दशरथ काशीनाथजी फंद, ६११, जुना बगडगंज, भारतीय विद्या निकेतन शाळेजवळ, नागपूर
आपल्या भारत देशात अनेक देवांनी अवतार घेतलेला आहे. प्रभु श्रीरामचंद्र भगवान, प्रभु श्री परशुराम भगवान, प्रभु श्रीकृष्ण भगवान ह्या देवांनी भारत भुमीवर जन्म घेतला. त्याचप्रमाणे संतानी सुध्दा जन्म घेतलेला आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री एकनाथ महाराज, संत श्री नामदेव महाराज, संत श्री तुकाराम महाराज आणि अनेक संतांनी याच भुमीमध्ये अवतार घेतलेला आहे. देवाचा अवतार व संताचा अवतार महान आहे देवाच्या अवतारापेक्षा संताचा अवतार श्रेष्ठ आहे "जगाच्या कल्याणा संताची विभुती । देह कष्टविती परोपकारे'''बुडत हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणोनीया समाजाला सदुपदेश करून त्यांचे कल्याण करावे संताच्या ठिकाणी हाच हेतु असतो. संत श्री संताजी जगनाडे महाराज चाकण गावी ८/१२/१६२४ रोजी जन्मास आले. या भारतात देवानी संतानी, अवतार घेतला त्यामुळे जगाच्या पाठीवर आधात्मिक दृष्ट्या महान आहे. भारतात महाराष्ट्र प्रांतात अनेक संतानी जन्म घेतला म्हणून महाराष्ट्राला संतभुमी म्हणून संबोधीत करतात. चाकण हे गांव चक्रवर्य राजाने स्थापन केले होते. हे गांव पुणे-नाशीक रोडवर आहे. ह्या गावात किल्ला आहे. तसेच हे गांव व्यापाराच्यादृष्टीने व्यापारी पेठ असून महत्वाचे आहे. ह्या गावाच्या पंच क्रोशीत देहु, आळंदी, इंदुरी, लोहगांव, सुदुंबरे इत्यादी गावे आहे. अशा ह्या गावी पांडूरंगजी जगनाडे राहात होते. यांना जगनाडा म्हणत असे परंतु जगनाडा हे गांव सुधारून जगनाडे केलेले आहे हे ह्यांचे टोपन आडनांव आहे खरे आडनांव सोनवाने आहे. पांडूरंगजीला दोन मुले झाली. पहिला नारायण व दुसरा महादु. नारायणला एक मुलगा झाला त्यांचे नांव भिवाजी. जिवाजीचे लग्न गिरजाबाईशी झाली. पुढे भिवाजीला एक मुलगा झाला. त्यांचे नांव विठोबा. विठोबाचे पत्नीचे नांव मथाबाई हे होते. जगनाडे घराणे सुशील, श्रीमंत व सुखी होते. समाजसेवा करणे, व्यापार करणे देवाची पूजा पाठ करणे असे पुष्कळसे सद्गुण होते. सर्वाची प्रेमळ स्वभावानी वागत असे. “उत्तम ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म होती' अशा ह्या उत्तम कुळांत विठोबाच्या पोटी संत श्री संताजीचा जन्म ८/१२/१६२४ रोजी झाला. चाकण गावामध्ये चक्रेश्वराचे देऊळ आहे. संताजी लहान असतांना त्यांचे वडील व आजोबा हे देवळात नेत असे. त्या देवळांत भजन, पुजन, किर्तन, प्रवचन, हरीचर्चा नेहमीच होत असे. आई-वडिलांकडून तसेच आजोबा कडून संताजीला पुष्कळ सुविचार, सुसंस्कार मिळाले. परमार्थाची व भत्ती मार्गाची बाळकडूच मिळाली होती. त्याकाळी शाळा नव्हत्या त्यामुळे पंतोजीला घरी बोलावून शिक्षण घ्यावे लागत असे. त्याप्रमाणे संताजीने पंतोजीला घरी बोलावून त्यांच्या जवळून लिहता वाचता यावे व हिशोब करता यावा एवढे शिक्षण घेतले नंतर पुढे ते शिकले नाही. पुढे मोठे झाले पूर्वी लहानपणी बाल वयात लग्न करीत होते. त्याप्रमाणे विठोबाजीने संताजीचे ११व्या वर्षी खेड गावातील कहाणे कुटुंबातील यमुनाबाई सोबत इ.स. १६३५ साली लग्न करून दिले. संताजी शेंगदाणे, तीळ व करडी ह्यांचे घाण्याद्वारे तेल काढीत होते. चाकण हे गांव व्यापारी पेठ असल्यामुळे तेल, पेंड वगैरे विकुन आपला प्रपंच चालवीत होते.
