इतिहासकार श्री. बा. सी. बेंद्रे हे संतशिरोमणी तुकाराम महाराजांचे चरित्र लेखन करण्यांत सध्यां गुतले आहेत. तुकारामाच्या अभंगासंबंधीहि संशोधन चालू आहे. हे चरित्र तयार होत असतां, तुकारामाविषयी कांही समजुती, काही भ्रामक कल्पना, कांही अनैतिहासिक प्रसंगही वर्णिले आहेत अशी स्वत:ची समजूत करून घेऊन श्री. बेंद्रे यांनी तुकाराम महाराजांचे निमळ स्वरूप जनतेपुढें ठेवण्याचें सत्कर्म करण्याचें कंकण हातीं बांधले आहे. त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे हे कोणीही कबूल करील. त्यांच्या कार्यात त्यांना सुयश लाभो अशी आमचीही इच्छा आहे. पण संशोधन करीत असतां तर्कावर विंसबून रहाणे कितपत योग्य होईल ? संशोधन म्हणजे काहीतरी हरवलें आहे, लुप्त झालें आहे तें शोधून काढावयाचें आहे. अशी आमंची समजूत आहे. जें आहे तें नाही म्हणून पटवून देणें हे संशोधन नसून तर्कशास्त्राची किमया आहे असें म्हणावें लागेल. अशाच स्वरूपाचे तर्क व अनुमानें यांची रेलचेल हें इतिहास संशोधन होईल का ?
तुकाराम महाराजांचे अभंग लेखक संताजी तेली जगनाडे चाकणकर यांच्या संबंधी “संतसांगाती” या पुस्तकांत श्री. बेंद्रे यांनी अशाच स्वरूपाच्या तर्कावर आधारलेली आक्षेपार्ह विधानें केली आहेत. उपलब्ध कागदी पुराव्यांचा अगर समकालीन उल्लेखांचा आक्षेपार्ह विधानें केलीं आहेत. उपलब्ध कागदी पुराव्यांचा अगर समकालीन उल्लेखांचा आधार घेऊन प्रकाशांत न आलेलीं अगर कालाच्या ओघांत लुप्त झालेलीं सत्यें प्रकाशांत आणण्याचें कार्य संशोधकानें केल्यास बुद्धीवादी त्याचा निसंदिग्ध स्वीकार करतील. निराधार अथवा भ्रामक समजुतीच्या वेष्टनात गुरफटलेले अथवा द्दष्टीआड झालेले प्रसंग, किंवा व्यक्ति नवीन उपलब्ध झालेल्या कागदी पुराव्यांच्या आधारें उतेडांत आणण्याचें कार्य करणें अगत्याचें आहे हें खरें. पण संशोधनकार्य चालूं असतां अनैतिहासिक तर्क अगर विधानें संशोधक करूं लागले तर तें गळीं उतरणें अस्वाभाविक आहे. अस्वाभाविक अनुमानांचा आधार घेऊन कांही निष्पन्न होईल हें समजणें चूक आहे.
अंधश्रद्धा ठेवून एखाद्या संताचें महात्म्य धोक्यांत आलें म्हणून हाकाटी पिटणें व्यर्थ आहे या विचारांशी कोणीही सहमत होईल; पण अंधश्रद्धा उध्वस्त करतांना निर्णायक स्वरूपाचे भक्कम पुरवे सादर करावे लागतात. उपलब्ध पुराव्यांतील वैगुण्ये अथवा अनुल्लेखित अनुमानाचा आधार घेऊन विलक्षण गैरसमज निर्माण करण्यानें अंधश्रद्धा तर नामशेष होणार नाहींच पण नवीनच वैचारिक गोंधळ मात्र होण्याचा धोका पत्करावा लागेल. असा धोका पत्करणार्याबद्दल शेवटीं असं म्हणावें लागेल की तर्कशास्त्राचा आधार घेऊन संशोधकाला सोयिस्कर हवी ती किमया करतां येईल.
संतशिरोमणी तुकाराम महाराजांचे सहाध्यायी व अभंगलेखक संताजी तेली जगनाडे चाकणकर यांचे संपूर्ण चरित्र कागदोपत्रीं पुराव्यांच्या अभावी अवगत नाही. खेड तालुक्यांत चाकण येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नांव विठोबा व आईचें नांव मथाबाई ही चाकणपासून जवळच असलेल्या सुदुंबरे येथील काळे घराण्यांतील, संताजीची पत्नी यमुनाबाई खेड येथील खेडकरांकडील संताजीला बाळोजी नांवाचा पुत्र होता. संताजी तुकाराम महाराजांची किर्ती ऐकून त्यांच्या सन्निध गेले व तेथेंच त्यांनी तुकोबांच्या अभंग लेखनांचे कार्य केले. हे अभंग ज्या वह्यांतून उपलब्ध झाले त्या “जगनाडी वह्या” या नावांनें प्रसिद्ध आहेत. तुकोबांच्या अभंगांचा फार मोठा संग्रह या वह्यांतून सापडला आहे, व या आधारावरून तुकोबांच्या अभंगाचे गाथे तयार करण्यांत आले आहेत.
इतिहासकार श्री. बेंद्रे यांनी तुकारामाच्या चरित्रासंबंधी व अभंगासंबंधी संशोधन कार्य सुरू केलें आहे. आपलें संशोधन अंशत: ते मधून मधून प्रकाशित करीत आहेत. “मंत्रगीता” या त्यांच्या गंथासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेंत संताजी तेली जगनाडे यांच्या संबंधी त्यांनी कांही आक्षेप घेतले आहेत. पुढें चित्रमय जगततून 1955 च्या अंकांत एक स्वतंत्र लेख लिहून “जगनाडी वह्यां” च्या अस्सलपणाबद्दल शंका घेतली आहे आणि याच लेखाचा आधार घेऊन कांहीशा विस्तारांने “तुकाराम महाराजांचे संत सांगती” या पुस्तकांत संताजीच्या समकालीन अस्तित्वाबद्दल संशय व्यक्त केला आहे. त्यांनी तीन टप्प्यांनी मुख्यत: तीन वेगवेगळे आक्षेप घेतले आहेत. “मंत्र गीतें” तील प्रस्तावनेंत संताजी हे तुकारामाच्या काळीं, किंवा तुकारामाला समकालीन नव्हते. हा त्यांचा पहिला आक्षेप. जगनाडी वह्या ह्या संताजीच्या हातच्या नव्हेत व त्यांतील संताच्या सह्या व तिथीचा उल्लेख हा गोंधळांत टाकणारा आहे हा दुसरा आक्षेप त्यांनी चित्रमय जगत जून 1955 च्या अंकात प्रतिपादिला. आणि शेवटी तुकारामाशी लेखक या नात्याने संबंध असलेली “संताजी” ही व्यक्ति नसावी तर करवीर क्षेत्रीं (कोल्हापुर) कोणी एक संताजी या नांवाची व्यक्ति होऊन गेली. व सुदुंबरे येथे जें वृंदावन आज अस्तित्वांत आहे तें त्या संताजीचें असावें असा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला आहे.
तुकाराम स्वत: अभंग लिहीत असत हें श्री. बेंद्रे यांचे म्हणणे आहे; त्यांना गंगाराम मवाळ अथवा संताजी तेली हे लेखक नव्हते; या दोन्ही व्यक्ति इ. 1700 नंतरच्या असाव्यात; त्यांचा तुकारामाशी संबंध येण्याइतका समकालीन पुरावा नाहीं; या लेखकद्वयाचा उल्लेख फक्त गोपाळबाबांनी आणि महिपतीबाबांनी केला आहे; तें सर्व असत्य आहे. व हरदासी कीर्तनांतील पुराणकथा आहेत, त्यांचा इतर कोठेही उल्लेख नाहीं; तसेंच तुकोबांच्या अभंगांच्या असस्लपणाची ग्वाही देणार्या “जगनाडी वह्या” त्यांतील स्वाक्षर्या, स्थळ काळाचा उल्लेख हें सारें बनावट आहे; तुकोबांच्या सान्नीध असलेले रामेश्वर भट वाघोलीकर अथवा चक्षुवैंरात्यं माहिती देणारी बहिणाबाई सीऊरकर यांच्या काव्यांत संताजींचा उल्लेख नाहीं; कचेश्वर ब्रह्मे यासही त्याच्याच गांवचा संताजी ठाऊक नव्हता वगैरे अक्षेप त्यांनी घेतले आहेत.
