- मोहन देशमाने, ओबीसी सेवा संघ
आर्यांच्या पुर्वी देशात मातृसत्ता कुटूंब पद्धत होती. त्याचे प्रतिक म्हणुन आजही देवी पुजली जाते. महाराष्ट्राची कुलदेवता म्हणुन भवानी माता आहे. तीचा शोध हा सिन्नर येथे राज्य करणार्या यादवा पासून सुरू होतो. सिन्नर, जुन्नर हे जवळ होते. आणी या वेळी तेली मंडळी येथून आपला पलंग भवानी मातेला घेऊन जात असावेत किंवा या समाजाला देवीचे सेवेकेरी म्हणून मान असावा. ती परंपरा आज ही घोडेंगावातून सुरू आहे. घोडनदीच्या काठावर वसलेले घोडेगाव. या गावचे चिलेकर, त्याही पुर्वी इतिहास सागतो आगदी शिवकाळात पुणे परीसरातील तेली बांधव आपला व्यवसाय संभाळून हातावर भाकरी घेऊन प्रसंगी स्वराज्यासाठी लढत पुण्याच्या पंचक्रोशीत तेली समाज आपली हुकमत ठेवून होता. मावळ भागातील वाकड पौड यासारख्या गावात समाजाने आपली हुकमत ठेवलेली होती. शिव काळात ही हुकमत वाकडच्या चिलेकरांनी कमवली होती. तेच चिलेकर घोडेगांव येथे स्थलांतरीत झाले. काही शतकांनी कै. रामचंद्र चिलेकर व त्यांचे भाऊ नशीबाला बळकटी येण्यासरठी भिमा शंकर डोंगरांच्या रांगेतून वाट काढत मुंबईला पोहचले.
मुंबईला तेंव्हा कुठे बरे दिवस येऊ पहात होते. याच मुंबईत चिलेकर बंधूंनी काम न शोधता मिळेल तो किंवा जमेल तो किंवा बरा चालेल तो उद्योग निवडला. या मिळालेल्या उद्योगात रममान होऊन कै. रामचंद्र चिलेकर मुंबईकर झाले. त्याचे भिकाजी चिलेकर हे चिरंजीव शालेय शिक्षण तसे कमीच पण गुजराथी व कच्छी भाषेवर फार मोठे प्रभुत्व, त्यामुळे मराठी माणुस म्हणुन सहज ओळखु शकत नव्हते. मातृभाषा नसून ही ते मातृभाषे सारखे बोलत त्यामुळे बराच फायदा त्यांना त्यांच्या आयुष्यात झाला. यातून व्यवसाय जेवढा महत्वाचा तेवढाच समाज निष्ठा महत्वाची. मुंबईच्या काँटन विंग मध्ये ते घराघरात पोहचले होते. सन 1955 मध्ये सोबत्यांना घेऊन नवरात्र उत्सव सुरू केला. त्यावेळी हा उत्सव तुरळक पने साजरा करीत. दांउीया तर फक्त गुजराथी समाजाचा असे. परंतू चिलेकरांच्या नेतृत्वाने सुरू झालेला नवरात्र उत्सव लोकप्रिय झाला. गुजराथी बांधव सह सर्व समाज त्यात सामील असत. नंतर त्याच ठिकाणी गणेश उत्सव ही सुरू केला. सन 1955 ते 1990 पर्यंत 35 वर्षै ते या उत्सव कमीटीचे अध्यक्ष ही होते . कै. भिकाजी चिलेकरांची नोंद ठेवावी बाब म्हणजे. भोर जवळच्या नदी काठावरून एक कामगार म्हणून मुंबईत आलेले दादा कोंडके यांची भेट झाली. कोंडके उमेदवारी करीत होते. विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचे प्रयोग घ्या मानधन द्याल तेवढे द्या. आशा या वेळी चिलेकरांनी आपल्या मंडळा मार्फत दादा कोंडक्यांची विच्छा माझी पुरी करा हा प्रत्यक्ष प्रयोग घेऊन सोबत दिली. भविष्यात नावा रूपाला आलेली बरेच हिंदी व मराठी गायक कलाकार यांना स्टेजच मिळत नसे परंतू चिलेकर यांनी त्यांना मंडळा मार्फत प्रथम संधी दिली. कै. भिकाजी चिलेकर यांचे शिक्षण जरूर कमी होते परंतू सामाजीक विचाराची बैठक त्यांच्या कडे फार मोठी होती. त्यामुळे ते परिसरातील रहिवाश्यांचे प्रश्न समजुन घेऊन तडीस नेहत. त्यांच्या या कार्याचा उपयोग मुंबई काँग्रेसला चांगला झाला. कारण त्यांच्या परिसरात बहुतांश गिरणी कामगार होतेे. त्यांचे ते विश्वासू झाले अनेक आमदार होण्याच्या तयारीतील मंडळी चिलेकरांच्या संपर्कात असत. निवडीच्या वेळी सुद्धा त्याचा कानोसा घेतला जात असे. त्यामुळे निवडणुकीत व निवडणूकी नंतर परिसराचा विकास आमदारांना करावाच लागे. इतका दबदबा या चिलेकरांनी स्वत: उभा केला. सहकारी