हे शिर्षक प्रक्षोभक, मुर्खपणाचे, बावळट पणाचे प्रतिक वाटेल. परंतु बर्याच बांधवांना हे ही वाटेल हे कदाचित सत्य असावे. आणिा या सत्याकडे आपण वळणार आहेत. देव व देवाच्या व आपल्या मधील ब्राह्मण हे आपण समजतो. देवाच्या प्रत्येक कार्यात हे बा्रह्मण्य आज तरी लागते. कारण पुर्वीचा ब्राह्मण तेल्याचा घाणा तयाचा कर कर आवाज व तो चालवणारा तेली व त्यांचे तोंड अशुभ मानत होता. ज्याला ते धर्मशाास्त्र म्हणतात. त्या धर्मशास्त्रात त्यांनी तसे नमुद केले आहे. आता हे धर्मशास्९ कुठल्या देवाने लिहले नाही. हे धर्मशास्त्र ब्राह्मण्याने लिहिले. देव व आपण यांच्या मध्ये मध्यस्थी असलेले हे ब्राह्मण्य त्यांनी आपल्या सोईसाठी लिहुन ठेवले. ब्राह्मण्याचा संपुर्ण इतिहास बारकाईने पाहिला तर समजुन येईल. ज्या जाती, ज्या जमाती व ज्या समुहाने ब्राह्मण्याला कडाडून विरोध केला त्यांना त्यांनी बहिषकृत करून टाकले. हे करताना या जातींचे तेज, ईर्षा, संघर्ष, उतुंग अशाी मानवता, जग भेदण्याची परंपरा, संस्कृतीचा वारसा, पालापाचोळा करून त्यांना बहिष्कृत केले, त्यांना शक्तीहिन केले. त्यांच्यातील संघर्षाची गुर्मी गलितगात्र केली. पुढच्या अनेक पिड्या शाररीक, माणसीक, सामाजीक, आर्थीक बाबत दुबळ्या केल्या. आपल्यावरील अन्यायाला गर्वसे कहो करण्यात धन्य मानू लागले. जर आपल्यातील सत्याला भिडत असेल तर तो धर्माचा विध्वंसक म्हणून त्याचे चित्र रंगवले जाते. यातून जर तो यशस्वी झाला तर हे ब्राह्मण सरळ सरळ शरण जातो सरळ सरळ साधण्याचे नाट्य तयार करते. हे नाट्य यशस्वी होताच. ब्राह्मण्याचा हा कर्दन काळ एकतर नावानिशी संपवतो. नाहीतर ब्राह्मण्याच तारण कर्ता म्हणून भविष्यात वावरू लागतो. नाहीतर मग त्या व्यक्ती विषयी इतका गोंधळ असतो कि संदर्भ हीन म्हणून बराच काळ वावर आसतो. या तिन बाबी या ठिकाणी घडल्या जातात. संत तुकारामांच्या बाबत, संत संताजी बाबत नेमके हे घडले आहे. संत संताजींना नावा निशी, संदर्भा निशी इतिहासातून संपवून टाकले होते. महिपतीने चुकून एक अभंग लिहून ठेवला. ही चुक इतकी महागात पडली हा ज्वालामुखी राखरांगोळी करणार हे ज्ञात होताच फक्त कपाळगंध गळ्यात तुळशीच्या माळा व अभंग लिहिणारी प्रतिमा एवढा पुरता संदर्भ ठेवला. जोडीला जय संताजी ही गर्जना. या पेक्षा संत संताजी नेमके काय आहेत. त्यांची एैतिहासिक भुमीका काय ? त्यांची ब्राह्मण्याशाी युद्धे कोणती त्यात त्यांचा महान विजय कोणाता हा विजय पुसून टाकण्याची कटकारस्थाने एैतिहासिक काळा पासुन आजपर्यंत कोणी व का केली याचा शोध घेणे ही माझ्या जीवनाची मी पाऊल वाट समजतो. म्हणुन परत म्हणतो नशीब लिहीणार्या देवाचे संताजी बाप होते.
मी वयाच्या १६/१५ वर्षा पर्यंत म्हणजे संस्कारक्षम वयात. घरच्या बैलाला झापड बांधुन वडील व आजोबांच्या मागदर्शनाने घाने घेतले बैल जसा झापड बांधताच त्याच घानवडीत दिवसभर फिरतो. आणि रात्र होताच विश्रांती घेतो. अगदी तशी जीवन पद्धती या जाती व्यवस्थेत समाजाची होती. झापड बांधून आपण चालत रहातो. पण आपले चालणे त्या घाणवडीत पुरते आसते. ही झापड काढली आणि आपण किंवा बैल फिरू लागलो तर काही वेळात चक्कर येऊन कपाळ मोक्ष होईल हे सत्य प्रथम समजुन घेऊ आपल्या डोळ्यावर बांधलेली जातीची झापड. ती झापड बांधणारे ब्राह्मण्य त्या ब्राह्मण्याच्या धाकातील राज्य सत्ता ही झापड तुटू शकते. आपण फेकू शकतो आणी मानवी जीवनाला समतेच्या वाटेवर घेऊन जाऊ शकतो. ब्राह्मण्याने बनवलेल्या धर्म विचाराला खर्या अर्थाने जेंव्हा ग्लानी येते तेंव्हा त्या त्या जात समुहातून प्रतिकार करणारे निर्माण होतात. हा सोशितांचा खरा इतिहास दडपून टाकला तरी उफाळून वर येतो. संत नामदेवांच्या नेतृत्वा खाली आठरा पगड जातीचे संत एकत्र येऊन मस्तवाले ब्राह्मणशाही, क्षत्रीयशाही पाया खाली तुडवली. शेकडो वर्षानी ब्राह्मणपणाचे व मुस्लीम सत्तेची बेरीज झाली. धर्मसत्त ब्राह्मण्याची राज्यसत्ता मुसलीमांची. याच मुळे जयराम स्वामी की जे एकनाथांचे गुरू होते तसे ते मुसलीम सत्तेच्या प्रशासनाचे एक प्रमुख होते. याच काळात नामदेवांची समता व मानवता दुर सारून विषमतेची पुन्हा मांडणी सुरू झाली. आशा वेळी संत नामदेवांनी स्वप्नात येऊन संत तुकारामांना सांगितले शब्द हे शस्त्र आहेत. नेटके म्हणजे नेमके काय तर ते अन्याय करणार्यांच्या विरोधातील आसावे. मी पुन्हा एक वेळ मांडतो. ब्राह्मण्याला संत संताजी संदर्भ हीन, इतिहासातील साधे एक पान नव्हे साधे एकही अक्षर का द्यायचे नव्हते एक तेली म्हणून एक उपेक्षित म्हणून, ब्राह्मण्याने ठरविलेला एक शुद्र मिळाला होता. परंंतु तो एक उच्चकोटीचा मार्ग होता. त्या मार्गावर जाताना त्यांनी झापड तोडली. झापड तोडली म्हणून त्यंाना न्याय मागणार्याच्या बाजूला सर्वत्र मरगळ मुकाट अन्याय सहन करणार्यांची पलटणच्या पलटण. अन्याय करणार्याच्या समोर नजर सोडाच पण मान वर करण्याची हिम्मत नव्हती. जर हिंमत्त केली आगदी चुकून किंवा नजर चुकीने तर एकमेकाचे सुख संभळणारी ब्राह्मण्य व मुसलीम पण त्या व्यक्तीला जगने कठिण करीत होती. आशा जातींना संत संताजींनी उभे केले. मानवतेचा, समतेचा नवा इतिहास घडविला.
रामदास स्वामी यांचे चरित्र नव्हे तर चारित्र्य काय होते हे ही बाजूला ठेऊ चारित्र्य संपन्न व्यक्तीच महानमानव घडवू शकते. हे सत्य आपन नजरे आडकरणे. स्वराज्याचा पाया खोदण्यासाठी संत तुकाराम व संत संताजी यांनी जी मेहनत घेतली. कवडी समान बनवून स्वातंत्रय उभारणीच्या वेळी विजापूरकरांच्या सावलीत असणारे रामदास व त्यांना शिवाजी महाराजांचे गुरू बनविण्यात ब्राह्मण्य गेल्या शे-दिडशे वर्षात यशस्वी झाले. ज्याचे चारित्र डागळलले आहे आशाला गुरू ठरवुन ब्राह्मण्यांन चारित्र्य संपन्न संताजींना, संत तुकारामांना आडगळीत टाकले. या देशातला प्रत्येक महापुरूष आम्ही घडविला ? आणि आम्ही जसे सांगतो अगदी तंतोतंत तसेच आहे. कारण आमच्या मुखातून देव बोलतो. ही कपट निती संताजी बाबत यशस्वीपणे राबवली गेली. देहूतील मंबाजीने साम, दाम, दंड या सव्र बाबींचा वापर आपल्या परिसरातील किंवा अधीकार क्षेत्रातील व्यक्तींना लागू केला. वेद हे आमचे आहेत. या वेदावर बोलण्याचा लिहिण्याचा, एैकण्याचा अधीकार फक्त आमचा परंतू वेदाला मागे टाकण्याचे विचार संताजी जगनाडे या परिसरात रूजवत असतील. बैलाच्या डोळ्यालाझापड बांधून घानवडीत दिवसभार बैलाबरोबर फिरणे ही जातीची कर्म सोउून जर करत असेल तर ? ब्राह्मण्य जुमानत नाही, वेद मानत नाही उलट ब्राह्मण्य जपणारे देव त्यांची वाटचाल बुजवून आम्हीच देव निर्माण करू शकतो ही सत्यता जन मानसात रूजवत असेल तर ? आपल्या घरचा भरभराटीचा उद्योग बाजूला सारून संत तुकाराम थांबले नाहीततर संताजींना सोबत घेऊन डोंगरावर चिंतन करून गावात येतात आपल्या कडील कर्जपत्रे नदीत बुडवतात व सर्व सामान्यांना मोकळा श्वास देतात. हा असा मोकळा श्वास सोडणारी सामान्य जनता म्हणजे तुकोबा. हे ओळखून समज गैरसमज माजवण्याची निती ही वापरली तेलघाना घेऊन सुखात जगणार्या संताजीला, त्यांचा वडिलांना घरातील सर्वांना त्यांनी समाजावले पण. ब्राह्मणाच्या विरोधात मत रूजवण्यात संताजींची पत्नीही सहभागी होते. रात्र आणि दिवस ती धडपडते तेव्हां त्यांच्या कुटुंबीयावर मारेकरी सोडणे हा ही प्रकार करून पाहिला. परंतू फरक नाही. या देशातील या जगातील सर्वत्र क्रुर काय असेल तर ब्राह्मण ते आपल्या हितासाठी, स्वार्थासाठी कोणत्याही मार्गाने आपले हित साधु पहाते. असे हित साधताना कपटनिती म्हणजे देव कार्य हा मुलामा देऊन वावरते. देहूतील मंबाजीला नक्की माहित होते ब्राह्मण्य संपवणारी ही मंडळी संपवायची असतील तर प्रथम त्यांच्यात फोडा फोडी झाली पाहिजे ती होत नाही. संत तुकारामांच्या महा लढ्यातील संताजी जोपर्यंत फुटणार नाहीत तो पर्यंत काही करू शकत नाही. पण हे शक्य नाही तेंव्हा मंबाजीने त्यावेळच्या धर्म व्यवस्थेप्रमाणे रामेश्वर शास्त्री, आप्पाजी गोसावी या मंडळीशाी चर्चा विनिमय केला. या वेळचा मोकाशी हा दादोजी कोंडदेव (कुलकर्णी) हेता. या सगळ्या मंडळींचा एक विचार झाला. वेद नाकारणारा वेदांना तुच्छ लेखणारा पंढरपूरात जात, पात, वय, स्त्रि पुरूष हे भेद नाकरून एक मेकाच्या पाया पडणे ब्राह्मणांनी इतर वर्णीच्या व्यक्तला मोठे मानणे. त्याचे मोठे पण मान्य करून पाया पडणे हा गुन्हा आहे. यावर मनुस्मृती, मिताक्षरी या सारख्या ग्रंथाचा धर्मशाांस्त्रांचा संदर्भ ही त्यात आला. आणि मग लिखीत स्वरूपात मंबाजीने दावा दाखल केला. आता न्याय मागणारा व न्याय देणारा एकच. फक्त शिक्षा ज्याला द्यावयाची तो वेगळा. इथे न्याय होऊ शकतो का ? इथे अन्याय होणार. कारण धर्मशास्त्र व राजसत्ता ही याच समुहाच्या हातात होती. संत तुकारामा बरोबर खरा खोट्याच्या निवाडात दिवणात फक्त संताजी असणार हे ही सत्य असावे. मनुस्मृतीत एक गुन्हा ब्राह्मण्येतरांनी केला तर त्या गुन्हाच्या स्वरूपात कठोर शिक्षा सुनावलेली आहे. आणिा त्याच आधारावर शिाक्षा ठोठावली. शिक्षा एैकताना संताजी शांतपणे एैकत होते. शिक्षा होती धर्माचे कायदे तुकोबांनी मोडलेत आणि त्यांच्या बरोबर असणारे जे कोण आहेत त्यांचा ही सहभाग या गुन्ह्यात प्रत्यक्ष असल्याने व दावा हुशारीन तुकोबा पुरता मर्यादित केल्यामुळे शिक्षे स्वरूपात जाहीर केले. तुकारामांची सर्व संपत्ती जप्त करावी ती ब्राह्मण्याला वाटून द्यावी. त्यांचे लिखीत अभंग इंद्रायणीच्या पाण्यात सर्वा समक्ष बुडवावेत आणि सर्वात मोठी तुकोबांचा बहिष्कृत करावे. जो त्यांना शिवल संपर्कात राहिल किंवा येईल त्याला ही अशीच शिक्षा मिळेल. निकाल जाहीर झाला. तुकोबा व संताजी देहू कडे निघालेत ते देहूत जाण्यापूर्वीच तशी दवंउी पिटली आहे सर्व मालमत्ताजप्त करण्याची तयार केली जात आहे नव्हे तर जप्त ही केली आहे. तुकोबांनी वह्या उचलल्या आहेत त्या इंद्रायणीत बुडवल्या आहेत. दिवणातील निकाल एैकल्या नंतर संताजी हे सर्व उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. पण मनात वेगळा विचार करून हाच विचार पुढे त्यांना संदर्भ हिन करण्यास पुरेसा ठरला.
छत्रपती शिवरायांनी ब्राह्मण आहे म्हणून त्याला शिक्षा नाही हा कायदा मानला नाही. महात्मा फुल्यांनी ब्राह्मण्या विरोधात लढाई सुरू ठेवली म्हणून त्यांच्यावर रामोशी व कुंभार समाजातील मारेकेरी घातले. डॉ. बाबासाहेब अंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्यावर समता मागीतली म्हणून हाल्ले करावयास ब्राह्मण्य पुढे होते. पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा शाहु महाराज उभा करीत असताना पुण्यात ब्राह्मणांनी काळी रांगोळी काडून ब्राह्मण पण दाखवले. ब्राह्मण्याच्य विरोधात जो उभा रहातो आशा प्रत्येक महामानवाला ब्रााह्मण्यांने ही शिक्षा सुनावलेली आहे. यात संत संताजी अपवाद नाहीत कारण फक्त याच कारणासाठी संताजी संदर्भहीन ठेवले गेले हे कारण कोणते याचा शोध घेणे महत्वाचे त्यापुर्वी काही बाबी पाहू. ब्राह्मण्य या देशातील नव्हे भटके, रानटी व संस्कृतह शुन्य समाज म्हणजे आर्य. स्थीर, मानवतावादी व सुसंस्कृत समाज म्हणजे येथील मुळ निवासी या उपर्या आर्या बरोबर शेकडो वर्ष संघर्श करणार येथिल समाज नवा इतिहास निर्माण करून होता. आर्यांचा सुरूवातीच्या काळात इंद्र ा राजा होता. नव्हे तर ते आपल्यातील प्रमुखाला इंद्र समजत. आशो शेकडो इंद्र होते. त्यांच्या नेतृत्वा खाली शेकडो वर्ष लढाई सुरू होती. कालातराने या इंद्रालाच ते देव मानत. इंद्र भ्रष्ट, चारित्र हिनतेने बदनाम झाले तेंव्हा त्यांनी ब्राह्म, विष्णु, महेश ही दैवते समोर आणली त्यांचा हा अतिरेक जेंव्हा यादव काळात समोर आला तेंव्हा यांनी या देवांना बाजुला सारून हळू हळू पंढरपूरच्या विठ्ठला जवळ ठाण मांडले. आणि ते सोईचे पंढरपूर तयार करून बिंबवू लागले. त्यांनी काळ नरूप देव निर्माण केले. जो निर्माता आसतो तो बाप असतो. याचा सरळ सरळ अर्थ आस ब्राह्मण्य हे देवाचे बाप आहे. म्हणून त्यांना अनेक भागात देवबप्पा म्हंटले जाते. तर आसा ब्राह्मण्य देवाचे बाप देव निर्माण करून आपल्याला सोईचे लेखन करून त्याला धर्मशास्त्र हे सांगून वावरणे व देवाच्या धाकात समाज देव ब्राह्मण्यांच्या मुठीत अशी व्यवस्था संत संताजी कालीन असल्याने संत तुकारामांना धर्म सत्तेने शिक्षा ठोठावली आयुष्यभर संसाराकडे पाठ करून पत्नी सह ही लढाई आपण लढलो. ब्राह्मण्या छताडावर उभे राहून सत्य असत्याचा निवाडा केला. सर्व सामन्य माणसाला उजाळून वाटा तयार केल्या तो त्या वाटेचा वाटसरू होऊ पहातोय. आशा या शेवटच्या टप्यात हा निवाडा धर्ममार्तंडांनी केला. ही लढाई जिंकता जिकंता हरू लागलो. संताजींनी काही क्षणच विचार केला. मी जर आता पळपूटा ठरलो तर माझ्या सारखा बेईमान इतिहासात कोन नसेल. धर्ममार्तंडांच्या आन्यायाचे महासागर होतील. तेंव्हा त्यांनी पक्के ठरवून लोक मानसात गेले. सत्ता तोंड पाठ असलेले अभंग लिहले. लोकमानसांना उजाळून दिलेल्या वाटा माहित होत्य त्या दिल्या म्हणून झोलेली शिक्षा पटवून दिली.लोकमत जागे केले. लोकमत संघटीत केले. या लोक मताचे नेतृत्व आपो आप संताजीकडे आले. आणि ते येण्याएवढी त्यांची तयारी ही तेवढी होती. धर्ममार्तंडाना भीक न घालणारा असा हा मानव लोक समुह संघटीत करून संत तुकारामाकडे निघाली. हजारो जन समुदाय सामुदाईक पणे तुकाराम समोर आले तेंव्हा धर्ममार्तंडे त्यांचा धर्म लुष्ठा पांगळा झाला.
संत नामदेवांनी आपल्या जन्मगांवी किर्तन परंपरा निर्माण केली. ही परंपरा म्हणजे काय ? किर्तन म्हणजे अनुभव कथन. या अनुभव कथनातुन सत्य व असत्य यातील फरक स्पष्ट करणे. फक्त टाळ कुटणे, गंध व टिळा ओठात हरीनाम असल्या ढोंगी पणावर आसुड मारून पंढरीचा पांडूरंग व विठोबा हीच खरी समता आहे. ती जी शिक्षा झाली ती धर्मशास्त्रा प्रमाणे ही धर्मशास्त्रे ब्राह्मण्यानी लिहीलेली होती. यातूनच तयांनी देव ठरवला होता. यातूनच त्यांनी देव निर्माण केला होता. आसे देव त्यांनी सोईनुसार निर्माण केलेत गैरसाईनुसार बाजुला केलेत त्यांचा धर्मशास्त्र हा कायदा देवा पेक्षा ही फार होता. तुकारामावरील जप्ती, अभंग नष्ट करणे. तुकारामांना बहिष्कृत करणे. ही शिक्षा मोडणे म्हणजे ब्राह्मणी कायदे नाकरणे त्यांची धर्मशास्त्रे नाकरणो. ती मोडीत काढणे या साठी लोक समुह येणे ही ब्राह्मण्य गती नष्ट करण्यासारखे होते देवाचे बाप म्हणून मिरवणार्यांना त्यांचे कायदे पायाखाली तुडवणे ते ही एका तेली समाजातील व्यक्तीने ही चीड त्यांना शांती बसू देत नव्हती म्हणून रामश्वेर शास्त्रीने तुकोबाकडे येणे समन्वय साधणे बहिणीबाई शिरूरकर शेवटच्या टप्यात येडन भविष्यात फक्त तिचा उद्धती करण करणे. रामेश्वर शास्त्री जवळ येडन ते कधीही तुकोबा व संताजी सोबत जेवण न करणे काही काळा नंतर धुळवडी दरम्यान तुकोबांचा खुण करणे. अस्तीत्वात नसलेले पुष्पकयान ही बनवा बनवी करणे व इतिहासाच्या पानावरून संत संताजींना नामशेष करणे हे कट कारस्थान ब्राह्मण्याने करणे म्हणजेसंत संताजीनी देवाच्या बापांना पाया खाली तुडवले म्हणुन.
॥जय संताजी ॥