तेली समाजाच्या आब्रुची किंमत दहा लाख मोदी - योगींच्या राज्यात ???
इलाहबाद - येथील माखनलाल साहू यांच्या घरात मध्यरात्री गुंड आले. यांनी दोन मुली वर बलात्कार केला. हे गुंड एवढयावर थांबले नाहीततर जाताना माखनलाल, त्याचीं बायको व मुलींचा ही खुन केला. तेथील तेली समाज लखनऊ ते दिल्ली पर्यंत रसत्यावर येताच उपमुख्यंत्री मौर्य हे सांत्वन करावयास आले. परंतू या नराधमांचा शोध घेण्यास पोलीस यंत्रणा कामाला लागली नाही. फक्त दिखावू स्वरूपाची शोध मोहिम सुरू केली खवळलेला तेली समाज पाहून मुख्यमंत्री योगींनी पिडीत कुटूंबांच्या वारसदारांना दहा लाख रूपये दिले तेथील समाज बांधव बरोबर संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले तेली समाजाची आब्रू लुटताच दहा लाख रूपये देऊन योगी सत्य लपवीत आहेत. गुन्हेगार मोकाट आहेत. हाच न्याय का ? दलित व यादवांची (ओबीसींची) सत्ता जावून जन्माने ठाकुर असलेल्या योगींची सत्ता येताच मध्ययुगीन काळाची सुरूवात झाली. मोदी तेली म्हणून आपन आपले मानतो ते न्याय देऊ शकत नाहीत. एक तर बनावट तेली असून आर. एस.एस. या ब्राह्मणी संघटनेचे एजंट आहेत. आशी तिव्र प्रतिक्रीया रामप्रसाद गुप्ता यांनी फोनवर दिली. आहे. हर हर मोदी व तेली मोदी किती गंभीर प्रसंगाला तोंड द्यावे लावणारा आहेत यांची सुरूवात आहे. बाकी किती असेल याचा विचार समाजाने करावा. नेते म्हणून मिरणारे हे ढोंग पांघरून चालतात त्यांना संघर्ष स्वत:च्या फायद्याचा समजतो. खर्या संघर्षाला पाठ दाखवतात. मतलबा साठी तडजोडी करतात हे मागे बबनराव पाचपुते यांनी समाजाची अब्रू वेशीवर टांगल्यावर कोणी किती तोडी केल्या हे सुद्धा समाज जाणून आहे. कारण हीच मंडळी आता हा प्रसंगच घडला नाही हे ही सांगतील. आणी मतलबा साठी मोदींचा उदो उदो करतील.