सोसायटी सुरू केली. या संस्थेत काडेपेटी पासुन सर्व घरगुती मिळत या साठी चार गाळे ही घेतले होते. आज महाराष्ट्रात वारना बाजार, अपना बाजार या सारख्या ग्राहक हिताच्या सोसायट्या कार्यरथ आहेत. आशा सेसायटीची सुरूवात कै. भिकाजी चिलेकर यांनी आपल्या उमेदीच्या काळात केली ही एैतीहासीक बाब नोंद ठेवावी अशी आहे. वाकड, घोडेगांव, मुंबई या 300 वर्षाचा प्रवास चिलेकर कुंटूंबानी केला. पण मी तेली आहे हे विसरले नाहीत. लालबाग मध्ये बृ. मुंबई तिळवण तेली समाज ही अग्रगण्य संस्था. या संस्थेच्या उभारणीत सहभाग व काही काळ अध्यक्ष ही होते. समाज भुषण कै. हरिभाऊ डिंगोरकर यांचा घनिष्ठ संबंध त्यांचा मोठा व्यपार मुंबईतुन चाले. त्यामुळे चिलेकर डिंगोरकर मैत्री झाली. यातुनच श्री. संत संताजी समाधी स्थळी सुदूंबरे येथे समाज कार्यात सहभागी होते.
चिलेकरांनी आपली मुलगी पुणे येथे अंबिके यांना दिली. होती त्यांचे जावई एस. के. एफ. कंपनीत नोकरीला होते. त्यामुळे कै. भिकाजी चिलेकर यांचे चिरंजीव श्री. दिलीप यांचे पुणे चिंचवड बरोबर लहान पणा पासुन संबंध. मुंबईच्या गर्दी पेक्षा हे शहर तसे शांत व निवांत वाटे त्यामुळे ते सोबतीला कोण नसेल तरी दादर ते चिंचवड हा प्रवास रेल्वेने एकट्याने वय वर्ष दहा पासूून सुरू केला. त्यांचा कल टेकनीकल बाजुला हीोता. म्हणुन त्यांनी मुंबईचीच नव्हे तर महाराष्ट्रातील दर्जेदर असलेल्या एलफिस्टन मध्ये प्रवेश प्रकीया सुरू केली. इथे नुसताच मार्कावर नव्हे तर पुर्व प्रवेश परिक्षा द्यावी लागे. यातील बुद्धीमत्तेवर प्रवेश मिळे. दिलीप चिलेकर प्रवेश पात्र परिक्षेत यशस्वी झाले. पण इथे संप सुरू होता. अभ्याक्रम कधी सुरू होईल म्हणून विचारणा करताच समजले याचा काही फरवसा नव्हता. म्हणून त्यांनी चिंचवड गाठले. चिंचवड मध्ये जैन टेक्नीकल शाळा दर्जेदार होती. उद्योग नगरीला कुशल कामगार व तंत्रज्ञान ते देत होते. इथे दिलीप शेठ यांनी प्रवेश घेतला. या प्रवेशा मुळे एक झाले. चिलेकर कुटूंबीय हळु हळु चिंचवडच्या मातीत उभे राहिले. श्री. दिलीप चिलेकर यांनी इलेक्ट्रीक इंजीनीयर ही पदवी मिळवली. पदवी मिळताच फिनोलॅक्स कंपनीत नोकरी सुरू केली. चिलेकरांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला कळुन चुकते वेगळा विचार, आचार व कृती यात घडण झालेले हे व्यक्तीमत्व मनस्वी जिद्द व त्यासाठी कष्ट करण्याची माणसीकता अंगात भिनलेली. फिनोलेक्स कंपनीची नोकरी बरी होती. पण मी वेगळे विश्व निर्माण करू शकतो हा विश्वास शांत बसू देईना. यातूनच अशिया खंडातील एक नंबरच्या औद्योगीक वसाहतीत चिंचवड येथे कंपनी सुरू केली. परंतू नोकरी सोउली नाही. तिसर्या शिफ्टला कामाला जात, कामावरून कंपनी. विश्रांती रोज 3/4 तास आणी इथे अखंड, अवरित श्रम घेतले आणी पहिल्याच वर्षी कंपनी नफ्यात आली. आता उमेद आली. जिद्दीला महामार्ग मिळाला आणी श्री दिलीप चिलेकर यांनी फिनेलेक्सची नोकरी सोडली नोकरी करताना कामगारा बरोबर सायकल मारत कंपनी गाठणारे चिलेकर कामगार जीवन जगत होते. कामगारांच्या वेदना सहन करीत होते. त्या आपल्या सोबत्यावर जीवापाड प्रेम. फिनोलेक्सची नोकरी पाच वर्षाची झाली होती. नोकरी सोडताना कंपनीने फंड व इतर रक्कम रोख दिली. परंतू चिलेकरांनी ते पैसे स्वत:ला न घेता कामगार वेलफेअर फंडात जमा केले. दुसर्याच्या आनंदात आपला आनंद मानणे. त्यांच्या दुखाला आपले दु:ख माणने या स्वाभावाने ते आज ही आपल्या कंपनीत वावरतात. याच बळावर त्यांनी आपला उद्योग उद्योग नगरीत नावा रूपास आणला आहे.
