खासदारकीचा मी पणा विसरून वावरणारे खा. तडस :- उमेश साहू नागपूर
आमच्या 2/3 पिड्या विदर्भाच्या मातीत मुरलेल्या. या मातीने आपलेसे केलेले. या वावरण्यात समाजाचे आमदार म्हणून तडस साहेबांची ओळख झाली. आमच्या आडचनी समजावून घेतल्या त्या आडचनीवर चर्चा करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. एक तेली म्हणून ते आमचे झाले. तेली समाजाच्या संघटनेत त्यांनी सामावून घेतले. त्यांचा जेंव्हा परिचय झाला तेंव्हा मी कोण विसरून आपण सर्व एक आहोत ही भुमीका ते वागण्यात बोलण्यातुन प्रकट करीत परिस्थतीबरोबर चार हात करून ते खासदार झाले. वाटले खासदार होताच ते विसरतील हा समज त्यांनी सर्वांचा दुर केला. दिल्ली मध्ये अखील भारतीय साहू समाजाच्या संघटनेत ते उपस्थीत राहू लागले. आमचे प्रश्न समजुन घेऊ लागले. हिंदी पट्यातील बांधवांना ते आपले वाटु लागले. हे त्याच्यांतील समाजनिष्ठेची ओळख सर्वांना झाली.
समाजातील कोणत्याही अर्थीक स्तरातील बांधव गेला तरी ते त्याला वेळ काढुन अडचनी समजावुन घेतात. हाच आम्हा सर्व बांधवांचा आधारवड आहे. हे त्यांचे मोठे पण आहे. या मोठे पणात आपले खासदारकी ही आड येऊ देत नाही. आपण पोट भेट, प्रांत भेद विसरून एक आले पाहिजे. ही आपली एकीच भविष्य उज्वल घडवीणारी आहे. ही त्यांची दिशा आमची मार्गदर्शक तत्वे आहेत.