गशीर्ष कृष्ण (व) त्रयोदशी, शनिवार या दिवशी श्री श्रेत्र सुदूंबर येथे संपन्न होत असताना मोठा आनंद होत आहे.
अशा या श्री श्रेत्र सुदूबरे येथे होणारा श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधी सोहळा उत्सव अशा उत्सवाच्या दिवशी उत्सव उद्घाटक म्हणून माझी निवड करून जो काही समाज बांधवांनी माझा सन्मान केला आहे. त्याबद्दल सर्व समाज बांधवांची मी शतशः आभार मानते.
श्री संत संताजी महाराज यांच्या कृपार्शीवादाने व आपल्या सर्व समाज बांधवाच्या सहकार्याने या वर्षीचं उत्सव, अध्यक्ष व उत्सव उद्घाटक म्हणून दोन्हीही ठिकाणी महिलांची निवड केली. आम्हा महिलांचा जो काही सन्मान दिला त्याबद्दल मी संपूर्ण तेली समाज बांधवाचे मनःपूर्वक आभार मानते.
आपल्या श्री संताजी महाराजांचा हवा तसा प्रचार होताना दिसत नाही. आळंदी व देहू नंतर 4-5 कि.मी. वर असलेले आपले सुदुंबरे गाव लोकांच्या परिचयाचे नाही यासाठी आपल्याला इतर समाजालाही या क्षेत्राकडे वळविले पाहिजे, पण काही वेळा असेही दिसून येते की आपल्याच तेली समाजाला सुदूंबरे कुठे आहे हे माहित नाही किंवा माहित आहे परंतू केव्हाच आले नाहीत. काही समाज बांधव वर्षातून एकदातरी येतात, तर काही मुलांमुलीची लग्न जवळ आली तरच सुदूंबरे किंवा वधू-वर मेळाव्यात येतात. म्हणून यांना समाज ओळखत नाही. व मुलांची लग्ने जमविणे अवघड होऊन बसते.
तसेच आपल्या सुदूंबरे क्षेत्राला, पर्यटनाचा दर्जा मिळालेला आहे. परंतू रहाण्याचा व इतर सोई नसल्यामुळे पर्यटक या क्षेत्राकडे येण्यास तयार नाही. त्यासाठी विकास होणे फार महत्त्वाचे आहे. शासनाचा पाठपुरावा चालुच आहे. या विकासासाठी मोठ्या निधीची गरज आहे. समाजाचे आपण काहीतरी ऋणी आहोत ही भावना प्रत्येकाने मनात ठेवली पाहिजे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तिनी पुढे येऊन या विकासाला चालना दिली पाहिजे. मंदिराभोवतालचा परिसर सुसज्ज व सजावट असेल तर बर्याच भाविक भक्तांचे व पर्यटकांचे पाय या सुदूंबरे क्षेत्राकडे वळात्याशिवाय रहाणारी नाही.
तसेच आपली श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदूंबरे ही संस्था प्रत्येक वर्षी येणार्या मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशीला सोहळ्याच्या दिवशी वधू-वर मेळावाही घेतला जातो. तसेच जमलेल्या लग्नांचाही लग्नसोहळा या प्रांगणात पार पडतो. तसेच गुणवत्त विद्यार्थांना गुणगौरव व शिष्यवृत्तीही मिळत असल्याने अनेक विद्यार्थाना स्फूर्ती मिळते.
आज आपल्या समाजाला दानशूर व्यक्तिची खुप गरज आहे. किंवा ज्याला खरोखरच सामाजिक तळमळ आहे की, आपल्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे अशा व्यक्तिंनी पुढे आले पाहिजे. श्री संताजी महाराज महाराज जगनाडे सुदूंबरे या क्षेत्रास विकास कसा होईल याकडे लक्ष केंद्रित केले पहिजे.
या रे या रे सारे जण । अवघे धरू सुपंथ ॥
इवलेसे रोप लावियेले द्वारी । त्याचा वेलू गेला गगणावरी ॥
सुदूंबरे संस्थेमध्ये माझ्या माहेरचे त्रयोदशीला जेवण असते. श्री. लक्ष्मण शंकर उबाळे यांचे तसेच श्री. रामचंद्र शंकर उबाळे यांची पालखीसोबत गाडी असते. व वाल्हे येथे वारकर्यासाठी जेवण असते. तसेच माझे 2 नंबर चुलते श्री. धर्मराज शंकर उबाळे हे खेड ता. (राजगुरूनगर) येथिल वाडा गावात शेती समाज अध्यक्ष आहे. व माझे भाऊ कै. ज्ञानेश्वर व श्री. सुनिल हे ही समाज कार्यरत आहे.
उत्सव उद्घाटक सौ. विमलाताई सतीशशेठ वाव्हळ.