कै. भिकाजी चिलेकर हे कमी शिक्षणातून ते माणूस पहिले घडले. हे घडले म्हणून त्यांनी मुंबई परिसरात रहिवाश्यासाठी व तेली समाजासाठी कष्ट उपसले. त्यांच्याच संस्कारात श्री. दिलीप चिलेकर घडले. पिंपरी चिंचवड या परिसरात चिंचवडगाव, भोसरी, वाकड याच परिसरात पिड्यान पिड्या रहणारे बांधव आहेत. ही उद्योग नगरी आकाराला येताच हाराष्ट्रातुन व देशातून समाज बांधव येऊ लागले. सर्व बांधवांचे विविध प्रश्न आवासून उभे होते. या पुर्वी ही हे प्रश्न सोडविण्यासाठी काही धडपड झाली होती परंतू त्याला मर्यादा होत्या. याच वेळी पिंपरी चिंचवड महानगर पालीकेचे प्रशासन अधीकारी श्री. बाळासोा. गेनूजी शेलार सेवा निवृत्त झाले. आज पिंपरी चिंचवड महानगर पालीकाला जो आकार व विकास झाला यात प्रशासन अधीकारी म्हणुन बाळासाहेब शेलांरांचे कर्तव्य ही महत्वाचे आहे. हे असे कुशाल प्रशासक समाजाला मिळाले. श्री. पोपटराव पिंगळे एक सरळ स्वच्छ व निर्भीड बांधव. समाजाच्या हीतासाठी प्रसंगी एकटे पडतील पण समाजाचे अहित होऊ देणार नाहीत. चांगल्या कामासाठी सतत आपला खिसा रिकामा करणार. एक रूपया सुद्धा वायफळ गेला नाही पाहिजे इतकी करडी नजर. आपल्या आई वडीलांच्या इच्छेखातर संत संताजी पालखी सोहळ्यास सामील होत होते. या वेळी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे महाराष्ट्र घडवणारे. स्वराज्याला छ. शिवरायांना अनुकल भुमीनिर्माण करणारे श्री. संत संताजी सुदंबरे ते पंढरपूर जातात पण त्यांची पालखी तशी साधीच होती. आई वडीलांनी इच्छा व्यक्त केली त्या इच्छेखातर नवी चांदी पालखी पालखी सोहळ्यास दिली., वारकर्यांना पिण्याच्या पाण्याचा त्रास होत होता म्हणुन एक टाँकर दिला असे हे त्यागी व स्वच्छ व्यक्तीमत्व म्हणजे श्री. पोपटराव पिंगळे, श्री. शेलार, व श्री. पिंगळे, श्री चिलेकर एकत्र आले. कृती ही महत्वाची मानून वाट चाल करणारे एकत्र येतात तेंव्हा विकासाची सुरवात होते. पिंपरी चिंचवड तेली समाज संस्था स्थापन केली. नुसता वधु-वर मेळावा म्हणजे समाज कार्य नव्हे तर समाजाचे विविध प्रश्न संघटीत पणे सोडवणे म्हणजे समाज कार्य. याच साठी प्रथम प्रत्येक घरात जावुन समाजाचा सर्वे पुर्ण महाराष्ट्रात प्रथम रंगीत कुटूुंब परिचय पुस्तीका प्रसिद्ध केली. गुणवतांचे सत्कार समारंभ, महिला सक्षम साठी विविध कार्यक्रम राबवले. आज पुणे जिल्हा स्तरावर एक कार्यक्षम संस्था म्हणुन नावा रूपास आली.
या संस्थेचे संस्थापक श्री. बाळासाहबि शेलार कार्याध्यक्ष श्री. पोपटराव पिंगळे व अध्यक्ष श्री. दिलीप चिलेकर आहेत. चिलेकरांचे वधुवर मेळाव्यावर फार प्रेम हे का विचारता त्यानी सांगीतले 1992 च्या दरम्यान पिंपरी चिंचवड मध्ये झालेल्या पहिल्या वधूवर मेळाव्यात माझे लग्न जमले आहे. ही समाज निष्ठा आहे म्हणून त्यांनी पालखी सोहळ्याचा रथ वयोमाना मुळे खिळखिळा झाला होता. संस्थेने अव्हान करीताच नवा रथाचा खर्च नऊ लाख रूपये स्वत: उचलला व नव्या युगाचा आकर्षक रथ बनवुन दिला या बद्दल आपण सर्वच त्यांचे जाहीर आभार मानुया.
जय संताजी .