दि. 1 डिसेंबर 2017 शुक्रवार रोजी अहमदनगरच्या आध्यात्मिक, पावन नगरीत - अहमदनगर महानगर व जिल्हा तेली गल्ली मासिक आयोजित भव्य-दिव्य असा राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा खुप थाटामाटात, उत्साहात यशस्वीपणे पार पाडला. सर्वांच्याच चेहर्यावर आनंदाचे, समाधानाचे, कार्य सफ लतेचे हास्यं दिसुन येत होते. पण माझं मन मात्र मला भुतकाळातच घेऊन जात होतं.....आणि या मेळाव्याच्या पहिल्या दिवसापासूनचा सर्व घटनाक्रम डोळयासमोरून हळूहळू पुढे सरकत होता.
साधारणत: जवळपास एक महिन्यापूर्वी तेलीगल्ली मासिकाचे संपादक आदरणीय श्री. मोहनराव देशमाने साहेब अहमदनगर येथे मेळाव्याचा विषय घेऊन आले असता बैठकीतुन, चर्चेतुन हा वधु-वर मेळावा अहमदनगर येथेच घ्यावा असे त्यांनी नम्रपणे सुचवले आणि अ.नगर च्या सर्व संताजी सेवकांनी उत्साहाने होकार दिला आणि श्री. देशमाने साहेबांनी सुचवल्याप्रमाणे हा मेळावा मोफतच् घ्यायचा असे सर्व समाजसेवकांनी मान्य केले. प्रथम, या मोफत मेळाव्याची संकल्पना सर्वांनी मिळून कशी अंमलात आणायची यावर सर्व समाजसेवकांनी, वेळोवेळी आपसांत बैठका घेऊन, सुचना मांडून, कल्पना मांडून, काहीतरी आगळं वेगळं, आदर्श करून दाखवायचं ठरवलं. मोफ त मेळावा म्हणजे असणार तरी कसा ?... नेमकं काय ?...असे किती तरी वेळा वाटायचे, नंतर मात्र हळूहळू कळत गेलं...आपल्या समाजातील तळागाळातील, कष्टकरी, सामान्य कुटूंबातील, मध्यमवर्गीय समाज बांधवाला किंवा भगिनीला आपल्या पाल्याच्या वधु-वर परिचय मेळाव्याच्या साध्या प्रवेश फ ॉम पासून ते मेळाव्यातील जेवण, पाणी, चहा (किती ही वेळेस घ्या) साठी एक नवा पै द्यावा लागणार नाही. सोबत आलेल्या कुटूंबियांना सुध्दा कोणतेही शुल्क आकारले गेले जाणार नाही. पहिले हे विशेष उल्लेखनीय, आणि हेच आगळे वेगळे पण समाजासमोर आदर्श म्हणून ठेवायचं, हेच उदिष्ट अ.नगर समाज सेवकांचे आता जणु काही ध्येय ठरले होते.
आता पुढील आव्हान आ म्हणून उभे होते. हा मेळावा मोफ त घ्यायचा, पण त्यासाठी लागणारा आर्थिक भार, कसा हलका करायचा?... मेळाव्यासाठी अध्यक्ष महोदय कोण असणार?... मेळावा घ्यायचा कोठे?... मनुष्यबळ किती आहे ?... मेळाव्यासाठी लागणारी साधन संपत्ती ?... इ. अनेक प्रश्न अधुनमधुन घेतलेल्या बैठकीतुन हळूहळू निकाली लागत गेले. आणि एक मुखाने, एका दिलाने आपल्याच् तेली समाजातील प्रसिध्द उद्योजक श्री. सोमनाथशेठ देवकर यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारावी असे सर्व समाज सेवकबाधवांनी सुचविले आणि त्यांच्या अध्यक्षते खाली हा मेळावा यशस्वी करून दाखवायचे ठरवले.