वास्तविक संताजींचे अस्तित्व व त्यांचे तुकारामाशीं सानिध्य दाखवितांना जगनाडी वह्यांचेंच खरें सहाय्य होतें. तोच एक ऐतिहासिक भक्कम पुरावा आहे. इतर पुरावे कालचक्राच्या फेर्यांत एकतर अद्दश्य झाले असतील अथवा प्रकाशांत यावयाचे राहिले असतील. जें नाहीं त्याचा आधार घेणें अशास्त्रीय होईल म्हणून जे आहे ते खोटे आहे हे सिद्ध करावें लागतें व तें सिद्ध करतांना तर्कावर अथवा अनुमानांवर अधिक विसंबून रहाण्यापेक्षा पुराव्यांवर निष्कर्ष आधारणें उचित ठरेल. तर्कावर आधारलेले निष्कर्ष हे जर संशोधकांचें साध्य असेल तर त्यांनी वापरलेल्या साधनांच्या सत्यासत्यतेबद्दल उहापोह करण्याचें कारण उतर नाही. अर्थात इतिहासकाराचे ते साधय नसावें असें गृहीत धरूनच चर्चा करणें अगत्याचें आहे.
संताजीच्या वह्या तळेगांव मुक्कामीं व सुदुंबरे येथे आहेत. त्या वह्यांत तुकारामांचे मूळ अभंग आहेत. या वह्यांच्या आधारावरून श्री. भावे यांनी तुकारामाचे अभंग छापले. या वह्ययांचा उल्लेख “भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे” यांनी आपल्या षण्मासिक अहवालांत (इ.स. 1913) म. म.दत्तो वामन पोतदार यांनी केला आहे. त्यापूर्वी या वह्या तुकारामचे चरित्रकार पांगारकर यांनी पाहिल्या व त्यांचा उल्लेख त्यांनी त्या काळच्या केसरीत केला. पांगारकारांनी तुकाराम चरित्र ग्रंथांच्या प्रस्तावनेंत म्हटलें आहे. “...... संताजी व त्याचा पुत्र बाळाजी यांच्या हातच्या वह्या पाहिल्या. त्यांत तीन ठिकाणी “हस्ताअक्षर संताजी तेली जगनाडे” असे लेख पाहून मला आनंद झाला.....संताजींच्या एका लेखात श. 1568 दिला असून दुसर्या लेखाचा शक 1610 आहे. यावरून संताजी तुकोबाच्या पश्चात चाळीस वर्षे तरी हयात होता हेंही उघड झालें...... या गाथ्यांत (तुकाराम बोवांचा अस्सल गाथा ले. भावे) छापलेले अभंग संताजींचे असस्ल आहेत व शुद्ध लेखन मात्र तुकोबांच्या वेळचें पण संतांजींचे आहे हें लक्षात ठेवलें पाहिजे. तुकोबांचे अध्ययन किती उच्च दर्जेचे होतें हे पुढें येणारच आहे. संताजींच्या शिक्षणाच्या मानानें यांत शुद्धाशुद्धे आली आहेत.... देहूस.... मुख्य घरांत तुकोबांच्या हाताचे लिखित म्हणून एक जुनी वही फारच जपून ठेविली आहे. ती मोठ्या प्रयासानें मला पहावयास मिळाली. तींत तुकोबांचे 225 अभंग आहेत. लिखाण निसंशय तुकोबांच्या वेळचे व संताजीच्या वहीसारखेच आहे. मात्र लिखित अधिक शुद्ध व व्यवस्थित आहे.”
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या षण्मासिक वृत्तांत (इ. 1913) इतिहासकार दत्तो वामन पोतदार म्हणतात., “वहींत संताजीचे जेवढे म्हणून लिखाण आहे त्यावर दर नूतन कवनाचे प्रारंभी “वीठळ” अशी अक्षरें असून शिवाय त्रिशुळाची खुण डोक्यावर केलेली हटकून आढळते. अर्थांत ही दोन्ही जिथे नाहींत व अक्षर अक्षरशाई वगैरे सर्वच भिन्न आहे तें सर्व निभ्रांत अन्य लिखित ....”
या वह्यांच्या अस्सलपणाबद्दल व लेखकांबद्दल व तिथि कलाबद्दल पांगारकर व दत्तो वामन पोतदार यांना संशय नाहीं.
“चित्रमय जगत” जून 1955 च्या अंकात श्री. बेंद्रे यांनी या वह्यासंबंधी जे आक्षेप घेतले आहेत त्यांचा सारांश असा आज उपलब्ध असलेल्या एकूण चार वह्या आहेत. पहिल्या वहीत पदनामी विश्वनाथाचा अभंग तुकोबांच्या अभंगांच्या क्रमांत मध्यंतरी आला आहे. हस्ताक्षर एकाच वळणांचे आहे. तसेंच या वहींत इतर आरत्या आहेत; इतर संतांचे अभंग आहेत. म्हणून ही वही संताजींच्या हातची मूळ नसली पाहिजे. मूळ वहीची ती नक्कल असावी. दुसर्या वहीत तीन किठाणी संतांजींच्या हातच्या स्वाक्षर्या आहेत. दोन ठिकाणी स्वाक्षरीखाली मिति शक व स्थळ दिले आहे. पण शकांचा क्रम अभंगाच्य क्रमांत व पृष्ठांच्या क्रमात मागेपुढे आला. दिलेंं आहे. (पृ. 164 - “सके 1610 विभनाम संवछरे पौष वदी 30 अमावश्या वार शुकुरवा ” (11 जानेवारी 1689 इ.) व पृष्ठठ 184 “सके 1568 पार्थिवनाम सवछरे अस्वीन सुध पूर्णिमा”) या दुसर्या वहीत पुढें कांही ठिकाणी तुकारामानंतर आलेल्या संतांच्या - बहिणाबाईंचा पुत्र विठोबा व पदनामी विश्वनाथ यांच्या- उक्ती आहेत. इतर कांही आरत्याही आहेत. म्हणून व वहीचा लेखनकाल इ. 1700 नंतरचा असला पाहिजे.
हा निष्कर्ष पटण्यासारखा आहे असें वरवर पहातां दिसून येईल. पण वस्तुस्थिती मात्र तशी नाही. दुसरी वही प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तें अनुमान खरें नसावें असें दिसून येतें. या वहींत एकच हस्ताक्षर नाही. म.म. दत्तो वामन पोतदार यांनी निर्देश केल्याप्रमाणे ज्या अभंगावर “वीठळ” असे शब्द असून त्रिशुळाची खूण आहे ते अभंग फक्त संताजीच्या हातचे असले पाहिजेत. विशिष:त ज्या तीन ठिकाणी संताजींच्या हातच्या सह्या आहेत त्या तीनही ठिकाणी “वीठळ” अक्षरें व त्रिशुळाची खूण आहे. तुकारामाच्या नंतर संताजीने अभंग केव्हां व कसे लिहिले असा एक प्रश्न उपस्थित होतो. पृष्ठक्रमांक आणि मिती यांच्या मागेपुढें झालेला क्रम पहातां असा समज होण्याची शक्यता आहे. ही दुसरी वही मूळ टिपणांची सहीनसही नक्कल असावी. पांगारकर म्हणतात त्याप्रमाणे अभंगांच्या टिपणांचा लेखनकाल 1568 श. असला पाहिजे. मूळ टिपणांची वहींत नोंद करतांना जेंव्हा जसे साधले तसे लिहून काढले. म्हणूनच नंतरच्या संताचे (बहिणाबाईचा मुलगा विठोबा) काव्या त्यांत घातलें असावें. वहींत कांही कोर्या सोडलेल्या जागी संताजीचा पुत्र बाळाजी यांनेही काहीं आरत्या अथवा इतर संताचे काव्य त्यांत लिहिलें असावें. तें कसेंही असो. पण या वहीतील पृ. 184 वरील “हस्ताक्षर संतु तेली कसबे चाकण सके 1568 पार्थिवनाम सवछरे अस्वीन शुद्ध पूर्णिमा ते दिवशी समाप्त” या लिखणांतील मिती शके व स्थान इत्यादींच्या स्पष्ट उल्लेखावरून संताजींनीं अभगांचे लिखाण तुकोबांच्या हयातींतच केलें असलें पाहिजे उल्लेखांवरून संताजी हा तुकारामाच्या काळांत झाला नसावा असा निष्कर्ष काढणें चूक ठरेल.
तिसरी वही संताजींचा पुत्र बाळोजी याची आहे. या वहीत पहिल्या दोन वह्यांत नसलेल्या तुकारामाचे कांही अभंग आहेत. या वहींतही वेगवेगळ्या आरत्या आहेत. पृ. 163 वर खालीलप्रमाणे शेरा आहे.
