उस्मानाबाद उमरगा- धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्यावर कारवाई करण्याबाबत तहसीलदार उमरगा यांना तेली समाज संघटना व बहुजन समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. दोंडाईच्या येथील घडलेल्या तेली समाजाच्या बालीकेवर झालेल्या अत्याचाराचा तसेच सादर घटना दाबण्यासाठी संबंधित स्थानिक शालेय संस्था ज्ञानोपासक शिक्षण संस्था मंडळ संचालित संस्था नूतन माध्यमिक विद्यालय या शाळेच्या संस्थाचालकांनी व राजकारण्यांनी निर्माण केलेल्या दबावाचा तीव्र निषेध करित आहोत पिडीत बालीकेच्या आई वडीलांना धमकवनार्या व आमिष दाखवनार्या संस्था चालकांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घृणास्पद असून माणुसकिला काळिंबा फासणारी आहे .तरी बालिकेवर अत्याचार करणार्या व त्यास पाठिशी घालणार्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करित आहोत.अत्याचार प्रकरणी बालिकेच्या कुटुंबावर कुटुंबावर दबव कायम असून शिक्षण व संस्थाचालकाच्या समर्थकांकडून त्यांना सतत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला जात आहे. त्यामुळे हे कुटुंब दहशतीखाली आहे.त्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करीत आहोत.
याप्रसंगी जिल्हा सचिव अॅड. विशाल साखरे, माजी जि.प. सदस्य डी.के. भालेराव जिल्हा परिषद सदस्य धनराज हिरमुखे , उमरगा तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी , बंजारा क्रांती दलाचे अविनाश राठोड, लोहारा तालुकाध्यक्ष भीमाशंकर डोकडे, उपाध्यक्ष शिवानंद कलशेट्टी, कार्याध्यक्ष सिध्देश्वर कलशेट्टी, सचिव शिवानंद साखरे, कोषाध्यक्ष इंद्रजीत म्हेत्रे, शिवकुमार दळवी, खंडू म्हेत्रे ,कपिल नवगिरे आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.