आम्हाला चांगलं आठवतयं...या मेळावासाठी अपेक्षित असणारा आर्थिक भार पाहिला असता...एक लक्षात आले की... हे शिवधनुष्य कोण्या एकटयाने उचलणे शक्यच् नाही... मग आम्ही सर्व समाजसेवकांनी आपल्याच् समाजातील अतिशय सामान्य कुटूंबातुन आलेल्या, शुन्यातुन विश्व निर्माण केलेल्या, आणि समाजाचे खरचं भुषण असलेल्या समाजबांधवाकडे जाऊन त्यांच्याकडून हा निधी जमवला, आणि त्यांनीही कोणतेही आढेवेढे न घेता सढळ हाताने समाजकार्य म्हणून सहकार्य केले. यामध्ये अहमदनगर येथील उद्योजक श्री. रामनाथ जगन्नाथ गवळी, जेष्ठ समाजसेवक श्री. काशीनाथ तुकाराम गाडेकर, प्रसिध्द तेल व्यापारी श्री. दिलीप केदारनाथ दारूणकर, प्रसिध्द उद्योजक श्री. शिरीष अमृतशेठ पन्हाळे, पूणे येथील प्रसिध्द केटरींग व्यावसायिक श्री. कांतीलालजी माकुडे, अ.नगर एम.आय.डी.सी. मधील प्रसिध्द उद्योजक श्री. मुरलीधर हैबतराव राऊत, अ.नगर शहरातील आध्यात्मिक, वारकरी सांप्रदायातील ह.भ.प. श्री. रामदास महाराज क्षिरसागर, अ.नगर जिल्हयातील प्रसिध्द व्यावसायिक, उद्योजक श्री. ज्ञानेश्वर गंगाधर दहितुले आणि त्याचबरोबर अ.नगर मधील प्रसिध्द कांदा व्यावसायिक श्री. राहूल अशोक म्हस्के, वैद्यकीय क्षेत्रातील एक प्रसिध्द नाव म्हणून नावाजलेले डॉ. बाबासाहेब दादासाहेब वालझाडे (राहूरी, जि. अ.नगर), आणि वाघोली, जि. पुणे प्रसिध्द व्यावसायिक, समाजसेवक, समाजाचे भुषण श्री. प्रदीप प्रकाशशेठ उबाळे, मुंबई स्थित असलेले, प्रसिध्द इंड्रस्टिअॅलिस्ट म्हणून जे ओळखले जातात, असे श्री. राजेंद्र लक्ष्मण चिंचकर आणि अ.नगर शहरातील रेडिमेड कपडयाच्या व्यवसायातील व त्याचबरोबर इलेट्रॉनिक्स वस्तुंच्या उत्पादनाच्या व्यवसायातील एक प्रसिध्द हसमुख, तरूण व्यक्तीमत्व श्री. श्रीप्रसाद (बबलुशेठ) श्रीराम पतके आणि त्याचबरोबर अ.नगर शहरातील अल्पावधीतच् नावाजलेले प्रसिध्द बालरोग तज्ञ डॉ. श्री. गौरव चंद्रकांत मचाले या सर्वांनी या मेळाव्यासाठी आपला सिंहाचा वाटा उचलला आणि मेळावा यशस्वी करण्यासाठी फार मोलाचे सहकार्य केले.
यांच्यासोबत... अ.नगर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील, वाडयावस्तीवरील, समाजबांधवाने आपापल्या पध्दतीने खारीचा वाटा म्हणा, किंवा फु ल ना फु लाची पाकळी म्हणा.... आपापल्या व्यवसायाची, कुटूंबियाची संपूर्ण माहिती, फ ोटोसहित जाहिरातीच्या माध्यमाने देऊन या समाजकार्यास खर्या अर्थाने हातभार लावला. हे सर्व गोळा करण्यासाठी अ.नगर समाजसेवक अहमदनगर जिल्हा अक्षरश: पिंजून काढत होते, प्रसंगी शारिरीक, मानसिक, आर्थिक झळ सोसत होते, आणि... हे सर्व हसतमुखाने आनंदाने करत होते. हे विशेष.
याच बरोबर अ.नगर जिल्हा, तालुके पिंजून काढल्यानंतर दुसरे उद्दिष्ट समोर होते. ते म्हणजे...अहमदनगर शहरातील स्थानिक समाजबांधवाच्या प्रत्यक्ष गाठी भेटी घेऊन, त्यांच्याही जाहिराती घेऊन मेळाव्यासाठी हातभार लावणे हे सर्व समाजबांधवानी समाजसेवकांनी ठरविले. हे काम स्थानिक पातळीवर करायचे म्हणजे एक प्रकारचे दिव्यच् असायचे. म्हणजे... दिवसभर प्रत्येक समाजबांधव, समाजसेवक आपापला व्यवसाय, नोकरी करायचा आणि संध्याकाळपासून पुढे, प्रत्येक गल्ली, बोळातील, कॉलनीतील, बंगल्यातील समाजबांधवाकडे जायचा (सोबत 10 ते 15 समाजसेवक असायचे) आणि त्यांच्याकडून जाहिरात माध्यमातुन निधी गोळा करायचा. एक गोष्ट मात्र मला नमुद करावीशी वाटते... प्रत्येक जाहिरातदार समाजबांधव आपल्या मेळाव्याला सहकार्य देत होता. त्यामुळे आम्हा समाजसेवकांना... हत्तीचं बळ मिळत होतं. खर्या अर्थाने... प्रेरणा मिळत होती किंबहूना आमचा लहानातला लहान जाहिरातदार समाजबांधवच्... आमचा प्रेरणास्थान वाटायचा. हे विशेष. या दरम्यान कोणी ही थंडीची, शरीराची, त्रासाची, तब्येतीची काळजी करत नव्हते, दररोज फ ोनवरून एकच प्रश्न असायचा एकमेकाला...आजचे सायंकाळचे ’शेडयुल’ काय? उत्तर लगेच तयार असायचे.
असे करता-करता 15 दिवस कसे सरले हेच कळले नाही. पण एक प्रश्न आम्हाला कायम विचारला जायचा, प्रत्येक घरा-घरात, समाजबांधवात तो म्हणजे जेवणाचा म्हणजे... अन्नदानाचा खर्च कोणी केला ?... कोण करणार ?... या मेळाव्याचं हेच आगळ वेगळ वैशिष्ट, आपल्याच् समाजातील एक समाज बांधवाने या मेळाव्यातील अन्नदानाचा (खर्या अर्थाने जगन्नाथाचा) रथ एकटयानेच ओढला, पण तेही काही विशिष्ट अटीवरच....जसे....त्याचं कोणीही नाव घेणार नाही, कोठेही नाव छापणार नाही, सत्कार नाही, हारतुरे नाही, फ ोटोसुध्दा काढायचा नाही. आणि अन्नदान कमी पडणार नाही, किती ही समाजबांधव येऊ दे, किती वेळा ही जेवू दे...अन्न कमी पडणार नाही...पडू देणार नाही, हेच या मेळाव्याचं आगळं वेगळं विशेष. आजही सर्वांना हाच प्रश्न पडतोय... कोण आहे हा आपला समाजबांधव ? सलाम या आपल्या समाज बांधवाला.
जसे अन्नदान...तसेच चहापान, जलदान (पिण्याच्या पाण्याची व्यवस्था) करणारे... हे सुध्दा आपलेच समाजबांधव. आपले समाजऋण फेडण्यात आजही ते धन्यता मानतात.... धन्य ते समाजबांधव.