“हस्ताक्षर बाळोजी तेली जगनाडे, कसबे चाकण हे वही बाळोजी तेली याची. “हरहर महादेव” शिवसंभू नमस्ते ॥छ॥ सके 1653 वीरोधीनाम संवछरे शवन सुद पंचमी वार बुधवार ते दिशी समाप्त ॥”
ही मिती म्हणजे ता. 28 जुलै 1731. संताजींच्या हस्ताक्षराखाली असलेली मिती सं. 1610 म्हणजे 11 जानेवारी 1689 यावरून बाळोजींने संताजींनंतर बेचाळीस वर्षोंनी ही वही लिहिली असली पाहिजे. बाळोजीच्या वहींत तुकोबांचे नवीन अभंग कोठून आले ? त्याचा अर्थ असा कीं संताजींची आणखी एखादी मूळ वही असावी व त्यावरून बाळोजीनें हे अभंग घेतले असावेत. मात्र ही मूळ वही आज उपलब्ध नाहीं. बाळोजींच्या वहीतींल हस्ताक्षर वेगळे आहे. श्री. बेंद्रे म्हणतात त्या प्रमाणे संताजींच्या पहिल दोन वह्यांतील अक्षरांसारखे एकाच व्यक्तींनें लिहिलेले खास नाहीं. वहीचा आकार पहिल्या दोन वह्यांपेक्षा मोठा आहे व अक्षर कांहीसे तिरपें आहे. या तिथीवरून बाळोजीचा जन्म श. 1610 पूर्वींचा असावा व बहिणाबाई सिऊरकरांचा मुलगा विठोबा यापेक्षां तो बराच लहान असावा. विठोबानें केलेल्या तुकोबांच्या आरतीच्या संताजींच्या वहींतील उपस्थितीचा बोध होता. संताजीचा अंत:काल श. 1610 नंतरचा असला पाहिजे. बाळोजीनें उल्लेखिलेल्या मितीवरून काळाचा मागोवा घेतला तर संताजींच्या हस्ताक्षरांखालील दोन शकांच्या काळात संताजींनें प्रपंचात पदार्पण करून संसारमग्न झाले असले पाहिजे हें सिद्ध होतें. श. 1568 हा तुकारामाच्या निर्याणापूर्वीचा काळ आहे. यावरून संताजी तुकोबांच्या कालांत तर होतेच पण शिवाय तुकोबांच्या सन्नीध असून अभंग लेखन करण्याइतकी प्रौढबुद्धि त्यात असली पाहिजे.
हा काल निश्चित करण्यास आणखी कागदपत्र उपलब्ध आहेत. पुणे जमाव पेशवे दप्तर-चाकण रूमाल नं. 1369 ते 1374 जगनाडे संबंधींची माहिती या जुन्या कागदपत्रांवरून मिळते. त्यांत संताजी जगनाडा - 1646 व 1689 इ. व बाळोजी जगनाडा 1732 व 1733 इ. असा काळाचा उल्लेख सांपडतो. त्या काळाच्या पद्धती प्रमाणें संताजीच्या नांवापुढे त्यांच्या वडिलांचे नांव नाही. तसेंच बाळोजीच्या नांवापुढेंही त्यांच्या वडिलांचें नांव नाही म्हणून श्री. बेंद्रे म्हणतात त्या संबंधात काहीच अनुमान काढतां येणार नाहीं. संताजीच्या हस्ताक्षरा खालील मिती शके व स्थळ आणि बाळोजीच्या हस्ताक्षराखालील शके व स्थळ ही या सालाशी अगदी संपूर्ण जुळलीं आहेत. त्यावरून चाकण रूमालांत उल्लेखिलेला संताजी हा जगनाडी वह्यांचा कर्ता संताजी होय हें कोणी हि निर्णयक सांगू शकेल. संताजीची वंशावळ उपलअब्ध आहे त्यावरून श्री. बेंद्रे यांचा ग्रह चुकीचा आहे हें दिसून येईल. या वंशावळी संबंधानें चर्चा पुढें विस्तारानें केली आहे. चाकण रूमालांतील उल्लेखावरून संताजी चाकण येथें वहिवाट करून असला पाहिजे व तो काळ इ. 1646-1689 असला पाहिजे.
मग देहूस तुकारामाचा व त्यांचा संबंध केव्हा व कसा असेल असा प्रश्न उदभवतो. त्यांचे निराकण सहज करतां येईल. चाकण व देहू यांतील अंतर सुमारे दहा मैल आहे. देहू पासून इंदुरी सहा मैल आहे. त्या काळात चाकण व इंदुरी येथे व्यापारी पेठा होत्या. त्यामुळे बैलगाड्यांची घोडेस्वरांची वाहतुक सतत चालू असे. चाकणहून देहूस कांही काळ मुक्काम करणें शक्य होते. तुकोबांच्या किर्तनांस गांवांतील जवळपासच्या गावांतील अनेक भक्त उपस्थित असत. देहू पासून जवळच असलेल्या भामचंद्राच्या डोंगरावर एकांत स्थळीं अथवा भंडारा डोंगरावर तुकोबा जात तेथेंही त्यांची काहीं भक्त मंडळी उपस्थित असे. ही दोन्ही स्थळें चाकणच्या अगदीं समीपच्या परिसरांत आहेत. देहूस तुकोबा कीर्तन करीत असता ते मग्न होऊन जात, बेहोष होत. अशावेळी तुकोबांच्या काव्यप्रतिभेला बहर येई. त्यांच्या मुखांतून सहजगत्या अभंग रूपानें काव्य पंक्ती बाहेर येत त्यांची नोंद संताजी अगर गंगाराम मवाळा करून घेत असले पाहिजेत. देहूस कीर्तन चालू असतां कीर्तनाच्या भरांत तुकोबा स्वत: अभंगांचे लेखन करीत असणें असंभवनीय आहे. तसेंच एकांतवासात असतां जी निकटवर्ती मंडळी तेथे उपस्थित असत त्यांत संताजीहि असले पाहिजेत. व ते कांही अभंगाची टाचणे तेथे करून घेत असले पाहिजेत. प्रत्येक वेळी वेळी काखोटीला मारून संताजी त्या वहीत अभंग उतरून घेत असेल हे संभावत नाही. कीर्तनांत आरत्या म्हणण्याचा प्रघात पुर्वीपासून आहे. जगनाडी वह्यांतून ज्या काही आरत्यांचे उल्लेख आले. आहेत त्याची कारणपरंपरा येथे सांपडते व त्यांची उपस्थिती समर्थनीय ठरते. हीच टाचणें पुढे केव्हांतरी चाकण मुक्कामी सवडींने संताजींनें वहींत उतरून घेतलीं असलीं पाहिजेत. त्यामुळे मुळ टांचणे लिहितांना काहीं अभंग अपूर्ण राहिले आहेत व ते जसेच्या तसे वह्यांत लिहिले गेले आहेत. हे अभंग स्वत: पुर्ण न करण्यांत संताजीने थोरपणा दाखविला आहे. वह्यांतील अभंगाची भाषा अशुद्ध आहे कारण कै. पांगारकर म्हणतात, त्याप्रमाणें संताजींचें लिखाणच मुळांत अशुद्ध आहे या अशुद्ध लेखनामुळे मूळ अभंग कर्त्यास बाधा येत असल्याची भीति जर कुणास वाटत असेल तर ती व्यर्थ आहे.
