लेखिका - सौ. प्रज्ञा अभिजित देशमाने
संत कर्मा देवी ह़या तेली समाजातील प्रसिद्ध संत होत. परंतु महाराष्ट्रातील मराठी भाषीक जनतेस त्याची फारशी माहिती नाही त्यामुळे त्यांच्या माहिती साठी हे छोटेसे जिवन चरित्र प्रसिद्ध करित आहोत. जय कर्मा देवी
तेली समाज पुरे देश मै फैल हुवा है तेली समाज की महान संत मॉ कर्मा देेवी के जिवन चरित्र के बारे मै जादा तर महाराष्ट्रके मराठी भाषीक तेली समाजा को जादा जानकारी नही है इसलिए यह छोटासा चरित्र मराठी भाषा मैै
जवळ जवळ एक हजार वर्षीपुर्वी उत्तरप्रदेशातील झाशी येथे श्री. रामशाहा हे एक प्रतिष्ठीत तेली व्यापारी होते. त्याचा व्यापार हा सर्व देशात पसरलेला होता. ते एक समाज सुधारक, दयाळु, धर्मात्मा आणि परोपकारी व्यक्ती होते. त्यांच्या पत्नीस शुभ नक्षत्र, चैत्र माघच्य कृष्ण-पक्षच्या एकादशीस सन 1073 मध्ये एक कन्या रत्न प्राप्त झाले. महान पंडीतांकडून या मुलीची जन्म पत्रीका बनवली गेली. पंडीतांनी गृह - नक्षत्र पाहुन सांगितले की तुम्ही खुप भाग्यवंत आहात की तुम्हाला एवढी गुणवान कन्या रत्न प्राप्त झाले आहे. हि मुलगी भगवंताची महान उपासक बनेल. विधी शाास्त्रानुसार या मुलींचे नाव कर्माबाई असे ठेवण्यात आले.
लहान पणा पासुनच कर्माबाई धार्मिक होत्या तासन तास त्या धार्मिक गोष्टी एैकत असत. हा भक्ती भाव दिवसेंन दिवस वाढत च गेला. जेंव्हा कर्माबाई विवाह योग्य झाल तेंव्हा त्यांचा विवाह, नरवर गावच्या प्रतिष्ठीत व्यापारी यांच्या मुलाबारोबर मोठ्या थाटा माटात करण्यात आला. पतीच्या सेवेनंतर कर्माबाई यांना जेवढा वेळ मिळत असे तो संपुर्ण वेळ त्या भगवान श्रीकृष्णाच्या पुजनात व भजनात घालवत असे. त्याचे पती त्याच्या भक्तीला केवळ धार्मिक अंधविश्वास मानत असत. एक दिवस कर्माबाई भगवान श्री कृष्णाच्या भक्तीत व भजन, पुजनात लिन असताना. अचानाक त्यांचे पती आले आणि त्यांनी श्री कृष्णाची मुर्तीसिंहासनावरून उचलून लपवुन ठेवली. कर्माबाईंनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा बघतात तर काय श्रीकृष्णाची मुर्ती त्यांच्या आसनावर न दिसताच त्या एकदम आश्चर्य चकित होऊन चारीबाजुला बघायला लागल्या आणि घाबरून एकदम जमिनीवर कोसळल्या आणि बेशुद्ध झाल्या. त्यांच्या पतीने त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळानी त्यांना शुद्ध आली. त्यांच पतीने भगवान श्रीकृष्णाची मुर्ती देऊन म्हणाले की श्रीकृष्णाची दर्शन तरी झाले आहे का. त्यावर कर्मा म्हणाल्या की माझा विश्वास आहे की एक ना एक दिवस मला प्रभु श्रीकृष्णाचे दर्शन अवश्य होतील.
सामाजिक आणि धार्मिक कार्यात तन, मन, आणि धन लावुन मनपुर्वक काम करणे गरिब दु:खी लोकांच्या विषयी दया भावना दाखवने. या सर्व कारणावरून कर्माबाईंच्या यशाचे गुण-गाव नरवर गावी (सासरी) खुप लवकर होत होते. त्याचे वेळी राजाच्या हात्तीला खाजेचा रोग झाला होता. त्याला राज्यातील श्रेष्ठ वैद्याच्या उपचाराने सुद्धा फरक पडत नव्हता आणि तो बरा होत नव्हता. त्या हात्ततीची खाज कमी होण्यासाठी ीराज्याला कुणी तरी सल्ला दिला की एका तेलाने भरलेल्या कुंडात त्या हातीला आघोळ घातल्याने त्याची खाज कमी होईल. त्यावर राजाने राज्यातील सर्व तेल गाळा करण्याचा आदेश दिला की विनामुल्य घरातील सर्व तेल एका कुंडात आणुन ओता ज्याने तो कुंड भरून निघेल. राजाच्या अन्याया मुळे अधिकांश तेली उपाशी मरू लागले. पण एका महिण्यातही अन्यायी राजाचा तो कुंन्ड तेलानेभरत नव्हता. या अन्ययामुळे दु:खी होऊन कर्माबाई श्रीकृष्ण भगवान चरणी शरण गेल्या. आणि रडुन सांगायला लागल्या की हे दयावान मुरलीधर तुच आता या लोकांचे रक्षण कर. चमत्कार दाखव प्रभु. दुसर्याच दिवशी राजाने त्या कुंडाला तेलाने भरलले पाहिले त्यावर भगवंताच्या चमत्काराला समजुन राजाने कर्माबाईंची क्षमा मागितली.
एके दिवशी कर्माबाईंचे पती खुप आजारी पडलेखुप उपचार करून देखिल त्यांना वाचवता आले नाही. पतीचा स्वर्गवास झाल्या मुळे कर्माबाई श्रीकृष्णाच्या चरणापाशी जाऊन खुप रडायला लागल्या आणि म्हणाले की हे दिनानाथा तु मला विधवा केलेस माझे सौभाग्य हिरावुन घेऊन मला असाहाय्य केलेस. तुला तुझ्या भक्तांवर दया दृष्टी ठेवायला पाहिजे. नवर्याच्या मृत्यु नंतर तीनच महिन्यातच कर्माबाईंनी दुसर्या मुलाला जन्म दिला. त्याचा पुर्ण दिवस मुलांच्या पालन पोषणात आणि भगवंताच्या भक्तीत जायला लागला.
तीन वर्षानंतर कर्माबाईंना भगवंताचे दर्शन करायचे प्रबळ इच्छा झाली तेव्हा एकदिवस शुद्ध विसरून आर्ध्या रात्रीच्या वेळी त्या आपले वृद्ध आई वडिल आणि दोन मुलांना झोपेतच सोडुन प्रभुचे ध्यान करत घरातुन निघुन गेल्या. रात्रीच्या अंधारातुन त्या जगन्नाथपुरी च्या दिशेने चालु लागल्या. त्यांना हे सुद्धा माहित नव्हते की त्या किती दुर चालत आल्यात ते. त्या सलग खुप दिवस चालत होत्या त्यामुळे त्यांना खुप त्रास होत होता. त्या झाडांची पान खात पुढे जात होत्या भजन गात त्या जगन्नाथाच्या विशाल मंदिराच्या प्रमुख प्रवेश द्वारा पाशी पोहचल्या एका थाळीत खिचडी शिजवुन पुजार्याने नैवैद्य दाखवायला ठेवली. पुजार्यांनी दरिद्री अवस्थेतील कर्मादेवींना धक्के मारून मंदिरातुन बाहेर हकलले. बिचारी ती ते खिचडीचे ताट घेऊन समुद्राच्या दिशने गेल्या. समुद्रकिनारी बसुन त्या भगवंताची अराधनाकरू लागली कि हे भगवंता जोपर्यंत तुम्ही येऊन हा खिचडीचा नैवैद्य खात नाही तोपर्यंत मीही अन्न ग्रहण करणार नाही. हा नैवैद्य तर फक्त तुमच्यासाठी आहे. सकाळ ची संध्याकाळ झाली तरी त्या प्रभुच्या भक्तीत मग्न झाल्या. एका एकी भगवंताचा आवाज आला कि, हेआई, तु कुठे आहेस ? मला भुक लागली आहे. ऐवढ्या अंधारात सुद्धा कर्मा देवींना प्रभुच्या मोहक रूपाचे दर्शन झाले आणि त्या आपल्या प्रभुंना आपल्या मांडीवर बसवून खिचडी खायला घालू लागल्या त्याच्या नंतर कर्माबाईंनी प्रभुची उरलेली खिचडी खाल्ली आणि त्या आनंदीत होऊन झोपून गेल्या.