संताजीला एक मुलगा झाला त्यांचे नांव बाळोजी होते नंतर एक मुलगी झाली तीचे नांव भागुबाई होते. चक्रेश्वराच्या देवळात संत तुकाराम महाराजांचे किर्तन होते. ह्या किर्तनाला गावातली तसेच दुस-या गावाहून सुध्दा बरीचशी मंडळी आली होती. संताजीही किर्तन ऐकण्यास गेले होते. तुकाराम महाराजांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्या विषयांवर पूर्ण किर्तन केले. त्या किर्तनामुळे संताजीच्या मनावर फारच परिणाम झाला. त्यांच्या ठिकाणी भक्ती, ज्ञान, वैराग्य जागृत झाले. संताजीनी तुकाराम महाराजांनी भेट घेतली. तेव्हा पासून संताजी व संत तुकाराम महाराजांची मित्रता जुळली. ती मित्रता पुढे घट्ट व मजबुत झाली. संताजी जेथे तुकाराम महाराजांचे किर्तन राहात होते ते किर्तन एकण्यास जात होते. संताजी सावली प्रमाणे तुकाराम महाराजा बरोबर राहात होते. संताजीच्या ठिकाणी वैराग्य वाढतच होते. मनुष्य जन्म मिळणे फारच दुर्लभ आहे. जर मिळाला तर सद्गुरू महात्मा मिळणे कठीण आहे. "ज्याने गुरू नाही केला, त्याचा जन्म वाया गेला'' आपण अर्जुनपर्यंत गुरू केला नाही. गुरू शिवाय मार्ग मिळत नाही, गुरू शिवाय तरणोपाय नाही म्हणून त्याने संत तुकाराम महाराजांना गुरू करण्याचे ठरविले व तो तुकाराम महाराजाला शरण गेला व मला उपदेश द्यावा व शिष्य म्हणून माझा स्विकार करावा अशी विनंती केली. तुकाराम महाराजांनी त्याला अनुग्रह दिला. तेव्हापासून तुकाराम महाराजांच्या किर्तनात टाळ वाजवीत होते. अभंगाचे धृपद म्हणत होते. संताजीचा आवाज व म्हणणी चांगली होती तसेच अक्षरही वळदार होते. त्यामुळे अभंगाचे लिखाण वहीमध्ये करीत असे. तुकाराम महाराजांच्या अभांगाचे लिखाण गंगाधर मवाळ ब्राम्हण व संताजी जगनाडे तेली हे करीत होते. दोघेही हुशार व एकपाठी होते एकदा वाचले की त्यांना पाठांतर होत असे. तुकाराम महाराजांचे १४ टाळकरी होते. त्यापैकी हे दोघेजन प्रमुख होते. संताजीच्या समकालीन तुकाराम महाराज, शिवाजी महाराज व रामदास स्वामी हे होते. जनार्दन स्वामिनी त्यांच्या शिष्य संत एकनाथ महाराज ह्यांना दत्त प्रभुचे दर्शन करून दिले त्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांला मनात आले की, संताजी व गंगाधर ह्यांना शिवाचे दर्शन करून देऊ. एक दिवस तुकाराम महाराज संताजी व गंगाधर मवाळ तिघे जन शंभु शिखर यात्रेला गेले तेथे मुक्काम केला. फक्त ४ मानसाचा स्वयंपाक केला. म्हणत होता आता जेवण करावे एवढ्यात नग्न दिगंबर एक महात्मा आला व तुकाराम महाराजांची मला भुक लागली आहे. भोजन द्या म्हणून म्हटले तुकाराम महाराजांच्या सांगितल्याप्रमाणे अथितीला भोजन वाढले त्या भिक्षुकाने आणखी द्या, आणखी द्या म्हणून पूर्ण स्वयंपाक केलेले अन्न ग्रहण केले व तो निघुन गेला. सर्व भांडे रिकामे झाले. पुन्हा स्वयंपाक करून आपण जेवण करू म्हणून संताजीला शिधा आटा सामान आणण्याकरिता पाठविले सामान आणल्यावर भांडी जवळ गेले तो काय चमत्कार भांडी अन्नाने पूर्ण भरलेली आहे तेव्हा तुकारामाने सांगितले की, तो भिक्षुक नसून प्रत्यक्ष शंकर भगवान आहे त्यांनी आपल्याला दर्शन दिले आहे. गुरूच्या कृपेने शिष्याला देवाचे दर्शन झाले. गुरूची कृपा मिळण्याकरिता गुरूची सेवा करावी व गुरूची आज्ञा पाळावी. एके दिवशी