दुसर्या वहींत पृ. 35 वरील “संही हस्त अक्षर संताजी तेली जगनाडे....” पृ. 164 वरील “... हस्त अक्षर संताजी तेली जगनाडे....” व पृ. 184 वरील “हस्त अक्षर संतु तेली....” या तीन वेगवेगळ्या प्रसंगी केलेल्या सह्यांत, पहिल्या दोन प्रसंगी “संताजी तेली जगनाडे” असें लिहिलें आहे तर तिसर्या प्रसंगी “संतु तेली” असे लिहिले आहे व तेंहि “सज” लिहलेलें खोडल्यानंतर. पहिल्या सहींत तिथी, वार व शके नाहीं, वशेवटच्या प्रसंगी वार नाहीं त्यामुळे काळ निर्णयाचें साधन नाहीं. म्हणून पृ. 164 वरील “शके 1568 हा कालचा उल्लेख चुकीचा आहे असे अनुमान श्री. बेंद्रे यांनी सुचविलें आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शके 1627 (21 सप्टेंबर 1705 शुक्रवार)” असला पाहिजे. कागदपत्रीं पुराव्यांवरील सनांचा उल्लेख डावलून संताजी तुकोबांच्या समकालीन नव्हते हें पूर्वगृहित अनुमान सिद्ध करण्यासाठी सोयिस्कर साल शोधून काढणें आणि असल्या अनैतिहासिक निष्कर्षांच्या समर्थनासाठी सहीची खाडाखोड, अमुक ठिकाणी “जगणाडे ” लिहिलें तमुक ठिकाणी लिहिलें नाही, कोठें वार लिहिला कोठे लिहिला नाही असल्या अव्यवहार्य व क्षुल्लक कुतर्कीची भुतावळ उभी करण्याने काय साध्य होईल. ? अशुद्ध लेखन करणार्या संताजींने स्वाक्षरी लिहितांना “त” च्या ऐवजी “ज” चुकून लिहिणें व नंतर खोडणे शक्य आहे. शिवाय कुणा इतिहास संशोधकाच्या हाती ती वही पडेल असा धोरणी हिशोब लेखकानें ठेवला नसावा ! शके 1568 हा काळाचा उल्लेख चुकीचा आहे हें दाखविण्याचे मुख्य कारण म्हणजे हाच शके तुकोबांचे संताजीशी समिलिनत्व व सानिध्य दाखवितो. ही सही खोडून दुसरें कोणी तरी लिहिली हे दाखविण्याचें प्रयोजनसुद्धां हेंच आहे की ही वहीच मुळीं बनावट आहे. पूर्वग्रह दूषित अनुमानाच्या समर्थनार्थ चाललेली ही केविलवाणी धडपड आहे असेच म्हणावें लागेल. दत्तो वामन पोतदार म्हणतात त्याप्रमाणे दर नूतन अभंगाच्या माथ्यावर “विठळ” ही अक्षरें आहेत व शेजारीं त्रिशुळाची खुण आहे. हे जिथें नाही ते अन्य लिखित हाच निर्णय बरोबर आहे. श्री. बेंद्रे यांनी काढलेला निष्कर्ष अनैतिहासिक व चूक आहे. पेशवे दप्तरांतील चाकण रूमालांतल्या कागदोपत्रांत उल्लेखिलेला संताजी याच्यापुढेंहि त्यांच्या वडिलांचे नांव नाही. व जगनाडी वह्यांत सही केलेला संताजी यांच्या पुढंही वडिलांचे नांव नाही. तरीसुद्धा ते एकच होत कारण दोन्ही शके समान आहेत, काळ समान आहे व स्थल ही समान आहेत. त्याचप्रमाणे बाळाजीच्या वहींतील काळाचा व स्थळाचा उल्लेख आणि चाकण रूमालांतील काळाच्या स्थळाचा उल्लेख समान आहे. बाळोजीनेंही आपल्या सहीपुढे वडिलांचे नांव लिहिलें नाही हे लक्षांत घेतलें पाहिजे. म्हणुन बाळोजी हा संजाींचा मुलगा नव्हे हा निष्कर्ष काढणें कमालीचे व धाडसाचे ठरेल, सारांश जगनाडी वह्याापैकी दुसर्या वहींतील तुकोबांचे अभंग संताजींच्या हातचे आहेत व महिपतीबाब म्हणतात त्याप्रमाणे तुकोबांच्या समीप त्यांतील काही अभगांचे, विशेषत: 1568 शके पुर्वीचे व त्याकाळचें लेखन केलेले आहे.
संताजी चा उल्लेख गोपाळबाबानें तुकोबांच्या निसर्रण प्रसंगी हजर असलेल्या मंडळीत केला आहे. “दुसरा लेखक भाविकपूर्ण । संताजी जगनाडा त्यांचे अभिमान । तो जातीचा तेली त्यासी नामनाणें देवूनि । तुक्यांने तोषविला ॥” भक्तलीलामृत्तांत महिपतीबाबानें संताजीचा व गंगाराम मवळाचा उल्लेख एकत्रित केला आहे. अध्याय 33, “कीर्तन करिता वैष्णव जन । तुक्याची धृपदी होते कोण । त्यांची ऐका नामा भिघाने । प्रेम जयाचेनी दुणावे ॥ गंगाधर मवाळ सचार । कडुसांत होता द्विजवर। तो तुक्यांचा लेखक निरंतर । प्रासादिक उत्तर लिहितसे ॥ दुसरा संताजी तेली जाण । उपनांव जगनाडे या कारणें । चाकणांत होता बहुदिन । तुक्यासी शरण मग आता ॥” गोपाळबाबा व महिपतीबाबा यांच्या लेखनांतील सत्य श्री. बेंद्रे यांना मान्य नाही. त्यांच्या मतें ही हरिदासी कीर्तन आहेत व संपूर्ण असत्याने भरलेलीं आहेत. हे दोघेही संत प्रत्यक्ष तुकोबांच्या वेळी हजर नव्हते, नंतर झाले आहेत व त्यांनी भक्तिविजयांत आणि भक्त लीलामृतांत भरमसाठ काही तरी लिहून ठेविलें आहे. महिपतींनें आणखी एक प्रसंगी संताजींचा उल्लेख रामेश्वर भटाबरोबर केला आहे. वारकरी मंडळी पंढपुरास जात असतां तुकोबांनी पंढरपूरच्या विठोबास पत्र दिलें “पत्र घेऊन आले कोण । परिसा त्यांची अभिधानें । रामेश्वर थोर ब्राम्हण । जो अनन्या शरण तुक्यासी ॥ गंगाधर मवाळ कडुसकर । आणि संताजी तेली वैश्णव वीर । आणिक असती फार। रामेर्वर भटाबरोबर असलेला आणखी एक उल्लेख महिपतींनें केला आहे. तुकोबांच्या निर्याणसमयीं हजर असणार्या आणखी एक उल्लेख महिपतींने केला आहे. तुकोबांच्या निर्याणसमयीं हजर आसणार्या पुढे उल्लेख आहे, गंगाराम मवाळ आहे व “ संताजी तेली जगनाड्या देख । जो तुक्यासी होता लेखक । नऊजण वैष्णव होते आणीक । जयांनी सदविवेक जगविला ॥” श्री. बेंद्रे यांच्या मतें रामेश्वर भट तुकारामाच्या प्रयाणकाळीं समीप होते व रामेश्वरांनी ज्या मंडळींना तेंथ बोलविलें त्यांत संताजी नव्हता. महिपतीहनें संताजींचा व रामेश्वर भटाचा उल्लेख एकत्र केला आहे हा कांही महिपतींना स्वप्नसाक्षात्कार झाला नव्हता. गोपाळबाबानें संताजींचा केलेला उल्लेख हे असत्य आहे हे मानणें धाडसाचेंच होईल. गोपाळबाबा तर तुकोबांचा नातू होता. त्यामुळें देहूच्या परिसरात घडलेल्या घटनांचा वृत्तांत वंशपरंपरागत गोपाळबाबांना अवगत झाला असला पाहिजे. गोपाळबाबा असत्य हें ऐतिहासिक सिद्धांताच्या कसोटीवर कसे उतरेल ?
संताजीच्या नांवावर कांही घाण्याचे अभंग आहेत. ते संताजीचे नव्हेत हे श्री बेंद्रे यांचे म्हणणें आम्ही मान्य करतो. आमच्या प्रमाणे ते अभंग ओतुरास कर्डिले नांवाच्या कुणा गृहस्थाने केले असावेत. संताजी हा कांही संत नव्हता. आणि तो संत होता असा आमचाही दावा नाही. तुकारामाचा सहअध्यायी व भक्त मंडळीतील एक होता. तुकारामासारख्या थोर संताच्या अभंगवाणीचे त्यांच्या समीप बसून लेखन करण्याचें व ज्यांवर तुकोबांचे प्रेम होते हे भाग्य ज्यांना लाभलें अशांपैकी तो होता. तुकोबांच्या आद्वितीय मोठेपणाला संताजीच्या अस्तित्त्वानें अगर लेखन कार्यांनें कसलाच बाध येत नाहीं. कोणातरी मोठ्या संताला कोणीतरी लेखक असालाच पाहिजे असा भा्रमक समजहि निर्माण होत नाही. संताजींच्या मूठमातीसंबंधी पाहिजे असा भ्रामक समजहि त्यामुळे निर्माण होत नाही. संताजींच्या मूठमातीसंबंधी जी कथा आहे तिलाहि इतिहासाचा अगर शक्याशक्यतेचा आधार नाही. ही कथा कीर्तनप्रसंगी हरिदासी आख्यानासाठी चमत्कार दर्शनासाठी केली असावी. श्री. बेंद्रे यांच्या या मताशी आम्ही निसंकोच सहमत आहोंत. या कल्पनेचा जन्म केंव्हा व कोठें झाला हें सांगणे मात्र तितकेंच कठीण आहे.
