श्री. शांताराम गोपाळ देशमाने, संस्थापक अध्यक्ष , सांगली, जिल्हा तेली, समाज, पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, मो. नं. 8805279693
आदरनीय भगवान बागुल सरांनी आपले विचार व्यक्त करण्यास सुचीत केल्यावरुन मी सांगली, सातारा, कोल्हापुर इ.जिल्हयातील तेली समातातील विवाह समस्या बाबत स्पष्टता करत आहे.
आमच्या भागातही अशाच समस्या असून वधू पिते हे नोकरदार आणि त्यात सरकारी नोकरदार जावई असावा अशी अपेक्षा ठेवतात. शेती करणारे किंवा व्यापार करणारे किती ही सुज्ञ आणि चांगली सांपत्तीक स्थिती असणाच्या सुशिक्षीत स्थळास नकार देऊन नोकरदारांची अपेक्षा ठेवतात. त्यांच्या व मुलींच्या या हट्टीपणामुळे अनेक मुली वयस्कर झाल्या असुन माझ्या पाहण्यात सन 1978 आणि 1980 पर्यतच्या बर्याच मुली अध्याप अविवाहित आहेत. त्यांना आता त्यांच्या वयोमानातील मुले मिळणे दुरापास्त झालेले आहे आणि त्यांना शेतकरी,व्यापारी कामगार मुले यांना वधु आणि वधुपित्यांनी नाकारलेले अविवाहित आहेत ते अद्याप अविवाहित आहे अशा वधु पित्यांची किव करावीशी वाटते कारण ते अद्यापही आपला हेका सोडणेस तयार नाहीत.
अशा मुला-मुलीकडे पाहिले की माझ्या सारख्या कित्येक कार्यकर्त्यांच्या काळजाला चिरे पडतात. आणि दु:ख होते. त्यांच्या हट्टामुळे या पिढीतील कित्येक कुटुंबे ढासळताना दिसतात त्यांच्या दुःखाला आणि चिंतेला पारावार नाही.
गत साली सांगली जिल्हा तेली समाज विधवा, विधुर, परित्यक्ता, घटस्फोटीत, अशा पुर्नविवाहीतांचा खास मेळावा आयोजित केला होता. एका प्रथम वराने विधवा वधुस मान्यता देवून तो विवाह झाला सुध्दा या यावरुन वसस्कर वरांची काय अवस्था आहे हे ध्यानात येईल.
आज समाजात शेती, व्यापार, उद्योगक्षेत्रात काम करणारी सुसंस्कारीक आणि चांगल्या प्रकारे आर्थिक परिस्थिती असणारे मुले आहेत. टि.व्ही.मालीकेतील अंजली मॅडम या सुशिक्षीत आणि सुसंस्कारीत मुलींने राणासारख्या शेती करणाच्या कमी शिकलेल्या पैलवान मुलाबरोबर लग्न करुन आपल्यापुढे आदर्श ठेवून एक संदेश दिलेला आहे. तो खरोखरज हेकेखोर वधु पित्याला सुचक संदेश देणारा आहे. तुझ्यात जीव रंगला, या मालिके मधून आपण काही बोध घेणार आहेत की नाही ? का केवळ करमणुक म्हणून या मालिके कडे पाहणार आहोत. याचा विचार करुन वधु-पित्यांने सुसंस्कार आणि मिळवता निर्व्यसणी अशा शेती,व्यापार उद्योग इ.क्षेत्रात काम करणाच्या वरांस पसंत करून आपल्या मुलींचे विवाह करणेस हरकत नाही. असे मला वाटते.
