इतिहासकार श्री. वा. सी. बेंद्रे यांनी संताजींसंबंधी बरेच अक्षेप घेणारे लिखाण गेल्या पांसचहा वर्षीत प्रसिद्ध केले आहे. या लिखाणाकडे श्री. कृ. ना. वैरागी यांचे प्रथम लक्ष गेले. अडतिसाव्या संताजी उत्सवाचे वेळी श्री. दा. र. वैरागी यांनी संस्थेंचें लक्ष या लिखाणाकडे वेधलें. संस्थेेचे जनरल सभेंत या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी सहाजणांची समिती नेमली. या समितीने तळेगांव येथील श्री. मनोहरपंत जगनाडे यांच्या कृपेनें वह्यांची पहाणी केली, इतर कागदपत्रे पाहिले. व हा अहवाल तयार करण्याचे कार्य श्री. दा. र. वैरागी यांजवर सोपविले या कामीं श्री ल. भा. दहितुले मुंबई यांनी त्यांना आवश्यक ती पुस्तकें देऊन बरेच सहाय्य केले. त्याबद्दल समिती त्यांचे ऋण व्यक्त करीत आहे. यातील माहिती श्री. बेंद्रे यांच्या पुस्तकांतून उपलब्ध झाली आहे. रावसाहेब शं.रा. पन्हाळेे, अध्यक्ष संताजी उत्सव मंडळ यांनी मनावर घेतल्यामुळे हा अहवाल मज बांधवांस छापून विनामूल्य देण्यात येत आहे. इतिहासंत दडलेलीं अनेक सत्यें अजून प्रकाशात यावयाची आहेत. ती जसजशी अवगत होतील तशी प्रसिद्ध करण्यांत यावी अशी समितीची इच्छा आहे.
श्री. ल. भा. दहितुले यांच्या सहकार्यानें हा उत्तरात्मक अहवाल छापून वेळेवर समाजबांधवांच्या हाती पडत आहे. याबद्दल श्री दहितुले यांचे मानावेत तेवढे आभार थोडेच आहेत.