लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (2) वीरशैवीकरण म्हणजे लिंगायतांचे ब्राह्मणीकरण
लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली.
वीरशैवमताचे प्रतिपादन करणारा ग्रंथ म्हणजे सिद्धांतशिखमणी. सिद्धांतशिखमणीत 5-6 श्लोकात वीरशैव मत असा उल्लेख आला आहे. सिद्धांत शिखमणीत लिंगायत धर्म उल्लेख नाही. वीरशैव मत म्हंटले आहे धर्म कोठेच नाही. मत ही वेदातील काही ऋचा वर आधारित असतात. मत हे धर्म होऊ शकत नाही. दगडातून कोण जन्म घेईल, हे विज्ञानाच्या पातळीवर सिद्ध करता येत नाही. जर पंचाचार्य दगडातून जन्मले तर आत्ता का जन्म घेत नाहीत. सिद्धांतशिखमणीतील भरपूर गोष्टी या ऋग्वेदातील काही भागावर, उपनिषदे आणि आगम यावर आधारित आहे. शरणांनी षटस्थळ सांगितला पण या कृत्रिम सिद्धांत शिखमणीत या षटस्थल सिद्धांतावर आधारित एकशे एक वेगवेगळे स्थळ सांगितले आहेत. या मध्ये फक्त षटस्थळ सिध्दातांचे वैदिकीकरण करणे हाच हेतू दिसतो. मूळ भक्त महेश प्रसादी प्राण शरण आणि ऐक्य हे सिद्धांत शरणांच्या अनुभवातून जन्मले. ते अवैदिक असतानाही त्याला वैदिकत्वाची नकली झालर घालण्याचे काम सिद्धांतशिखमणीकरांनी केले. त्यासाठी त्यांनी कृत्रिम रेणुकाचार्य निर्माण करून भाकडकथा रचल्या. खुद्द सिद्धांत शिखमणीत वीरशैव शब्दाची व्याख्या केली आहे,ती अशी- जे लोक लिंगाची सिंहासनावर ठेवून पूजा करतात ते वीरशैव आहेत. इष्टलिंग हे डाव्या हातावर घेऊन पूजा करतात. फक्त स्थावर लिंग सिंहासनावर किंवा जमिनीवर ठेवून पूजा करण्याची पद्धत आहे.
डॉ एम एम कलबुर्गी सरानी संशोधन करून पंचाचार्यांचे असली रूप आणि वीरशैव इतिहास भूगोल ही दोन पुस्तके लिहिली आहेत त्या पुस्तकांच्या आधारे खाली लिहीत आहे वीरशैव धर्म कोणता? मन्मथ स्वामींचा आणि वीरशैवांचा संबंध काय ? ज्या माऊलीने यज्ञाचा धिक्कार केला त्या माऊलीचा वीरशैव हा उल्लेख हे आमुचे खूप दुर्दैव आहे. मन्मथ स्वामी स्वतःला महात्मा बसवण्णाचे तान्हे बाळ म्हणतात. लिंगायतांनी डॉ एम एम कुलबर्गी सरांचे वीरशैवाचा इतिहास भूगोल आणि पंचाचार्यांचे असली रूप हे 2 पुस्तक वाचावी वीरशैव धर्म 7000 वर्षांपूर्वीचा नाही. आणि काशी हे पंचपीठात नव्हते. वीरशैव हि चतुराचार्य परंपरा आहे. बसवण्णा वचनात सांगतात, ब्राम्हण कितीही श्रेष्ठ उच्च झाला तरी आपल्या शेंडी आणि जाणव्याचा मोह टाळू शकत नाही. असे वचनात बसवण्णा श्रीशैल जगदगुरू पंडितराध्या विषयी लिहतात. यावरून हे दिसते पंचपिठाधीश पंचाचार्य हे ब्राह्मण आहे ते वैदिक आहे. लिंगायत हा पूर्णपणे अवैदिक धर्म आहे. काशी पीठ हा गोसावी लोकांचा मठ आहे. पंचपीठाच्या परिसरात लिंगायत नाहीत. लिंगायत स्थावरलिंगाची पूजा करत नाहीत. ते वेद पुराण आगम निगम शास्त्र जोतिष मानत नाहीत. लिंगायत हा विश्वधर्म आहे. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे ते हिंदू नाहीत किंवा वीरशैवही नाहीत ते फक्त लिंगायत आहेत. ते कायक दासोह समता समानता मानतात. आज पर्यंत काशी पिठाचे 62 जगद्गुरू झाले आहेत. यावरून काशी पीठ हे पाचवे पीठ म्हणून अलीकडे मान्यता पावले आहे. असे सिद्ध होते. रंभापुरी पिठाचे एकूण 387 जगद्गुरु झाले आहेत यावरून हे पीठ एकाच शतकात स्थापन झाले नाही असे सिद्ध होते. काशी वगळता इत्तर चार पीठ( रंभापुरी, उजैन, श्रीशैल,केदार) काशी पिठाच्या पूर्वीचे आहेत.त्यामुळे ते 4 पीठ चतुराचार्य नावाने ओळखले जात होते. काशीपीठ हा गोसाव्यांचा मठ आहे त्यांनी चतुराचार्याच्या साहाय्याने स्वतःला जगद्गुरू घोषित केले हे सर्व पंचाचार्य झाले.लिंगायत अवैदिक धर्म आहे तर वीरशैव वैदिक आहेत. लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवण्णा आहेत. वीरशैव आणि लिंगायत दोन्ही परस्पराहून वेगळे आहेत. जे स्थावरलिंगाची पूजा करतात ते लिंगायत नाहीत. मन्मथ स्वामी इष्टलिंगाशिवाय इतर देवांना अथवा स्थावर लिंगाला नमस्कार करणे वर्ज मानतात. मन्मथ स्वामींचे अभंग इष्टलिंग हृद्यावरी । अन्य देवा नमस्कारी ।। महापाप तया जोडे। तेणे अध:पात घडे।।करीता दुजे ठायी रती तेणे होय अधोगती ।। अंग लिंगासी अर्पिले। तेव्हा तयाचेची झाले ।। मन्मथ म्हणे नेणती धर्म। न पाहती धर्माधर्म ।। इष्टलिंग लोळत असे उरावरी । अन्य स्थावरा दंडवत घाली ।। त्याचे मुख देखता अंघोळी । वस्रसहित करावी।। अमान्य करुनी हृदयीचे लिंग । जो धरी स्थावरी भक्ती अंग ।। तो शिवभक्त नोहे केवळ सोंग । बहुरूपीयचे ।।
*या लेखाचे संदर्भग्रंथ:*
डॉ. एम एम कलबर्गी लिखित पंचाचार्यांचे असली रूप वीरशैव इतिहास आणि भूगोल सिद्धांतशिखमणीचे असंबद्ध सिद्धांत