समाजातील गोरगरीब जनतेसाठी काम करणारा, त्यांना आपले म्हणुन समाजात काम करणारा समाजसेवक यांची समाजाला गरज आहे. समाजात अनेक संघटना काम करतात परंतु समाजाची गरज ओळखुन कार्य करणे गरजेचे आहे. केवळ प्रसिद्धीसाठी कार्य न करता समाजातील गरजु घटक केंद्र बिंदु माणून कार्य करणे गरजेचे आहे.
समाजातील पदाधिकार्यांनी आपण एक समाज सेवक आहोत हे प्रथम मनी बिंबले पाहिजे हे लक्षात घेवून निस्वार्थ कार्य केले तर ते एक महान कार्य हे कोणा एकाने होत नाही. तर अनेक कार्यकर्त्यानी एकत्र येवून होते. त्यांसाठी समाज संघटन करण्याची गरज आहे. समाज संघटन करतांना कार्यकर्त्यांकडे त्यागाची, कष्ट करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. समाजाची परिपुर्ण माहिती घेवून कार्य केले पाहिजे. कोणतेही पद नसतांना देखील समाजामध्ये चांगले काम करणांरी मानसे आहेत. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.
एकमेकां सहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ॥
या उक्ती प्रमाणे समाज संघटीत असल्यास समाज बांधवाच्या सुख:दु:खात सहभागी होवून एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण होते आणि समाजाची प्रगती होते. त्यांसाठी समाज संघटना आवश्यक आहे. पुर्वी गांवे छोटी होती, गावात पारंपारीक उद्योग व्यवसाय होते. समाजामध्ये एकी होती. एकमेकांचे विचारपुस व्हायची, सलोख्याचे संबंध असायचे. परंतु यंत्र युग आल्यानंतर पारंपारीक उद्योग नष्ट झाले. गांवे मोठी शहरे झाली, उदरनिर्वाहासाठी समाजाचे स्थलांतर होवू लागले. व्यापार, व्यवसाय, नोकरीसाठी गाव सोडुन शहरामध्ये रहाणे आवश्यक होवू लागले. जुनी घरे जावून शहरात फ्लॅट सिस्टिम निर्माण झाली. पुर्वीची एकत्र कुंटूबे विभक्त झाली. कामांमुळे मानसे एकमेकांना दुरावली गेली. त्यामुळे समाजाचे संघटन करणे आवशय्यक झालेला आहे.
पुर्वी पासुन गांवात समाजाची ट्रस्ट आहेत, धर्मशाळा, कार्यालये आहेत. परंतू समाज बांधवाची शहरामध्ये कुंटूब संख्या वाढत आहेत. त्यांचे सर्वेक्षण नसल्यामुळे सर्वेक्षण करणे गरजेचे झालेले आहे. नविन कुंटूंबाना समावून घेणे व संघटना वाढविणे आवश्यक आहे.
समाज संघटनेची गरज ओळखून मा. नामदार जयदत्त आण्णा क्षीरसागर (माजी मंत्री महोदय विद्यमान आमदार) राष्ट्रीय अध्यक्ष तैलीक साहू महासभा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार रामदासजी तडस साहेब (प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा) मा. हिराकाक चौधरी, आदरनिय गजान (नाना) शेलार साहेब, डॉ. भुषणजी करडीले सर, विजय रत्नपारखी साहेब यांनी समाजाचे संघटन करण्यावर भर देवून महाराष्ट्र पिंजुन काढलेला आहे. समाजाच्या संघटनासाठी पहिली पायरी म्हणुन मा. चंद्रकांतशेठ वाव्हळ (पुणे जिल्हा अध्यक्ष म. प्रां. तेली महासभा) यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही समाज सेवकांनी गावोगाव आपले समाज बांधवाची माहिती गोळा करून पश्चिम पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांची कुंटूब परिचय पुस्तीका तयार केलेली आहे.
समाजाची गरज ओळखून सामुदाईक विवाह सोहळे, मोफत वधुवर मेळावे, विद्यार्थ्यांसाठी कॉरीयर मार्गदर्शन, व्यवसाय मागदर्शन, उद्योग धंदे मार्गदर्शन, शिष्यवृत्ती कर्जाऊ शिष्यवृत्ती, गरजूना आर्थिक मदत, वैद्यकीय उपचार मदत, व्यवसाय पतपुरवठ्यासाठी मदत करणार्या शासकीय योजनांची माहिती देणारी शिबीरे वृद्धांसाठी पार्क, जेष्ठ नागरिकांसाठी सभागृह, जेष्इनागरिकांचे मेळावे आयोजित करणे, विद्यार्थी गुणगौरव, महिला आयोजीत करणे ह्या प्रकारची कार्य करण्याची सामाजिक संघटनेची गरज आहे.
या साठी जेष्ठ उपाध्यक्ष श्री. सत्यवानशेठ कहाणे, अनिल घाटकर, गजानन घाटकर, नंदकुमार घाटकर, दत्तात्रय केदारी, राजेश जगनाडे, बाळु कर्पे, संजय केदारी, विलास कहाणे, चक्रधर खळदकर, अतुल वाव्हळ, रूपेश कहाणे, नामदेव कहाणे, धर्मराज उबाळे, दिपक कहाणे, स्वप्निल बारमुख, नितीन कहाणे, सुभाष शिंदे, प्रकाश गिधे, मंगेश कहाणे, प्रयत्नशिल
शेवटी मी एवढेच सांगेल समाजापुढे कोणीही मोठा नाही. मनुष्य धर्म आहे, तो पाळलाच पाहिजे आणि हेवेदावे बाजुला ठेवून संताच्या शिकवणी प्रमाणे सर्वांशी आदरानेच वागले पाहिजे. एकमेकांच्या चुका न दाखविता चांगल्या कामांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आपण या समाजात जन्माला आलो हे आपले भाग्यच आहेच. त्या समाजाच्या ऋणातुन उतराई होण्यासाठी समाजाची सेवा करण्याची विघनहर्त्याकडून जी कृपा झाली आहे. त्यानुसार समाजाची आपलेकडून सेवा झाली पाहिजे.
समाज संघटन करा ही काळाची गरज आहे. समाजाची सेवा करा हिच ईश्वर सेवा आहे. जय संताजी ..
श्री. प्रदिप दत्तात्रय कर्पे,
खेड तालुका अध्यक्ष
महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा