डोंगराच्या कुशीत बसलेल्या पाईट गावाकडे निघालो अंधार पडताच एसटी मिळाली १५ ते १६ किमी प्रवास करताना एकाने पाईट आले म्हणुन सांगितले. मी उतरलो त्या ठिकाणी गर्द अंधार मला समजले हे पाईट नसुन कुरकूंडी फाटा आहे. मोबाईला रेंज नाही पुढे काय हा प्रश्न मला रात्री ८ पर्यंत उभा होतो. तोच एक सहा सिटर आली. त्यात किर्तनकारी मंडळी बोलता बोलता त्यामधील ह. भ. प. कर्पे महाराज भेटले यातुन पाईट मध्ये कधी पोहचलो समजले नाही.
श्री. प्रकाशशेठ गिधे समोर आले. पहिल्या पाच मिनिटात समजुन चुकलो बांधव स्पष्ट वक्ते. त्यांना भिड कुणाची तर सर्व सामान्य बांधवांची. तळमळ कुणाची तर रोजंदारी करणार्या बांधवांची. धडपड कुणासाठी तर हातावर पोट घेऊन हातगाडी चलवणारे बांधव छोटे छोटे दुकानदार. लढावे कुणासाठी तर हालाखीत शिक्षण घेऊन भटकणार्या तरूणा साठी. या ठिकाणी माझे सुर जमले. मी त्यांना माझा एक प्रसंग सांगीतला १९८३ च्या जुन मध्ये खोजेवाडी जि. सातारा येथील माध्यमिक शाळेत शिपाई म्हणुन हाजर झालो. शाळा देवळात मशिदीत भरत असे. प्रत्येक रविवारी शाळा हाताने सारवावी लागे. आशा वेळी कली तेलीण भेटली. गावाने या भगीनीला हेच नाव दिलेले. कुडाच्या घरात राहणारी ही भगिनी गावातल्या १०/१२ म्हसी संभाळुन घर चालवत होती. आणि रविवारी ५ रूपयात शाळा सारवुन देत आसे. हा प्रसंग सांगताच गिधे बोलते झाले . पाईट डोंगर दर्यातले गाव गावात पोटाची अबाळ सुरू होती तेंव्हा ते मुंबईत गेले अफाट मंबईत त्यांचे शेलार मामा सोबतीला होते. सुरूवात मिळेल त्या कामाने सुरू केली. त्यातुन मिल कामगार म्हणुन रूजु झालो. अंगच्या गुणांनी ते ज्जबर ही झाले. दत्ता सामंताच्या जवळ गेले. गिरबी पिळणारी जी जी माणसे भेटत त्यांच्या विरोधात संघर्ष करणे हे बाळकडू मिळाले महाराष्ट्राला कलाटणी देणारा तो दत्ता सामंत यांचा संप त्या वेळचे शासन व मालक यांच्या विरोधात लढाई करण्यास ते रस्त्यावर उतरले. कामगार चळवळीचा झेंडा खांद्यावर घेऊन ते म्होरके झाले. त्याचा परिणाम असा रोज पोलिस शोधत येत. आज्जी वैतागली हा पाठलाग संपवायला ना विलाजास्तव प्रकाशला पाईट येथे पाठविले. उभा पासुन झेलणार्या गावात जगण्याची धडपड सुरू झाली. जवळ काय काहीच नाही पण जिद्द मोठी. किरकोळ भुसार माल गोळा करूण खेड्याला विकणे, कधी हात गाडी लावून उभे रहाणे चार पैसे गोळा करून तेल गाळप हा उद्योग सुरू केला. असे आनेक उद्योग करता करता स्विटमार्ट व हॉटेल व्यवसाय उभा केला. या व्यवसायात मात्र जम बसवुन ते प्रकाशचे प्रकाशशेठ झाले.
विखुरलेला समजाबद्दल सुदूंबरे येथे उत्सवात किंवा समाजाच्या मिटींग किंवा कार्यक्रमात माईक वर बरेच बोलतात परंतु ही बोलणारी मंडळी प्रत्यक्ष समाजासाठी काही करितच नाही. मी एक कामगार चळवळीतुन आलो असल्याने यांची बोलाची कडी मनाला पटत नाही. वेळ प्रसंगी प्रवाहाच्या विरोधात ही जावुन मी मते मांडत आसतो. या मंडणीतुन समाज प्रवाहाला दिशा देता आली महाराष्ट्रात समजा १० टक्के पुणे जिल्हा परिसरात तो अल्प तालुक्यात १०० ते २५० घरे मोठा गावे सोडली तर किमान २/३ घरे. या घरात जगण्याची साधने काय तर टपर्या, हातगाड्या, छोटी दुकाने किंवा अल्प शेती या बांधवांना ना गावात प्रतिष्ठा मराठा समाजा समोर हात बांधुन उभे राहणे. शासकीय लाभ ही ताटातुन पळवला जाताना तोंडावर बोट ठेवावे लागत आशा या बांधवांची खाणे सुमारी सुरू झाल ती पुर्ण ही होवू लागले जे पटले नाही जे चळवळी मनाला रूचत नाही ते ही मी पाहू लागलो तेंव्हा स्पष्ट मत मांडली. शंका उभ्या केल्या पण खाने सुमारी करणारे बांधव सुज्ञ निघाले. त्यांनी उनीवा दोष मान्य करून सुधारणा ही सुरू केल्या. अफाट मनुष्यबळ अफाट पैसा खर्च करून खानेसुमारी मुद्रित झाली. प्रबोधनातला हा पहिला टप्पा पुर्ण झाला. आता या नंतर काय ? घरा घरात जाताना जे प्रश्न समोर आले. जे प्रश्न समजुन घेतले त्या प्रश्नाची प्रत्यक्ष उत्तरे शोधुण या पोळलेल्या या पिळलेल्या या दडपलेल्या असंघटीत समाजासाठी रचनात्मक दिशा दिली पाहिजे. माईक व त्यावरील कधी साखर पेरणी किंवा संघर्षाची भाषा समाजाला विकासाकडे घे्ऊन जाणार नाही तर समाजाला शासन दरबारी जावून न्याय मिळवणारी यंत्रणा हवी. या साठी स्टेजवरील यासाठी उंबर्या आडली. यासाठी मिटींग गाजवणारी भाषा नको तर समाजाला संघटीत करून रस्त्यावरची लढाई लढणाारी मंडळी तयार झाली पाहिजेत कातडी वाचवणारे नव्हे तर समाजासाठी अंगाची कातडी सोलली तर डगमगणारी नकोत एवढेच या प्रसंगी सांगु शकतो
:- शब्दांकन मोहन देशमाने.