बहिणाबाई सिऊरकर या कांही काळ तुकोबांच्या संगतींत होत्या. त्यांनी तुकोबासंबंधी कांही काव्य लिहिलें आहे. तुकोबासंबंधी चक्षुर्वैसत्यं माहिती सांगणारी ही एकच साक्षीदार आहे. तिच्या काव्यांत संताजीचा उल्लेख नाहीं. म्हणून संताजी किंवा गंगाराम मवाळ हे तुकोबांचे लेखक नव्हते असा निष्कर्ष श्री. बेंद्रे यांनी काढला आहे. या विधानाला त्यांनी आधार दिला आहे. तो बहिणाबाईंच्या एका अभंगाचा. बाईंचा तुकोबांच्या सहवासांतला काळ फक्त काही महिन्यांचा आहे. बाईंना तुकोबांच्या दर्शनाचा ध्यास लागला होता. ही मंडळी देहूस आल्यावर मध्यंतरी कांही काळ लोटला. एक दिवस रत्नभटाबरोबर ही मंडळी मंबाजीकडे आश्रयार्थ गेली. बाईंना तुकोबाच्या दर्शनाचा ध्यास होता ही माहिती मंबाजीस असल्यामुळे तो त्यांना मारावयास धांवला म्हणून ही मंडळी तुकोबांच्या देऊळवाड्यास गेली. तुकोबांनी रहावयास त्यांना आपली आनंद ओवरी दिली. बाई म्हणतात कोंडाजीपंतानें “वृत्तांत पुशिला कोठुनी आलात ? चालतासा पंथ कवण कार्या ॥5॥ कांही नाही तया सांगितले पूर्व । म्हणे रहा सर्व पर्वणासी ॥6॥ सोमवार आहे अमावास्या पुढें (आषाढ शके 1570 = 10-7-1648) रहा भक्ति कोंडें सुख घ्यावे ॥7॥ नित हरिकथा होतसे देऊळी । तुकोबा माऊली वैश्णवाची ॥8॥ रहा येथे तुम्हा भक्षावयां धान्य । देऊं हेंची पुण्य आम्हां घडे ॥9॥ बहिणी म्हणे मग राहिलो देहूस । घरूनि हव्यास तुकोबांचा ॥10॥ ” म्हणजे तुकोबांच्या समीप भक्तिसुखाचा सहवास बाईंना गरोदर होत्या व दिवस पूर्ण होत आले होते. त्यामुळें तशा स्थितीत त्या सतत तुकोबांच्या भक्त मडळींत वेळीअवेळीं वावरत असतील हे कमी संभवते किंबहुना सगळ्याच मंडळींचे व प्रसंगांचे सुक्ष्म निरीक्षण करणे तिला कितपत जमलें असेल. आणि प्रत्येक गोष्टीची तडकाफडकी नोंद करणे हे शक्य झाले असेल का ? अर्थीत हें सारें तिनें फुरसतीनें लिहीलें आहे व कांही गोष्टींची नोंद करणे हे शक्य झाले असेल कां ? अर्थींत हें सारें तिनें फुरसतीनें लिहींलें आहे व कांही गोष्टींची नोंद राहून गेली आहे. बांईंना काव्याचे वरदान तुकोबांच्या निर्वाणानंतर तुकोबांनीच स्वप्नांत दिले असे बाई स्वत:च सांगतात. बहिणाबाई व तुकोबांच्या काळच्या चक्षुवैंसत्यं साक्षिदार आहेत. असा श्री. बेंद्रे यांचा दावा आहे, पण तुकोबाच्या निर्यााणसमयीचा उल्लेख तिच्या ज्या काव्यपंक्तीत आला आहे ते तिचें स्वत:चे काव्य नव्हें. तर नंतर तिचा मुलगा विठोबा यानें तें हरदासी कथा असलेलें काव्य घुसडलें आहे असें तेच सुचवितात. मनाशी अगोदरच ठरवून ठेवलेला निर्णय सिद्ध करण्यासाठी सोयिस्कर हवी तीं अनुमानाने काढणें योग्य होईल कां ? बाईंनी लिहिलेल्या प्रत्येक अभंगाच्या शेवटीं ‘बहिणा म्हणे’ असें कर्त्यांचें नांव आहे. तें विठोबानें लिहिलें असें मानलें तर तो काळ श. 1610 च्या आसपासचा असेल. अथवा बहिणाबाईंच्या नांवे सांगितले जाणारे बरेच अभंग विठोबाच्या कल्पनेंतून उतरले असतील. म्हणुन हा ‘चक्षुवैंसत्यं पुरावा’ आहे असा डांगोरा पिटण्यांत सत्याचा सोयिस्कर विपर्यांस होईल. बहिणाबाईंचें स्वत:चे असे फारच थोडें काव्य उपलब्ध असावें. बरेंचसें अजून प्रकाशांत यावयाचें आहे. बाईंच्या अभंगांचा गाथा छापला आहे. हा मूळ बाईच्या हस्तलिखितांवरून छापला आहे की तिचा पुत्र विठोबा यांने संकलीत केलल्या अभंगांवरून छापला आहे हे समजणें कठीण आहे. या छापील गाथ्यांत पृ. 130 वर पुढील अभंग दिला आहे.
“कळो आले तुझें जिणें । देवा तूं माझें पोषण ॥1॥
आठविता नांव रूपा । सदा निर्गुणीचा लपा ॥2॥
वाट पाहे आटव्याची । सत्ता नुरेचि मुळीची ॥3॥
बहिणी म्हणे परदेशी । येथे आम्हा संगे जिसी ॥4॥”
इंदुप्राकाश गाथ्यांत हाच अभंग तुकोबांचा म्हणून दर्शविला आहे व संताजींच्या “जगनाडी वहींत ” तो तसाच दिला आहे.
“ कळो आले तुज जिन । देवा तूं माझं पोषणा ॥1॥
आठविता याव रूपा । सदा निर्गुणीचा लपा ॥2॥
वाट पाहे आठवाची । सता नोरे मुळीची ॥3॥
तुका म्हणे परदेशी । येथें आम्हा संगे जिसी ॥4॥”
मात्र बहिणाबाईंच्या मूळ अभंगांत वरील प्रमाणें म्हणजे तुकाम्हणे असा उल्लेख आहे म्हणून बहिणाबाईंच्या अभंगांचे छापील पुरावे स्वीकारण्या इतपत संशयातीत असतील कां असा प्रश्न उदभवतो.
