वाशिम - रिसोड येथे संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त रिसोड वाशिम शहरातील तेली समाज बांधवांतर्फे अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी संताजी महाराजांच्या पालखी सोहळा साजरा करण्यात आला.
आप्पास्वामी मंदिर इथे ऑड. कृष्णा महाराज असंनकर यांच्या हस्ते पूजन करून पालखी सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. या पालखी सोहळ्यांमध्ये भजन मंडळ मंडळांच्या शहर व तालुक्यातील तेली समाजातील समस्त महिला व पुरुषांचा सर्व लहान-मोठी मंडळी सहभागी झाली होती. पालखी मार्ग करण्यात आली. नगरप्रदक्षिणा शिस्तबद्ध व आनंदमय वातावरणात पूर्ण करण्यात आली. यामध्ये महिलांनी प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले. पालखी सोहळ्याचा समारोप आप्पास्वामी मंदिर इथे करण्यात आला. समारोप प्रसंगी सर्वांनी भोजन प्रसाद देण्यात आला.
या जयंती कार्यक्रमास रिसोड येथील तेली समाजातील सर्व मंडळीचे अमूल्य सहकार्य लाभले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade