पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ? ( भाग 4 )
ही एक गोष्ट आहे ही गोष्ट एका सेवा निवृत्त असलेल्या समाज कल्याण खात्याच्या आयुक्तांनी सोशल मिडीयावर सांगीतली होती. ती गोष्ट मला विभागीय जात पडताळणी ऑफीस मध्ये मला पकडून ठेवत होती. एका गावातील शिवे वर गाढव व कुत्रे उभे होते. दोघात वाद झाला श्रेष्ठ कोण ? तेंव्हा दोघांनी बरीच चर्चा करून ठरविले आपन पळण्याची स्पर्धा लावू. कुत्रा तयार झाला कारण हा जातीवंत चपळ होता. उलट गाढव होते. स्पर्धेचा निकाल ठरला होता. विजय हा कुत्र्याचाच होणार होता. आणि स्पर्धा चालू झाली दोघेही पळू लागले. कुत्र्याने काही सेंकदात गावात प्रवेश केला. पण गाढव किती तरी मागे होते. कुत्र्याला आपल्या ताकदीचा गर्व नव्हे तर अभिमान होता. आपन सर्व शक्तीमान आहोत ही त्याची मानसिकता धारणा सर्व मान्य सत्य होते. गावातल्या गल्या संपल्या आणी स्पर्धक गावाच्या दुसर्या टोकाला पोहचले तेंव्हा गाढव त्याच्या पुर्वी बर्याच वेळ तेथे येऊन पोहचले होते. हा चमत्कार का घडला ? दोघांनी स्पर्धा सुरू केली तेंव्हा गावाच्या वेशीजवळ कुत्रा पुढे होता पण वेशीपासून सुरूवात झाली त्याचा भावबंध हा कोण मोठा स्पर्धा जिंकणार म्हणून त्याच्यावर तुटून पडले. ते सुद्धा त्याच्या सारखे बलवान होते. त्यांना मागे सारून स्पर्धक कुत्रा चौकात गेला त्या चौकातले जे होते त्यांनी नवीन म्हणून हाल्ले ही केले. कसा बसा तो सटकला. पण पुढे प्रत्येक चौकात, प्रत्येक आळीत हाच प्रकार त्यांच्याशी संघर्ष करणे हिच वेगळी स्पर्धा करावी लागे. यावर ही मात करून जेंव्हा तो गावाबाहेर गेला तेंव्हा सर्व बाबत मागे रहाणारे गाढव सर्व प्रथम होते. मी व माझा समाज हा मागे का रहातो तर आपन लढण्यासाठी जड ठिकाण निवडतो आपला नक्की मित्र कोण शत्रु कोण हेे न ओळखून आपन आपल्यातच लढतो आणी सर्वजन तेथेेच थांबतो तसे या उच्चजातींचे नाही ते आपल्या आपल्यात लढतील पण दुसर्या जातीचा पुढे जाऊ देणार नाहीत.