संत संताजींच्या मारेकर्यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 2) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
मागेच मी मांडले आहे की वेदांना झीडकारणारे विचार, देव निर्माण करणार्याचे आम्हीबाप आहोत. संताजी उभे राहिले. हे विचार एैकले, लिहीले, जगले व संभाळले किती कडवट सत्य आहे. हे अनेकांना पटणार नाही पण संत संताजींनी जपलेल्या अभंगातून हेच विचार उमटत आहेत. ते फक्त भार वहाणारे होते म्हणजे ते लेखन व संभाळणारे होते ? हे एक अबाधीत सत्य की ते बलुतेदार पैकी होते. ते कारू नारू पैकी होते. ते नामस्मरण, हरी किर्तन, संत संगती, साधे, सत्य आचारण, निती आणीती अनासकती यावर ते उभे होते. त्यांची मुळाात लढाई ही दंभाची, खोटेपणा दिसला त्या त्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे किर्तनकार, पुराणीक गुरू विद्वान संत यांच्यातील असत्याला त्यांनी त्यांना चव्हाटा दाखवीला. त्याच बरोबर सत्ता गाजवणारे पंडीत, शास्त्री, वेदभट, कर्मठ, जपी तपी, संन्याशी यांच्या वागण्यात फरक दिसताच ते त्वेषाने असल्या अमंगल व्यवस्थे विरोधात लढले. आता हे त्यांचे लढणे एकाकी नव्हते. त्यांच्या लढण्यात तुकाराम होते. नमाजी माळी होते, कासार होते, वाणी होते आणि ब्राम्हण होते, मुसलीम सुद्धा होते. हा लढा बरेच वर्षे बरीच दशके, बरीच शतके समाजाच्या अंतकरणात धुमसत होता. हे धुमसने असाह्य होण्यास अनेक कारणे होेती. जेंव्हा जेंव्हा मानवी धर्म गोत्यात येतो जेंव्हा जेंव्हा ब्राम्हणी धर्म सुवर्ण युग भोगत आसतो नेमक्या या वेळी या सर्व असाह्यतेचा जनमानसात स्फोट होतो. हा स्फोट करून संत संताजींनी मानवी धर्माची पुन्हा उभारणी केली. संत संताजी व संत तुकाराम यांच्यात गुरू शिष्याचे नाते होते. म्हणून ही आम्ही मानतो हे ही काही खरे आहे. परंतू आम्ही मुळात संत तुकाराम व संत संताजी समजून घेतले नाही तुकोबा गाथा वाचली किंवा पारायण केली की पुण्य मिळते. या काल्पनीक पाप पुण्याच्या गुंत्यात आपन गुंतलो कारण गुरूशिष्य बाबत आपण पाहू. शंकराचार्याने बौद्ध विचार प्रणाली जनमानसात रूजलेली ओळखली किती ही बौद्ध धर्मात बंदेली माजली तरी विचाराची बैठक नष्ट होणार नाही. याच साठी बौद्ध प्रणालीला हवे तसे मोडून तोडून आपल्या सारखे केले. देशाच्या प्रत्येक घरातील मनात बौद्ध वसलेला होता तो नष्ट करून आपली प्रणाली मांडली पुढे काही शतकात सुफी संतांचा प्रथम संबंंध आजच्या केरळ मध्ये आला. त्यांच्यातील भक्ती मार्ग सोपा वाटला. यातूनच प्रथम समजुन रामानुज यांनी भागवत धर्म स्विकारला. यात ब्राह्मणाचे महत्व कमी केले. पण हा पंथ फक्त ब्राम्हण मंडळी साठीच ठेवला त्यानंतर माधवाचार्य यांनी तोच प्रयत्न केला. भागवत धर्म झाला पण ब्राह्मणा पूरता. ज्ञानेश्वर हे भागवत धर्माचे वारकरी पंथाचे संस्थापक महणून बिंबवले आहे. परंतू 1985 मध्ये शिवराम एकनाथ भारदे यांनी हे नाकारले आहेे त्यानंतर सुखठणकर आपल्या संत मंडळींचे एैतिहासीक कार्य या संशोधन पर या पुस्तकात पान नं. 73 वर स्पष्ट म्हणतात. इ.स. 1273 च्या सुमारास महाराष्ट कर्नाटक तैलंगणा इत्यादी भागातून सर्व जातींच्या लोकांनी वर्गणी जमा करून विठोबाचे मंदिर पूजा अर्चोच्या साधना सहित उभे केले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा हा विशेष आहे की, देवस्थानचा उगम ही मुख्यत: समान्य जनांच्या देणग्यातून झाला. त्याच्या प्रस्थापनेपासूनच त्याला सर्व लैकिक स्वरूप प्राप्त झाले होते. साद्या राजाने किंवा सम्राटाने बांधून देऊन वर्षासने बहाल केलल्या मंदिरापैकी ते नव्हते. हेच देवस्थान वारकरी संप्रदायाची परंपरा चालू होती. तरी त्याला हे महत्वाचे पद प्राप्त करून देऊन संप्रदायाचे प्रचंड प्रमाणात उत्थापन करण्याचे कार्य नामदेवाच्या पुर्वी जरी या देवस्थानाची परंपरा चालू होती. तरी त्याला हे महत्वाचे पद प्राप्त करून देऊन संप्रदायाचे मुख्य अधिष्ठान आणी स्फर्ती केंद्र बनले. या देवस्थानची प्रचंड प्रमाणात उत्थापन करण्याचे कार्य नामदेवाच्या नेतृत्वाखाली संत मंडळीनी केले. रामानाजुनचा भक्ती मार्ग हा ब्राह्मण जातीतच मर्यादित होता. परंतू संत नामदेवांनी हा भकती मार्गाला भागवत धर्माला दिशा दिली. यातील ब्राम्हण वैशीष्ट पणा मुळे जो अत्याचार माजला होता. ब्राम्हण हे देवाचे मध्यस्थ होते. ही दलाली त्यांनी नष्ट केली. ही मक्तेदारी नष्ट केली. आणी इथे देव व भक्त देव व वारकरी ही सरळ सरळ शक्ती पीठ निर्माण केले. त्यांनी ब्राम्हणी एजंट संपूवन गुरू परंपरा निर्माण केली. त्यांनी परंपराची चौकट निर्माण तोडली गुरू कोणत्याही जातीचा चालेल. ब्राह्मण व मुसलीम युतीने धुमाकुळ सुरू केला. या अतीरेकी पणात जो अत्याचार माजला होता तो नष्ट करण्याचा पहिला प्रयत्न तुकारामनी व संत संतांजीने केला. इथे त्यांनी मुळात शिष्य परंपराच नष्ट केली महंत व पंत यांच्या मठात हुकूमशाही अन्याय करता यांना प्रतिष्ठा आली होती. असली प्रतिष्ठा त्यांच्या डोळ्या समोर संत संताजीनी शब्दाशा पायदळी तुडवली हे एैतिहासकी कार्य करणारे संताजी हे काबाड कष्ट करणारे. टाळ कुटणारे नुसते लेखनाचे ओझे वहाणारे समजून त्यांचा जयजयकार करणे. त्यांनी किंवा तुकोबांनी चमत्कार केले समजुन जय जय कार करणे म्हणजे भक्ती. चमत्कार हे या दोघांनी केलेलेच नाहीत. पेशवाईत संताजी व तुकोबांना बंदी होती. जवळ जवळ शंभर वर्षाच्या काळा नंतर महिपतीने तुकाराम चरित्र लिहिले. या वेळी एैकीव व रसभरीत वर्णन करताना त्याने तुकारामांच्या जीवनावर चमत्कार खपवलेत हे चमत्कार किती खोटे असावेत हे आपन सुज्ञ पने ठरवावेत.