तुकारामाला कोणी लेखक नव्हता याला आधार म्हणून श्री. बेंद्रे यांनी बहिणाबाईंचा एक अभंग दिला आहे. तुकोबारायांचे मोठेपण व भगवंताशी साद्दश्य दाखवितांना रूपकांचा आधार घेऊन या काव्यपंक्ति रचल्या आहेत. बाई प्रतिभावान कवियत्री होत्या. याचा हे काव्य उत्कृष्ट नमुना आहे. काव्यांत प्रतिमेचा अविश्कार रूपकांतून होत असतो. त्या काव्य पंक्ति अशा: -
“ परी अंतरीच तुकोबाचें ध्यान । दर्शनावाचोनी करितले ॥2॥
जयाचिया पदे होतसे विश्रांति । तेंची देहकृति विठ्ठलाची ॥3॥
विठ्ठलासी तया नाही भेदभाव । ऐसें माझें मन साक्ष आहे ॥4॥
पांडुरंग तुका पांडुरंग तुका । वेगळीक देखा हाय केवी ॥5॥
कलीयुगी बौद्धरूप घरी हरी । तुकोबा शरिरी प्रवेशाला ॥6॥
तुकोबांची बुद्धि पांडुरंग रूप । मन हें स्वरूप तुकोबांचे ॥7॥
तुकोबांचे सर्व इंद्रिय चालक । पांडुरंग देख सत्य आहे ॥8॥
तुकोबांचे नेत्र तेही पांडुरंग । श्रेातृ ते अभंगरूप त्यांचे ॥9॥
तुकोबांचे हात लिहितातीत जें जें । तेंचि तें सइजें पांडुरंगे ॥10॥
सर्वही व्यापार तुकोबांचे हरी । आपणाची करी अव्यपत्तवें ॥11॥
बहिणी म्हणे रूपें व्यापक तुकोबा । ध्यान माझ्या जीवा हेंची पाहे ॥12॥
या काव्यांत रूपकाचा आधार घेऊन बाईंना हेंच सांगावयाचें आहे कीं तुकोबांच्या सार्या क्रिया पांडुरंगाच्या संकेतानुसार आहेत. त्यांच्या देहकृतींतून विठ्ठल ओतप्रोत भारल्यासारखा भासत आहे; तो बहरला आहे. तुकोबांच्या देहापासून पांडूरंग वेगळां होऊ शकत नाही. ते बौद्धरूप धारण केल्यागत दिसत आहेत. त्यांची बुद्धि पांडुरंगरूप आहे. त्यांचे मन व सर्व इंद्रिये पांडुरंग चलित आहेत; तो बहरला आहे, तुकोबांच्या देहापासून पांडुरंग वेगळा होऊं शकत नाही. ते बौद्धरूप धारण केल्यागत दिसत आहेत त्यांची बुद्धि पांडुरंगरूप आहे. त्यांचे मन व सर्व इंद्रिये पांउुरंग चलित आहेत; त्यांचे नेत्र, कान आणि हात सारे कांही पांडुरंगाच्या प्रेरणाधीन आहेत. सारांश त्यांच्या शरिराचे सारे व्यापार पांडुरंगाच्या आदेशानुसार चालतात. हा येवढाच या रूपक काव्याचा मतितार्थ आहे. परंतु स्वत: काढलेल्या निष्कर्षांच्या समर्थनार्थ “तुकोबाचे हात लिहितात जें जें” या रूपकांचा सोयिस्कर अर्थ लावून तुकोबांना कोणी लेखकच नव्हता असला भलताच निष्कर्ष काढण्यासाठीं बाईंच्या काव्याचा उपयोग करणें योग्य होणार नाहीं. काव्याचा रसस्वाद घेण्याऐवजी हवा तो सोयिस्कर अर्थ काढून संशोधन कार्याला जुंपणे म्हणजे काव्यप्रतिभेची अक्षम्य विटंबना होय.
प्रगति मासिकाच्या “संताजी विशेषांक” जानेवारी 1948 या अंकांत पृ. 186 वर शांताराम अनंत महािउक, रत्नागिरी यांनी आणखी एका संताजींची माहिती दिली आहे. या संताजींचे वडील करवीर क्षेत्रांत रहात असत व येथून ते छत्रपति शिवाजी महाराजांचे दरबारी पन्हाळगडावर नित्य सव्वामण तेल देत असत. पुढें ते पंढरपूरास आले व तेथे त्यांना संताजी हें पुत्ररत्न झाले. हा संताजी म्हणे थोर संत होऊन गेला. त्यांनी “स्वानंदबोध” हा ग्रंथ लिहिला. या माहितीच्या आधारे स्वानदंबोध ग्रंथाचा शोध करून तो मिळविण्याची बरीच खटपट केली. परंतु तो कोठेहि अस्त्विांत असल्याचा सुगावा लागला नाही. श्री. महाडिक यानांही अधिक माहिती सादर करता आली नाही व ग्रथाचाही माहिती देऊ शकले नाहीत. त्यामुळे हा ग्रंथ खरोखरच अस्तित्वांत आहे किंवा नाही हें सांगणे कठीण आहे. त्यामुळे हा दुसरा संताजी व त्यांचा स्वानंदबोध ग्रंथ ही एक कपोल कथा असल्याचे दिसून येते. इतिहासकार श्री. बेंद्रे यांनी या कल्पितत संताजीचा उल्लेख देऊन संताजी तेली जगनाडे चाकणकर यांच्याशी त्याचा अप्रत्यक्ष संबंध जुळविण्याचा योग साधला आहे. करवीर येथील संताजी व चाकण येथील संताजी जगनाडे यांचा एकमेकांशी संबंध जोडण्यस जराही अवसर मिळत नाही. हे पुढे निर्देश केलेल्या संताजी जगनाड्यांच्या वंशावळी वरून दिसून येईल ही एकच वंशावळ उपलब्ध आहे व ती आद्धाप आव्हानहित असल्यामुळे तीच ग्राह्य म्हणून स्वीकारणे भाग आहे. शिवा ही वंशावळ व पेशवे दप्तरांतील चाकण रूमालांत उल्लेखिलेला संताजी व त्यांचा पुत्र बाळोजी यांच्या नांवाशी जुळती आहे. ही वंशावळ पुढीलप्रमाणे.
या वंशावळीवरून असें दिसून येईल की संताजी जगनाडे व त्याचे सोयीरसंबंध सुदुंबरे (चाकण पासून 6 मैलांवर), खेड (चाकण पासून 6 मैलावर) व चाकण येथील अगदी समीपच्या परिसरांतील आहेत. करवीरच्या संताजींचे पूर्वज व सोयीरसंबंधी करवीर क्षेत्रांतले म्हणजे कोल्हापूरकडील असले पाहिजेत. ज्या अर्थी श्री. महाडिक यांच्या या करवीर संताजींची कसलिच माहिती उपलब्ध होत नाही त्या अर्थी हा करवीरचा संताजी व चाकणचा जगनाडे संताजी एकच असावेत किंवा सुुंदुंबरे येथील त्याचे वृंदावन आहे तो करवीरचाच संताजी असावा असा संशय घेण्यांस जागा उरत नाही. मूळ जगनाडे संताजीची अस्सल माहिती उपलब्ध होत नाहीं याचा फायदा घेऊन अप्रत्यक्षपणे व संदिग्धपणे कोणातरी संताजीशी बादरायणसंबंध जोडून देणें हे संशोधनाच्या कोणत्या कसोटीला उतरेल कोण जागे ? या वरून पूर्वग्रहदूषित व अनैतिहासिक सिद्धांत मांडण्याची ही असाहाय्य धडपड आहे असंच म्हणावे लागेल.
संताजीने व गंगाराम मवळानें तुकोबांचे अभंग लेखन केले नसावे या विधानाच्या समर्थनार्थ आक्षेपकांने आणखी काही आधार दिले आहोत. या दोन्ही व्यक्ति त्या काळांत नसाव्यात असा निष्कर्ष काढण्यासाठी त्यांनी रामेर्वरभट वाघोलीकर यांच्या प्रयाणप्रंसगाचा आधार घेतला आहे. रामेश्वरांने आपल्या प्रयाण सोहळ्याच्या प्रसंगी ती मंडळी बोलविली असा उल्लेख रामेश्वराचे बंधु दादाजी यांनी कुळकटींत लिहून ठेविली त्या मंउळींत कान्होबा (सुदुंबरें येथील) यांनाही बोलावले होते. कान्होबानें सुदुंबर्याहून संताजीसही बरोबर घेतले असतें, तसे झाले नाही कारण त्यावेळी संताजी लहान असावा किंवा रामेश्वरांच्या नजरेत तो आला नसावा. रामेश्वरभट वाघोलीकर यांचे मुळांत स्वत:चे कांहीच लिखाण अथवा काव्य उपलब्ध नाही. आठ कविता त्यांच्या नांवावर सांगितल्या जातात पण निश्चित असे नाही. ते संत नव्हते तर योगी होते, त्यांना अतियोगीही म्हणत. त्यांचें स्वत:चे काव्य अथवा लेखन जिथे उपलब्ध नाही येथे प्रयाण सोहळ्याच्या वेळी बोलावलेल्या लोकांची नामावळ त्यांच्या बंधूने दादाजींने जशी आठवली तशी कुळकटींत लिहून ठेवली. त्यांत एखाद्या व्यक्तीचा उल्लेख राहून गेला असेल इतकेच; पण उल्लेख राहून गेला म्हणजे ती व्यक्ति नव्हती असा निष्कर्ष काढणेंं कोणत्या शास्त्राच्या कसोटीवर उतरले ? बहिणाबाईंने रामेश्वराचा उल्लेख केला आहे. व इतरांचा नाही. पण बाईंचे काव्य तरी संशयातीत आहे का ? तुकोबांच्या अंत:काळाचे वर्णन बहिणाबाई देते, “तुकाराम तंव देखता देखत । आले आकस्मात मृत्युरूप ॥” तर वाघोलीकर लिहितात.
“उदंड पाहिलें ऐकिलें देखिले सरीन पावती तुक्याची ॥1॥
नेमधर्म याती करूनि दावी सोंग तुक्या परब्रह्मा अवतरला ॥2॥
पांडुरंग त्याचे देहिच गैसला देहासहित नेला पायापाशीं ॥3॥
ऐसा नाहीं कोण कालीमार्जी झाला रामेश्वर त्याला नमस्कारी”
दोघेही चक्षुवैंसत्यं साक्षीदार आणि प्रत्यक्ष तुकोबाच्या अंत:काळची परिस्थिती दोघेही वेगवेगळी दर्शवितात ! बहिणाबाई खोटे सांगतात असा आमचा मुळींच दावा नाही. पण अमुक व्यक्तीचा उल्लेख नाही म्हणून ती व्यक्ति अस्तिवातच नव्हती. हे अनुमान काढण्यास हे लेखी पुरावे विसंबून रहाण्याच्या योग्यतेचे आहेत का हा आमचा दावा आहे. रामेश्वरांचा मृत्युकाल सप्टेंबर 1656 चा आहे. संताजी जगनाडे यांच्या हस्ताक्षरा खालील एके ठिकाणी स. 1689 आहे. यावरून ते कान्होबाच्या गावी म्हणजे सुदुंबर्यास त्या वेळी असतीलच असे नाही. तर ते चाकण येथ आपल्या घरीहि असतील. कान्होबांनी त्यांना का बरोबर नेले नाहीं हे कान्होबांना माहित !
कचेश्वर ब्रम्हे चाकणकर यास तुकोबांची ओढ लागली तेव्हां ते तुकोबांचे अभंग मिळविण्यासाठी खेड कडूसला गेले. खेडला नारायणरावानें त्याना देहूस कुलकर्णी यांचे घरांत वह्या ठेवल्याचें सांगितले. शेवटी त्यांना देहूस काही ग्रामस्थाकडे दहापाच अभंग मिळाले ते घेऊन गेले. तुकोबांच्या निर्याणाननंतर बारापंधरा वर्षांनी चाकण येथे रहाणारा संतु तेली तुकोबांचा लेखक होता हे नारायणबाबांनी सांगितले नाही व कचेश्वराला माहित नव्हते. म्हणून तुकोबांचा व संताजींचा अनुयित्त्वाचा सबंध जुळला नसावा असा निष्कर्ष आक्षेपकानें काढला आहे. कचेश्वर ब्रह्मे याचे आत्मचरित्र उपलब्ध आहे. त्यांनी काव्यहि केलें आहे. पण विशेषत: त्यांची तुकारामची आरती प्रसिद्ध आहे. त्या आरतींत कचेश्वर म्हणतात “ संतात कीर्ती केली कुडी सायोजी नेली ॥” तुकोबांचा हा चरित्रकार कुडीसायोजी नेली म्हणुन सांगतो; चक्षुर्वैसत्यं साक्षीदार रामेश्वर हि तेंच सांगतो पण प्रत्यक्ष बारीकसारीक गोष्टीची नोंद घेणारी बहिणाबाई “आले आकस्मात मृत्युरूप” म्हणुन सांगते. कचेश्वर तुकारामा नंतर उपस्थित झाले आहेत. त्यांच्या चाकण येथील वास्तव्याच्या वह्या कुलकर्ण्यीच्या काळांत संताजी बहुधा देहूसच असले पाहिजेत . तुकोबांच्या अभंगाच्या वह्या कुलकर्ण्याच्या घरी कशा गेल्या ? त्या वह्यांचें जतन करणारी वारसादार मंडळी नव्हती का ? की संताजींने या वह्या कुलकर्ण्यांच्या स्वाधीन केल्या होत्या ? खेडमुक्कामी नारायणबाबांना आबाजीकडे तुकोबांच्या अभंगाच्या सर्व वह्या संग्रही आहेत तेथे अभंग मिळतील असें सांगितले. कचेश्वर विठोबाच्या देवळांत आले व तेथे कीर्तन संपल्यावर कचेश्वरांना स्वप्न साक्षात्कार झाला. आबाजीकडे वह्या आहेत असा नारायणबाबांनी उल्लेख केला होता, त्या अर्थी संताजी चाकण मुक्कामी नेहमी वास्तव्य करून रहात नसला पाहिजे. तसेच हा “आबाजी” हे एक गुढच आहे. संताजीलाच आबाजी म्हणत नसतील हे कशावरून ? कुलकर्णीनाच आबाजी म्हणत होते असा पुरावा नाही. संताजी स्वत: तुकोबांच्या संगतीत सर्वकाळ असल्यामुळे चाकण येथे त्यांची अधिक काळ गैर हजेरी असण्याची शक्यता अधिक आहे. हे अनुमान अधिक अचूक आहे. कारण खेडला नारायण बाबाने उल्लेख केल्याप्रमाणे देहूसच या वह्या असल्या पाहिजेत व त्या तुकोबा दुसर्या कोणीतरी लिहिल्या असल्या पाहिजे. नाहीतर नारायणबाबास तुकोबांच्या घरींच वह्या मिळतील ही सहज शक्य गोष्ट कचेश्वरास सांगता आली असती. कचेश्वरांना मधून मधून भ्रम होत असे असे त्यांच्या चरित्रावरून दिसून येते. त्यामुळे गावात कुठे कोण रहातो व काय करतो याची बारिकसारीक नोंद त्यांना अवगत नसली पाहिजे. म्हणून कचेश्वरांना गावातील संताजीच्या अस्तित्वाची जाणीवव नसावी असा सोयिस्कर निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. कचेश्वरांना देहूस स्वप्न साक्षात्कार झाला त्यांत त्यांना तुकोबा एकटेच दिसले. इतर अनुयायी अथवा भक्तमंडळी दिसली नाहीं असें आक्षेपकाने विधान केले आहे व हा युक्तिवाद नेमका त्यांच्याच अंगाशी येण्यासारखा आहे. स्वप्नांतील साक्षात्कार बुद्धिवादी स्वीकारणार नाही. इतिहास संशोधनात अशा साक्षात्काराला महत्व देणे संशोधनाच्या कसोटीवर उतरणार नाही. शिवाय कचेश्वरांना स्वप्नांत तुकोबा एकटेच दिसले तर रामेश्वरभट वाघोलीकर अथवा चुक्षुवैंसत्यं, साक्षीदार बहिणाबाई सिऊरकर यांचेहि अस्तित्व धोक्यांत येतें ! पण असा भलताच तर्कट निष्कर्ष काढण्याची करामत आक्षेप घेणार्या संशोधकानींच करावी. आम्हांला मी करता येणार नाही.
संताजी जगनाडे यांचे तुकोबांशी सान्निध व तुकोबांचे लेखक हे नमाभिमान दाविणारे पुरावे म्हणजे त्यांच्या जगनाडी वह्या. आज संताजींच्या हातच्या म्हणून उपलब्ध असणार्या खर्या दोनच वह्या आहेत. तिसरी बाळाजींची व चवथी रघुनाथ गोसावींची आहे. पहिल्या वहींतील अक्षर एकटाकी आहे. लेखन समास सोडून खाडाखोड विरहित केलें आहे. त्यामुळे ती दुसर्या कोणत्यातरी वहीची नक्कल असावी. कान्होबा उर्फ तुक्या बंधूचे अभंग तुकोबांच्या अभंगाच्या गटक्रमांकांत मध्येंच आले आहेत; कांही अभंग अर्धवट सोडून पुरेकरण्यासाठी जागा सोडली आहे. कांही अभंग द्विरूक आहेत; ज्या संग्राहावरून ही नक्कल केली आहे तो मूळ संग्रहसुद्धां तुकोबांच्या निर्याणा नंतरचा वा असला पाहिजे; पदनामी विश्वनाथाचा अभंग मध्येंच आला आहे; हा पदनाभी विश्वनाथ तुकोबानंतर इ. 1700 नंतरचा आहे; म्हणून या वहीचे लेखन इ. 1700 नंतरचे आहे; दुसर्या वहींत पृ 41 वर संताजीचा हातचा शेरा आहे. तसाच शेरा पृ. 164 वर आहे. परंत मध्येच तुक्या बंधूंचे अभंग आहेत. पृ. 184 वर संताजीच्या हातचा शेरा आहे, परंतु तो अभंगाखाली नसून आरत्यांच्या खालीं आहे. पुढे पृ. 200 वर निरनिराळ्या संताचे अभंग दिले आहेत. त्यांत एक अभंग पद्नाभी विश्वनाथचा आहे. यावरून दोन्ही वह्या इ. 1700 च्या नंतरच्या आहेत. असे आक्षेप श्री. बेंद्रे यांनी घेतले आहेत. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पहिल्या वहीत संताजींची कोठे सहीच नाही. पहिली पृष्ठे गहाळ आहेत त्यामुळे सुरवातीचा मजकूरहि समजण्याचें साधन नाही. तसेच शेवटची पाने गहाळ असल्यामुळे मिती व स्थळही समजणे कठीण आहे. मूळवहीची अथवा अभंगाच्या टाचणाची ही वही नक्कल असणें अधिक सभवते. कीर्तनांत अथवा वेळ प्रसंगी अभंगाची टाचणे लिहून नंतर निवांतपणे या वहीत ते अभंग लिहिले असावेत. जे लिखाण इ. 1700 नंतरचे आहे ते मोकळ्या सोडलेल्या जागी नंतर कोणीतरी लिहिले असावे. पण दुसर्या वहीबाबत तसे अनुमान काढणे धोक्याचे ठरेल. पद्नाभी विश्वनाथाचा अभंग पृ. 200 वर आहे व संताजीच्या सह्या मिती व स्थळ दाखविणारे उल्लेख पृ. 184 पर्यंत आहेत. म्हणजे संताजीच्या सहीपूर्वी तो नाही ही गोष्ट महत्वाची आहे. तुक्या बंधुचे अभंग मध्येच आले आहेत पण ते समकालीन होते. मधूनमधून जागा मोकळी सोउली आहे. त्याचा फायदा घेऊन इतर अभंग व काव्य त्यांत घुसडले असावे. बहिणाबाईचा मुलगा विठोबा यांनी केलेली तुकोबांची आरती मध्येच आली आहे. तीहि बहुधा अशीच कोणी तरी मध्येच लिहिली अयसावी. तिथींचा क्रम व पृष्ठांचा क्रम पहातां ही वही सुट्या पानांची असावी व नंतर पृष्ठ क्रमांक दिले असावेत. पृष्ठक्रमांकानुसार तिथीचा क्रम नाही म्हणून सर्वच्या सर्व लिखाण बनावट आहे असा निष्कर्ष काढणें अयोग्य व धोक्याचे आहे. यातील लिखाण एकटांकी व एकाच वळणांचे नाही हे लक्षांत घेतले तर म. म. दत्तो. वामन पोतदार म्हणतात त्यप्रमाणे इतर लिखाण निभ्रांत अन्य लिखित आहे हेच अनुमान अचूक आहे.
शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या देवळात शिवरात्रीच्या दिवशी मोठा मेळावा भरतो. तेथे जो क्रियाकर्मे होतात त्यांत कावडी नेण्याचा समारंभ असतो. तेल्याची कावड नेण्यास तेथे अग्रहक्क का अशी चवकशी करता तेथील जुन्या मंडळींनी व उपाध्यायांनी सांगितले की तुकोबा महाशिवरात्रीस येथे आले होते. सोबत त्यांचा परिवार होत. त्यांत संताजीही होता. संताजीस काही मानमान्यता असल्यामुळे कावडीसाठी आज तागायत तेली मंडळीस अग्रहक्क देण्यांत येत आहे. कावडीचा पूर्वीपासूनच परिपाठ असला पाहिजे परंतु संताजीच्या भेटीपासून त्यांना अग्रहक्क देण्यात आला असावा. तुकोबा शिगणापुरास गंगाराम मवाळ व संताजी तेली यांना घेऊन गेले होते असा उल्लेख महिपतीने भक्तीलीलांमृतांत 37 व्या अध्यायांत केला आहे. ती कथा अशी एकदा चैत्र मासामध्ये तुकाराम “चालले यात्रेशी शंभूचे शिखर पहावयासी । हेत मानसी धारियेला ॥ बरोबर संताजी व गंगाराम मवाळ होते. रोज रात्री मार्गावर कीर्तन करीत ते चालले होते व साव्या मजलीला त्यांना शंभूचे शिखर दिसले, कोथळेर्वर पर्वतावर शींवाचे स्थान होते व खाली तळपटी क्षेत्रशिंगणापूर होतें व तेथे एक सरोवर होते, पर्वतावर पाणी नसल्यामुळे तळ्यांत स्नाने करून भोजन उरकून वर जाण्याचे त्यांनी योजिले. स्वयंपाक तयार केला व भोजनास बसणार इतक्यांत कैलासनाथ दिगंबराच्या रूपांत तेथें उपस्थित झाले. त्यांनी भोजन मागतिले तेव्हां सर्व भोजन त्यांना वाढण्यांत आले. अतिथींने सर्वच्या सर्व भोजन खाऊन टाकले व नंतर “भोपळाभर” पाणीपिऊन मुखशुद्धी करून ते काळ पर्वंतात गुप्त झाले. सर्व अन्न संपल्यामुळे संताजीला गावात शिधा आणण्यासाठी पाठविले संताजी परत येऊन पहातो तो सर्व अन्नांनी भरलेली तशीच्या तशी होती. भोजन केल्यानंतर कानडीचे अभंग म्हणत सर्वानी शंभू महादेवाचे दर्शन घेतले. तेथे पांच दिवस राहून ते सारे परत देहूस आले. महिपती बाबाने ही हरिदासी कथा तयार केली असेल कदाचित, पण शिखर शिंगणापूरास ही मंडळी एकत्र गेली असावीत हे कावडीच्या अग्रहक्कावरून समजण्यसारखे आहे. महिपतीने वर्णिलेला चमत्कार कदाचित घडला नसेलही पण ही मंडळी तेथे गेली नसतील हा निष्कर्ष चुकीचा ठरेल. तुकोबा संताजींच्या शिखर शिंगणापूरच्या भेटीपासून आज तागायत चालू असलेला कावडीचा अग्रहक्क हेच दर्शवितो की तुकोबा व संताजी एकत्र फिरत असावेत.
सुदुंबरे येथे संताजींचे वृंदावन आहे. तेथे दरवर्षी मार्गशीर्ष व 13 संताजी पुण्यतिथी उत्सव होत असतो. गेल्या चाळीस वर्षीत हा उत्सव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यापुर्वी अल्पप्रमाणांत हा उत्सव साजरा होतत होता. तेथे असलेले हे वृंदावन एैतिहासिक सिद्धांताच्या पूर्वतेची साक्ष देत आहे. या वरून सदूुंबरे येथेंच संताजींचा अंत:काल झाला असला पाहिजे. चाकण सोउून सदुुंबरे येथे केव्हां आले ते समजणे कठीण आहे. कदाचित बेंद्रे म्हणतात त्याप्रमाणे औरंगजेबाच्या स्वारीच्या वेळी इतरांच्या बरोबर चाकण सोडून आपल्या आजोळी ते पळूल आले असावेत; व सुदुंबरे येथील वास्तव्यांत त्यांचा अंत:काल घडुन आला आसावा. संताजीचा मुलगा बाळोजी हा नंतर संगळीकडे स्थिस्तावर झाल्यावर उरलेल्या मंडळीस घेऊन परत चाकण येथे गेला असावा. बाळोजीच्या वहींतील पृ. 161 वरील शेरा (28 जुलै 1731) व पृ. 94 वरील शेरा 228-1732) यावरून बाळोजी व नंतर वंशज चाकण येथे वास्तव्य करून राहिले असले पाहिजे. पुढे या वह्यां तळेगांवी त्यांच्या वंशजाकडे गेल्या असाव्यात.
सारांश या सर्व विवेचनावरून दिसून येईल की श्री. बेंद्रे यांनी घेतलेले सर्व आक्षेप निराधार आहेत. इतिहास कालीन कागदपत्रांचा त्याला आधार नाही. त्यामुळे संताजी जगनाडेबद्दल गोपाळ बाबाने व महिपतीबाबा तार्हाबादकर यांनी जो उल्लेख केला आहे व त्यामुळे जो समय रूढ आहे तो तसाच अबाधित राहतो व शेवटी हाच निष्कर्ष निघतो की संताजी जगनाडा हा तुकोबांचा लेखक होता, सर्वकाळ त्यांच्या सन्निध रहात होता व समकालीनही होता. जगनाडी वह्यातून तुकोबांच्या अभंगाचे जे अद्वितीय भांडार सापडले आहे. त्यामुळे महाराष्ट्रांतील अभंगप्रेमी भक्तांवर अनंत उपकार झाले आहेत. इतिहासकारांनी याच वह्यातून अभंग घेऊन तुकोबांच्या गाथा छापल्या आहेत. इतिहासकारांवरसुद्धा हे उपकारच आहेत. त्याची फेउ ते केाणत्याही प्रकारे करोत; पण जगनाडी वह्या या अमर रहातील. संताजींमुळेच समाजाची मान आज प्रतिष्ठेने ताठ उभी आहे. मग इतिहासकार काहीही म्हणोत !