या तालुक्यात समाज संख्या तशी कमी मंचर, घोडेगांव, अवसरी ही गावे सोडली तर तुरळक लोकसंख्या. त्यामुळे कळंब, भावडी, म्हळुंगे या गावाव्यतिरिक्त काही गावात २/३ घरे नाहीत तरी सुद्धा समाजाचा ठसा न पुसता येणारा. देवगीरीवर यादवांचे राज्य अनेक शतके होते. त्यांची भवानी माता हे दैवत होते. देवगीरी उध्वस्त झाल्यानंतर धाम धुमीच्या काळात सुरक्षित म्हणुन ब्रर्हाणनगर येथे जतन केली गेली. पुढे तुळजापुर येथे स्थिर झाली. जी जतन करण्याचे काम समाज बांधवांनी केले. काही संदर्भ पुसले गेले परंतु या महाराष्ट्राच्या देवतेचा अधीकृत मान पालचीचा बुर्हानगरच्या देवकरांकडे (भगत) यांच्याकडे आला तर पलंगाचा मान हा शेलार (पलंगे) यांच्याकडे आला. हा पलंग घोडेगाव येथे सुरू झाला. स्थानिक कारागीर तो बनवुन देतात. त्याची स्थापना घोडेगंाव येथे समाज वास्तुत होते. याच पलंगावर भवानी माता निद्रीस्त रहाते. ही सुरूवात का झाली ही परंपरा समाजाला का मिळाली याचे बरेच संदर्भ आज पुसले गेलेत परंतु एक नक्की असावे त्या एैतिहासीक काळात येथिल समाज बांधवाने पराक्रम असावेत आणि त्या बळावर हा मान किंवा हाक्क मिळला असणार. आसे अनुमान काढण्याशिवाय आज काहीच नाही.
व्यापार व उद्योग धंद्यात आपला ठसा आज ही समाजाने कायम ठेवला आहे. तंबाखु किराणा या क्षेत्रात बर्या पैकी बाजार पेठ समाजाकडे यशस्वी ही झालेत. आज भावडी गावचे सरपंच पद श्री. राजु तेली भुषवत आहेत. पिंपरी चिंचवडचे मा. नगरसेवक अभिमन्यु दहितुले व तळेगाव दाभाडे नगर पालीकेच्या मा. अध्यक्षा श्रीमती मिराताई फल्ले याच मातीतल्या खानेसुमारी ही जबाबदारी ती पुर्ण करिताना त्यांना समाज मनात अनेक अनुभव आले. खाणेसुमारी म्हणजे नुसती डोकी न मोजता प्रत्येक घराचे प्रश्न श्री. फल्ले सरांनी समजुन घेतले. आज पर्यंत घरा पर्यंत आलेला समाज ही एक बांधवांची समाधानी बाब. मोलमजुरी, छोटी दुकाने, हातगाड्या तुटपूंजी शेती यातुन आलेली आर्थीक, सामाजीक चणचण समोर आली समाजातील प्रत्येक १०० घरात ५० घरे ही या अवस्थेत अडकलीत. किमान २५ घरे ही मध्यमवर्गिय आहेत. नोकरी बर्या पैकी व्यवसाय करीत आहेत. उरलेली २५ घरे आर्थिक बाबत तशी खंबीर आहेत. परंतु एकमेका पासुन संवादापासुन संघटने पासून फार दूर. या दूर होण्यास जी काही कारणे आहेत त्या पैकी एक महत्वाचे कारण म्हणजे समाजातील सबल घरे ही आर्थिक बाबत लहान मोठा मानतात समाज पातळीवर आमच्या तालुक्यातच नव्हे तर सवत्रर् हा भेद दिसतो. यातुन संवादाची दरी दुरावते ही बाब समोर आली या बाबत मी पणा सोडला तर तालुक्या सह सर्वत्र संघटन रूजेल ही समाजाच्या पैशावर समाजाचा विकास मर्यादित स्वरूपात होऊ शकतो. शासनाने ओबीसी म्हणुन आनेक योजना आखल्या आहेत. ती राबवणारी यंत्रणा इतकी कुचकामी आहे की याचा निधी परत जातो. काबाड कष्ट करणार्यार बांधवांना याची कल्पनाही नसते कल्पना असेल तो हेलपाटे मारून शांत बसतो. यासाठी संघटनेने एकत्रीत प्रयत्न करून सर्व सामान्यांचा विकास साधावा.
खानेसुमारी करिताना सर्वश्री मारूती फल्ले, अध्यक्ष, वासुदेव कर्पे कार्याध्यक्ष, भरत फल्ले सदस्य, राजंद्र तेली उपाध्यक्ष, शक्ती कुमार दहितुले उपाध्यक्ष सोमनाथ फल्ले जिल्हा उपाध्यक्ष अरूणशेठ घाटकर, सुरेशयशेठ भागवत, विलास शेठ मेहर, लक्ष्मणशेठ शेलार, अशोक शेठ दळवी, संतोषशेठ कर्डीले, मनोजशेठ खेत्री, नितीनशेठ मेहर, समीर भागवत, नितीन दिवटे, सुरेशशेठ इडिंगोरकर, रामदास दिवटे महाराज, सौ.विद्याताई पन्हाळे, सौ. नयना चौधरी, मनिषा फल्ले, सौ. श्रिमती विजया डाके यांनी धडपड केली.