मी अजुनही अ.नगर समाजसेवकांच्या सहनशीलतेची दाद देतो, शारिरीक, मानसिक, आर्थिक झळ सुरू असताना सहनशीलतेने काम चालू कसे ठेवावे....हे तुम्ही पुढे वाचल्यावर लक्षात घ्यालच...मला चागलं आठवतय...सर्व जिल्हयातील, राज्यातील, तालुक्यातील, स्थानिक पातळीवरच्या जाहिरातदार समाजबांधवाच्या व्यवसायाच्या जाहिराती, वधुवराचे जमा झालेले... भरलेले फ ॉर्मस् एकाच ठिकाणी डी.टी.पी. सेेंटर मध्ये गोळा झाले असता त्या प्रत्येक फ ॉर्मवरील नाव, पत्ता, मामाचे नाव, पालकाचे नाव, फ ोन नं., शिक्षण, रक्तगट इ. अनेक माहिती आमचे सर्व समाजबांधव अक्षरश: डोळयात तेल घालून तपासायचे (2200 फ ॉर्मस जमा झाले होते ), त्यांच्या चुका शोधायच्या, दुरूस्त करायच्या हे सर्व कामे दररोज दिवस रात्र एक करून (अक्षरश: रात्री 2.30, 3,तर कधी 4 वाजेपर्यंत) आमचा अ.नगरचे समाजसेवक वधुवर पुस्तिका बिनचुक कशी करता येईल याच विचाराने झपाटलेले होते. हे काम किती सहनशीलतेचे होते पण... तेही उत्साहात, आनंदाने करत होते.
या सहनशीलते बरोबरचं.....आमच्या अ.नगर सेवकांतील निर्णय घेण्याची क्षमता, अफ लातून ! एखाद्या महत्वाच्या वेळी, प्रसंगी कोणत्याही समाजसेवकाने घेतलेला निर्णय सर्व समाजसेवक मान्य करून, प्रसंगी स्वत:ची सुचना मांडून त्या निर्णयाची अंमलबजावणी करणार....नाही म्हणणार नाही...हे विशेष.
मला सांगताना विशेष आनंद होतोय....जसे जसे दिवस जात होते 1 डिसेंबरची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो. कारण उत्सुकुता शिगेला पोहोचली होती. आम्हाला वधु-वर पुस्तिका वधु-वरांच्या (जो व्यासपीठावर स्वत:चा परिचय करून देणार त्यालाच ही पुस्तिका मोफ त देणार - हा नियम) हातात घेताना पाहायची होती. आणि तो दिवस उजाडला. 1 डिसेंबर सकाळपासून माजी नगराध्यक्ष कै. त्र्यंबक उर्फ सावळेराम रघुनाथ दारूणकर (कारभारी) सभागृह तुडूंब भरायला सुरूवात झाली, व्यासपीठावर आणि खाली वर-वधुची लांबच्या लांब अशी रांग असायची व्यासपीठावर येण्याची, स्वत:चा परिचय देण्याची... पालकवर्ग जिथे जाग मिळाली तिथे बसला, उभा होता. बाल्कनीसुध्दा भरलेली होती. सगळयांच्या चेहर्यावर हास्य, समाधान दिसत होते. सगळं काही ठरल्याप्रमाणे होतं होतं....चालत होतं....व्यासपीठावरील अहमदनगर समाज भगिनींचे सुत्र संचालन प्रेरणादायी पदोपदी जाणवत होते. सर्व शिस्तीत होते. सर्व वधु-वर पालकांच्या, चेहर्यावरील समाधान, खूप काही सांगून जात होतं. विशेष कौतुक म्हणजे काही वरांनी, वधुनी, पालकांनी या मेळाव्याच्या सर्व कार्यकारीणाला धन्यवाद देऊन आमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. धन्य पावलो आम्ही... कष्टाचं चीज झाले... उद्देश सफल झाला..... संताजी महाराजांचा आशिर्वाद मिळाला आम्हांला.