सकाळी प्रथम दर्शनी पुजार्याने पाहिले की भगवतांच्या ओठावर आणि गालावर खिचडी चिकटली होती पुजारी गडबडून गेला आणि म्हणाला की हे काम त्याच कर्मादेवींचे असेल. तीच रात्री येवुन प्रभुच्या तोंडाला खिचडी लावुन पळुन गेली असेल. त्यानंतर राजदरबारात याची तक्रारार करण्यात आली की कर्माबाई नावाच्या एका स्त्रीने भगवंताच्या मंदिराला अपवित्र केलय. त्यानंतर लोक शोधत कर्मांदेवी पाशी समुद्रतिरावर पोहचले आणि त्याचे हात छाटण्याची आज्ञा आहे म्हणुन पुढे सरसावुन त्याचे हात छाटु लागले . दोन हात पुढे घेऊन छाटले परंतु प्रभुची लिला काही औरच जमिनीवर दोन गौर वर्णिय हात पडले परंतु कर्मा देवींना काहीच झाले नाही. त्या जशाच्या तश्या उभ्या होत्या. परत तोच प्रकार केला पुन्हा दोन गौर वर्णीय हात जमिनीवर पडले पण कर्मा देवींना काहीच झाले नव्हते. आता जेंव्हा त्या अन्यायानी परत वार केले लेव्हा जमिनीवर सावळ्यारंगाचे दोन हात पडले एका हातात चक्र आणि दुसर्या हातात कमळ होते . तेव्हा सुद्धा दरबार्यांना कळले नाही तेंव्हा ते वेड्या सारखे कर्मा देवीवर वार करायला लागले. तेव्हा अकाशवाणी झाली कि अरे दृष्टांनो तुम्ही सगळे पळुन जा नाहीतर सर्वनाश होईल. आणिा ज्यांनी हात कापले त्याचे हात गळुन पडले. काही लोक पळुन गेले आणि म्हणायला लागले की ही तर जादुगरणी आहे. ही बातमी जेव्हा राजदरबारात कळाली तेव्हा राजाला पण व्याकुळता लागली. हे जाणुन घेण्यासाठी राजा पण जगन्नाथाच्या मंदिरात गेला. तेव्हा राजाने बघीतले की बलदेव, सुभद्रा आणि भगवान जगन्नाथाचे हात तुटून पडले होते. तेव्हा सर्व पुजारी आणि परिवारां मध्ये एकच हाहाकांर माजला आणि ते म्हणायला लागले की हातर अनर्थ झाला आहे. राजाला स्वप्नात प्रभुंनी आज्ञा दिली की हात तर माता कर्मांना अर्पन झाले आता मी बीन हाताचाच राहणार आणि दरवर्षी कर्मादेवीच्या नावाचीच खिचडीचा नैवैद्य ग्रहण करणार.
त्या दिवसा पासुन आज पर्यंत चैत्र कृष्ण पक्षाच्या एकादशी दिवशी ज्या दिवशी ही घटना आहे. त्याच् तिथीला भगवानजगदीश स्वामींच्या मंदीरात भक्त कर्माबाईंच्या खिचडीचा सर्व प्रथम नैवैद्य आणि प्रसादाच्या स्वरूपात खिचडी वाटली जाते.
कर्मा जयंती दरवर्षी चैत्र कृष्ण पक्षाच्या एकादशीला गावो-गावी खुप धुम धडाक्यात साजरी करा.