संत तुकाराम महाराज व गंगाधर मवाळ दोघेही संताजीच्या घरी गेले. आपण दिलेला उपदेश संताजीला किती अनुभवास आला. परीक्षा पाहावी तेव्हा तुकाराम महाराजांनी काय पाहिले. संताजी भाव समाधीमध्ये बसले आहे. घाणा सुरू आहे ते पाहून तुकारामानी संताजीला मिठी मारली. संतु धन्य आहेस संताजीची भक्तीची प्रगती पाहुन तुकाराम महाराजांना फारच आनंद झाला कारण गुरूची संपदा शिष्य आहे व वडिलाची संपदा पुत्र आहे. तुकारामांनी संताजीला विचारले घाणा कशाचा आहे व तेल कोणते काढले तेव्हा संताजीने अभंगाद्वारे तुकाराम सांगितले
निर्गुण हा घाणा गुणातीत जाणा । सोहम ध्वनी जाणा उखळ ते ।।१।।
उखळ गाडीले सप्त पाताळांत। विराटाची मात वेदशास्त्री ।।२।।
उखळ भेदीले एकवीस स्वर्गावरी। ठोकीती त्यावरी धृवपद ।।३।।
वाजती करकर अनदात कातर । मन पवन थोर बॅल फीरे ।।४।।
तेल घोलीनीया कुळ हादरले। चेतन काढीले तेल त्याचे ।।५।।
संत म्हणे तुका हाची माझा घाणा। पावलासी खुणा काय त्याची ।।६।।
हे उत्तर अभंगाद्वारे ऐकले तेव्हा तुकारामाला फारच आनंद झाला. तुकाराम महाराजांचे अभंग गाथा रामेश्वर भटानी इंद्रायणी मध्ये बुडवीले. तेव्हा तुकाराम महाराजांनी उपोषन केले. तेव्हा संताजीने तुकाराम महाराजांचे अभंग गोळा करून ते लिहून काढले व तेराव्या दिवशी तुकाराम
महाराजांच्या गाथा त्यांच्या स्वाधीन केले त्यामुळे तुकारामाला आनंद झाला व त्याने उपोषण सोडले. "तुकारामाची गाथा लिहून काढली । म्हणुनी अवतरली भुमीवरी' संताजीने हे जनतेवर उपकारच केलेले आहे.
संताजीनी, तुकारामाची गाथा शंकर दिपीका, प्रकाश, दीप, घाण्याचे अभंग, योगाची वाट, निर्गुणाच्या लावण्या पाचरीचे अभंग, तैलसिंधु सह अनेक ग्रंथाची रचना केली. संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्या नंतर ४० वर्षे जीवन जगले. त्यांनी जगाला सदुपदेश दिला, जनजागृती केली समाजाची सेवा केली. त्यांचे अवताराचे कार्य संपल्यावर वयाच्या ७५ व्या वर्षी मार्गशीर्ष |वद्य त्रयोदशी इ.स. १६९९ रोजी अनंतात विलीन झाले. अत्यंत संस्काराचे तीन प्रकार आहेत
१) अग्नी संस्कार, २) मृतीका संस्कार ३) समाधीत पुरविणे हे संत असल्यामुळे ह्यांना समाधीत पुरविले. पुष्पळशी माती टाकून ही त्यांचे तोंड वरच राहात होते. शेवटी लोक कंटाळून गेले बरीच रात्र झाली ते सर्वघरी परतले माय त्यांचा | मुलगा बाळोजी हे एकटेच होते. रात्री १२ वाजता तुकाराम महाराज विमानात बसून त्या ठिकाणी आले. तेथे बाळोजी होते त्याला तुकारामाने सांगितले की संताजीचा व माझा वचन भाग झालेला आहे.
"चारीता गोधन, माझे गुंतले वचन ।।१।।
आम्हा झाले येणे एका तेलीया कारणे ।।२।।
तीन मुष्ठी मृतीका देख, तेव्हा लोपवीले मुख ।।३।।
आलो म्हणजे तुका, संतु न्यावया विष्णु लोका।।४।।"
त्याप्रमाणे ३ मुष्ठी माती संताजीच्या डोक्यावर सोडली तेव्हा व्हा संताजीचे डोके आत गेले. त्यावेळेस बाळुजीला तुकारामानी १३ अभंग सांगितले व तुकाराम महाराज निघुल गेले. मला संताजीचे जीवन चरित्र लिहण्याची संधी दिली त्याबद्दल सामुहिक विवाह समितीचे आभार मानतो व माझे लिखाण पूर्ण करतो. संताजीचे जीवनचरित्र फार मोठे आहे तेवढे वर्णन करू शकत नाही. तरी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
| || जय संताजी ।।