आणि हो......हे सर्व लिहीत असताना आणखी एक नमुद करावयासं आनंद वाटतो तो म्हणजे... हा मेळावा ज्या सभागृहात संपन्न झाला तो... सहजपणे उपलब्ध करून देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे आपलेच् जेष्ठ समाजबांधव मार्गदर्शक श्री. दिनकरराव घोडके साहेब, सचिव-अ.नगर तलाठी सेवा संघ महाराष्ट्रराज्य यांचे मेळाव्याच्या पहिल्या दिवशीपासून ते मेळावा संपेपर्यत ज्यांचे मार्गदर्शन सहकार्य लाभले...ही विशेष कौतुकाची, अभिमानाची बाब.
या मेळाव्याचं.......आणखी एक लक्षवेधक वैशिष्टं म्हणजे...... आपल्याच समाजातील संगमनेर येथील जेष्ठ श्री. नानाभाऊ भोत यांनी उपस्थित नोंदणी कृत वधु-वरांना (व्यासपीठावर येऊन स्वत:चा परिचय देणार्यांनाच फ क्त) प्रेरणा देण्यासाठी लकी ड्रॉ ची संधी उपलब्ध करून दिली ज्यामधुन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमाकांचे रोख रकमेस्वरूपात बक्षिसे दिली आणि एक चैतन्यमय वातावरण निर्माण केले...
आहे ना...आगळी वेगळी गंमत...वधु-वरांनी मोफ त फ ॉर्म भरायचा पण जाताना रक्कम घेऊन जायची आपल्या आई वडिलांच्या हातात ठेवण्यासाठी. हेच पुण्य कमावले. आदरणीय श्री. नानाभाऊनी. सलाम आपल्या प्रेरणादायी विचाराला जो समाजांसमोर आणला.
मेळाव्याच्या पहिल्या दिवशीच्या ते मेळावा संपन्न होईपर्यंतच्या या प्रवासात माझ्या लक्षात येत होते... मी निरीक्षण करत होतो...माझ्या प्रत्येक समाजबांधवाच्या व्यक्तित्वाच्या... त्याच्या अंतरंगातील कौशल्यांचा आणि मी मनोमन प्रभावीत झालो होतो. आमचा समजाबांधव हा मेळावा... सफल करण्या साठी कायम झटणारा... कष्ट घेणारा... आणि विशेष म्हणजे... पडेल ते... मिळेल ते.... दिसेल ते... सांगेल ते... ऐकेल ते... काम करणारा. आमच्या सगळया समाजबांधवामध्ये बरचेसे स्कील्स् आहेत हे माझ्या लक्षात आले....ते म्हणजे उत्कृष्ट टीम वर्क, लीडरशीप, संवाद कौशल्य (कम्युनिकेशन स्कील्स्) आपापसातील संबंध (इंटर पर्सनल रिलेशन शीप), वेळेचे नियोजन (टाइम मॅनेजमेंट), चिकाटी, जिद्द, परफे क्शन, निर्णय घेण्याची क्षमता (डिसीजन मेकिंग अॅबिलीटी), खुल्या विचारांचा स्वभाव ...धेय्ये निश्चिती (गोल सेंटिग)...बांधीलकी (कमिटमेंट) आणि हे सर्व करताना चेहर्यावर नेहमी हास्य (स्माइली फे स)... हसमुख चेहरा !
आणि हे...सर्व जण एकाच ठिकाणी, एकाच सभागृहात, एकाच ध्येयासाठी, एका-एका वरासाठी-वधुसाठी-पालकांच्या चेहर्यावर समाधानाचे हास्य फु लविण्यासाठी झटत होते...तेव्हा त्यांच्या पाठीवर उपस्थित वधु-वर, पालक, सर्व दूरहून आलेल्या प्रत्येक लहान-थोर समाज बंधू-भगिनींची कौतुकाची थाप मिळत होती....तेव्हा मला मनोमन असं वाटत होतं....श्री. संत संताजी महाराजांचा प्रेमळ, आशिर्वादरूपी हात सर्वांच्या पाठीवरून फिरत होता....त्या माऊलीला कोटी कोटी प्रणाम !
जय संताजी
प्रा. श्रीकांत गणपतअप्पा सोनटक्के
संताजी सेवक अ.नगर.