भोर तालुका तसा डोंगराळ भोर सोडल्यास पुर्ण तालुक्यात विस्कळीत पणा असतानाही गतशंभर वर्षाचा आढावा घेतल्यास या तालुक्याने सामाजीक राजकीय आर्थीक, धार्मिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलेला दिसून येईल. संत संताजी जगनाडे महाराजांची समाधी ठिकाणी स्मृतीदिन साजरा होऊ लागताच बांधव जाऊ लागले. त्या ठिकाणी कै. ज्ञानेश्वर पवार, कै. बापुसाहेब किर्वे, कै. शरद देशमाने हे सहभागी झाले. कै. शरद देशमाने हे तर संत संताजी पालखी सोहळा सुरू करण्यास जी १० ते १५ बांधव होते त्यातील एक होते. साधारणतहा २५ वर्षापुर्वी भोर, वेल्हा खंडाळा या तालुक्यातील बांधवांनी विचार केला सर्वजन सुदूंबरे येथे जावू शकत नाहीत तेंव्हा भोर येथे आपण पुण्यतिथी साजरी करूया या साठी कै. अन्ना धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली श्री. दत्तात्रय देशमाने व इतर बांधवांनी समाज एकत्र केला. पहाता पहाता याचा विचार आचार व कृती याची जोड मिळाली त्यातूनच आज माजी सभापती श्री. कृष्णा शिणगारे यांच्या नेतृत्वा खाली भव्य संताजी मंदिर सांस्कृतीक सभागृह आकराला आले. या साठी समाज बांधवांचा त्याग व खासदार व आमदार फडातील निधी मिळवला त्यामुळे संस्थेला कायम उत्पन्न सुरू झाले. सहकार प्रणाली सुरू होताच समाजाच्या तेल उत्पादक मंडळींनी एकत्र येऊन तेल उत्पादक खरेदी विक्रीची सोसायटी सुरू केली. आज श्री निवृत्ती पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरथ आज पर्यंत आहे. आशा सोसायट्या सर्वत्र उभ्या राहिल्या परंतू काळाला सामोर्या जावुन ज्या काही टिकुन आहेत त्यापैकी ही एक.
कै. ज्ञानोबा पवार, सौ. किरवे, धोत्रे, कै. दहितुले, सौ. जाधव आशा मंडळींनी भोर नगर पालीकेत आपला ठसा उमटवला आहे. उपनगराध्यक्षा पदा पर्यंत काम करण्याची संधी ही मिळाली. श्री. कृष्णा शिणगारे हे जि. प. सदस्य व पुणे जिल्हा परिषदेचे सभापतीह ही होते. श्री. अजित हाडके, श्री. चाळेकर यांनी नसरापूर ग्रामपंचायतीत सरपंच पदभुषवुण समाजाला नेतृत्व दिले. श्री. बाळासाहेब दळवी हे पंचायत समिती सभापती होते. अनेक छोट्या गावात ही समाज बांधवांनी राजकीय क्षेत्रात आपण अल्प असुन सर्व शक्ती नुसार आपल्या अस्तीत्वाच्या खुणा जपल्या व निर्माण केल्यात.
महाराष्ट्रात तेली महासभे तर्फे तालुका अध्यक्ष पदी श्री गणेश ज्ञानोबा पवार यांना देण्यात आली श्री. चंद्रकांत वाव्हळ यांनी नियोजीत रित्या निवड केली. कारण कै. ज्ञानोबा पवार यांनी राजकीय क्षेत्रात आरक्षण नसताना ही निवडणुकीचे गणीत यशस्वी पणे राबवले होते. अनेक लहान मोठे उद्योग करीत ऑईल मिल क्षेत्रात स्थीर झाले होते. सामाजीक विचार प्रणाली, संघटनेचे बाळकडु श्री. गणेश यांना मिळाले होते. आपला व्यवसाय संभाळुण ते भोर येथिल समाज संस्थेत सक्रिय होते. आपला व्यवसाय संभाळुन ते भोर येथिल समाज संस्थेत सक्रिय होते. सामाजिक प्रक्रियेतील अनेक उपक्रमात सहभाग ही घेत होते. यातुनच संघटनेची खानेसुमारी करणे सुरू झाले. शहरी भाग सोडला तर डोंगर दर्यात फिरणे तसे अवघड व कठिण परंतु सहकार्यांच्या बरोबर ती पुर्ण केली. खानसुमारी झाली पण ती करिताना अनेक प्रश्न समोर आले. हातगाडी, छोट छोटे उद्योग, आठवडे बाजार कही जन गाव गाड्यात मोल मजुरी करणारे यांचा सामाजीक आर्थिक विकास होण्यासाठी सर्व स्तरातुन प्रयत्न होणे गरजेचे आहे. या साठी भावी काळात प्रयत्न झाले पाहिजे ही नवी दिृष्टी या खाने सुमारीतुन जरूर मिळाली.
या साठी सर्वश्री गणेश शेडगे जिल्हा उपाध्यक्ष , आबासाहेब राऊत, सतीश शिणगारे, हरिभाऊ किर्वे, राम राऊत, शिवाजी शेडगे, श्रीनाथ भागव, गजानन झगडेख, जयवंत धोत्रे , ज्ञानेश्वर चाळेकर, सुरेश देशमाने, संतोष मेढेकर, संतोष देशमाने, लक्ष्मण किरवे, संजय शिणगारे, भरत ठोंबरे, अतुल शेडगे, योगेश शेडगे, प्रतिक चाळेकर, व सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले.