खेड तालुक्याचा मागोवा घेताना श्री. सत्यवानशेठ कहाणे यांनी अनेक संदर्भ देऊन परिवर्तनाचा वारसा मांडला व त्यात वळो वेळी भर ही कशी टाकली हे ही स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजीक व धार्मिक क्षेत्रात जे परिवर्तन घडले त्यातं राजगुरूनगर शहराचा वाटा मोठा आहे. पुर्वी हे छोटे गाव एैतिहासिक घडामोडीचे केंद्र याच ठिकाणची मथाबाई ही चाकणच्या जगनाडे घराण्यात दिलेली. संत तुकारामांच्या सामाजीक धार्मीक व राजकीय परिवर्तनाच्या लढाईत संत संताजी जगनाडे हे म्होरके नव्हे तर सरसेनापती होते. या लढाईत मथाबाई याही संताजींच्या खादंयाला खांदा देऊन लढल्या हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. एका स्त्रीने मंबाजी गोसावी सारख्या धर्म मार्तंडाचा अतोनात सामाजीक छळ ही सहन केला. या मथाबाईने लढाई लढताना सांसाराचा गाढा ओढला. आपला मुलगा बाळाजी व मुलगी भागुबाई यांना परिवर्तनाचे संस्कार दिले. यातुनच त्यांनी अभंग रचना केल्या त्यातील काही नष्ट ही झाल्या पण त्यांच्या काही अभंग रचना आज ही अस्तीत्वात आहेत हे इतिहास सांगतो रामेश्वर शास्त्रीनी तुकोबांना जाहिर शिक्षा सुनावली तेंव्हा तुकोबाकडील सर्व लिखीत अभंग इंद्रायणीत बुडवणे व त्यांना बहिष्कृत करणे हा न्याय दिला तेंव्हा धर्ममार्तंडाचा हा कायदा पायदळी तुडवायचा हा निश्चय संताजींनी केला. तेंव्हा ही समाजाची महान स्त्री संताजी सह उभी राहिली. महिला शक्ती जागी केली. तोंटपाट अभंग संताजीकडे दिले. परिसरातील महिलांना संघटीत करून अभंग गाथा घेऊन संताजी महाराज १३ व्या दिवशी तुकारामाकडे निघाले तेंव्हा महिलांचे नेतृत्व या मथाबाईंनी केले. मंबाजी गोसावी, आप्पा गोसावी रामश्वर भट या धमर्र्मार्तडाचा कायदा पायदळी तुडवून पुढे शेकडो वर्षाचा नवा इतिहास निर्माण करण्यास या मथाबाईचा मोठा सहभाग. ती कहाणे घराण्याची होती. हा आमचा वारसा असे श्री. सत्यवानशेठ कहाणे यांनी स्पष्ट केले.
सत्यवान शेठ कहाणे हे एक वयाची ७५ वर्षांची वाटचाल पुर्ण करणारे घरातील कै. वसंतराव, श्री. शशीकांत, श्री. मुरलीधर यांना बरोबर घेऊन उद्योगात उभे राहिले. भुसार माल ठोक व करकोळ विक्री करू लागले यातुन ऑईल मिल व इतर व्यवसायात आपला ठसा उमटवला. संघटन, समाज सेवा, त्याग कमावर निष्ठा ही आपली विचार ठेवण निर्माण केलेले बांधव, मंडल आयोगाची राखीव जागा मिळण्याच्या कामा पुर्वी ते खेडगावच्या ग्रामपंचायत सदस्यपदी निवडूण गेले. सामान्य माणसासाठी धडपडणे, त्यांचे प्रश्न सोडवणे त्या साठी प्रसंगी संघर्ष करणे ही प्रणाली वापरली त्यातुन आपला ठसा उमटवला यामुळे खेड तालुक्यातील राजकीय क्षेत्रात आदराचे स्थान निर्माण झाले. या मुळे ओबीसी असुनही राजकीय मडळींना त्यांची नोंद घ्यावी लागली. यातुनच पुणे जिल्हा परिषदेवर स्विकृत सदस्य म्हणुन निवड झाली. खेड व इतर जिल्हा तालुक्यांच्या आर्थिक विकासाची बांधीलकी स्विकारून उभ्या राहिलेल्या राजगुरनगर सहकारी बँकेत ते संचालक म्हणुन निवडून आले या बँके द्वारे गरजुनां व प्रामाणीक खातेदारांना सहकार्याचा केंद्र बिंदु त्यांनी मांडला त्यामुळे ते या बँकेच व्हाईस चेअरमन ही काही वर्ष होते. निष्ठा त्याग व धडपड जवळ असल्याने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या डायरेक्टर बोर्डावर ही ते काम करीत होते.
राजगुरू नगरची बाजारपेठ म्हणजे तालुक्याची बाजारपेठ ही बाजारपेठ एैतिहासीक बाजारपेठ शेकडो वर्षापासुन इथे तेली समाजाचा आपला ठसा. समाजाची अनेक घराणी आपला ठसा पिड्यान पिड्या संभाळुन आसलेले या शहरात समाजाची वास्तु पुर्वीच्या मंडळींनी इथे वास्तु उभारून जतन केलली या वास्तुत समाजाचे लहान मोठे धार्मीक कार्यक्रम होत. या वास्तुत समाजाच्या घडामोडी साठी विचार व आचार सभा होत. ही वास्तु रजिस्टर केलेली. या समाज संस्थेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर आली ही जिर्ण वास्तु वाापराविणा राहु लागली या वास्तुची नव्याने उभारणी व्हावी या साठी सोबती व ते आग्रही होते. यातुन लोक सहभागातुन वास्तु उभी करावयास सुरूवात केली. आज वास्तु उभारणी प्रगती पथावर आहे. वधु वर मेळावे ही आज व्यावसायिक केंद्रे निर्माण झालीत ती अधीक गर्दी खेचणारी व्हावीत या साठी भव्य दिव्य असावीत या साठी धडपडत आसतो. यातुन समाजाचा पैसा खर्च केला जातो. परंतू वधु-वर मेळावे साध्य स्वरूपात मोठ मोठ्या शहरात संपन्न होत होते. ग्रामिण भागात ती त्यांनी वधु वर मेळावा घ्यावा ही कल्पना त्याच्या समोर आली ती त्यांनी अभ्यासली व सर्वांना घेऊन उभे राहिले. महाराष्ट्रात प्रथम तालुका स्तरावर अल्पशा पैशात ३ ते ४ वर्ष वधु वर मेळावे यशस्वी करून या तालुक्यात नवा इतिहास निर्माण केला. साध्या पद्धतीचे हे मेळावे संस्थेला मदतीचा हात देण्यास ही सहाय्यभूत ठरले.
विखुरलेला विस्कळीत समाज या सामाजासाठी संघटन ही प्रणाली असावी ही इच्छा होती मार्ग निघत नव्हता श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ हे ग्रामीण पुणे जिल्हा अध्यक्ष होताच त्यांनी श्री. सत्यवान शेठ कहाणे यांना जेष्ठ उपाध्यक्ष म्हणनु जबाबदारी दिली. पारदर्शकता स्पष्ट मते, सहकार्याच्या अडचनी त्यांच्या कामाच्या मर्यादा समजुन घेऊन ते वयाची पंचाहत्तरी आली आसतानाही ते नुसते बैठकीतले मागदर्शक न होता. फिरू लागले. वाड्या वस्त्यावर सोबत्या बरोबर जाणे खानेसुमारी करणे मुद्रित पुस्तका साठी निधी संकलन करणे ही कामे करू लागले. या साठी जिल्हा स्तरावरील ६ ही तालुक्यातील पदाधीकारी ही त्यांची सेना होती. खेड तालुक्यातील सर्वश्री प्रदिप कर्पे तालुका अध्यक्ष, अनिलशेठ कहाणे, उपाध्यक्ष गजानन घाटकर उपाध्यक्ष नंदुशेठ घाटकर उपाध्यक्ष, दत्तात्रय केदारी कोषाध्यक्ष, गणेश कहाणे, सचिव, प्रकाशशेठ गिधे संघटक, अतुलशेठ व्हावळ संघटक, राजेश जगनाडे हिशोब तपासणीस स्वप्निल बारमुख प्रसिद्धी प्रमुख संजय केदारी स्विकृत सदस्य रूपेश कहाणे नामदेव कहाणे, बाळकृष्ण पिंगळे पांडुरंग जगनाडे, आनंद शेलार, सुर्यकांत खळदकर निलेश गिधे या व सर्व समाज बंधु भगीनीच्या सहकार्याने वाटचाल सुरू आहे.