आमच्या भागातील एक शहरात मुली डिफार्मसी होलसेल दुकान, गोडाऊन, शहरात 3 घरे, फार्म हाऊस, कोठयावधीचा परिवार अशा मुलास केवळ व्यापारी म्हणून नाकाराण्यात येत आहे. अशा सामाजिक माणसिकतेस काय म्हणावे ? अशा वयस्कर मुलांची लग्रे वेळेत झाली पाहिजेत. नाही तर समाजात उद्रेक होवु शकतो. अशा परिस्थितीस वरपित्यांने आणि वरांने वेगळा विचार करुन आपल्या समाजात स्थळे मिळत नसतील तर पर जातीत विवाह करु लागले तर समाजाने त्यांना का दोष द्यावा ? या आपण विचार करणार आहोत की नाही ? अशा समस्याचा विचार समाज मेळाव्यामधुन झाल पाहिजे.
स्पष्ट शब्दात बोलायचे झाले तर, टि.व्ही. मालिका सिनेमे,मोबाईल यामुळे सर्व समाजात प्रेमप्रकरणाला वाव मिळून समाज संस्कारांच्या र्हासाचे संकेत मिळत आहे. असे झाले तर जातीय व्यवस्था राहणारच नाही. आजकाल अनेक मुले-मुली पळून जाऊन विवाह करताना दिसतात. आणि घरातील आई-वडीलांचा विरोध असेल तर आत्महतेस प्रवृत्त होतात. यास सर्वास सामाजिक मानसिक ता जबाबदार आहे आणि म्हणून मुला-मुलींचे विवाह योग्य त्या वयात व्हायला हवेत.
कोयना नगर जिल्हा सातारा येथे सुमारे 2 वर्षापुर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. त्यावेळी प्रांतिक चे महासचिव आदरणिय प्रा.भुषणजी करडीले यांनी पोट जातींना तिलांजली द्या अशा प्रकारचे आहवान केले होते. आपल्यावर झालेल्या परंपारीक संस्कार आणि विचारामुळे पोट जात तोडणेस समाज सहसा धजवत नाही. हे खरे असले तरी समाजाच्या फायद्यासाठी प्रत्येक मेळाव्यात समाज प्रबोधन झाले तर आणखी काही वर्षात पोट जातीमध्ये तडजोडीने विचार करुन पोट जातीत सुध्दा विवाह होतील असे मला वाटते तेली समाजात सुमारे 25 पोट जाती आहेत. त्यामध्ये तिळवन,लिंगायत, एक बैली, दोबैली, शनिवार तेली, सोमवार तेली, राठोड तेली, बात्रे तेली, परदेशी तेली इ. पोट जाती आहेत. प्रत्येक पोट जातीचे विशिष्ठ संस्कार चालीरिती आचार विचार, खान-पान (शाकाहारी-मासांहारी) इत्यादी प्रादेशिक विविधते प्रमाणे भिन्नता दिसून येते. यासाठी प्रत्येक पोट जातीचा अभ्यास व चिंतन करुन पोट जातीत विवाह होण्यासाठी मार्ग काढावा लागेल.
इतर समाजात अपघाताने का होईना विवाह होने ही बाब सर्वसाधारण कुटुंबाना मोठया शरमेची वाटते. आणि पोटजातीत विवाह झालेस अशी शरम वाटणे कोणतेही कारण नाही. कारण तेली सारा एक आज काल पोट जातीमधील विवाह मेळाव्यामध्ये तीच तीच मुले मुली दिसून येतात तेव्हा ज्या पोट जातीमध्ये साम्य आहे. किंवा तडजोडीने रिती रिवाज बदलने किंवा मान्य केले तर पोट जातीमध्ये विवाह होणेस काही हरकत नाही. त्यामुळे पोट जातीमधील सिमीत क्षेत्र विवाहासाठी विस्तृत होईल आणि हवी तसी स्थळे मिळून जातील.
मी 1979-80 पासून समाजात कार्यरत आहे. सामाजिक मासिकांच्या वाचनाने संकुचीत वृत्ती विशाल होऊन त्यावेळी पोट जातीत विवाह होवो अथवा न होवो पण महाराष्ट्रातील सर्व तेली समाज एका छताखाली यावा असे मनोमन वाट त होते. समाज प्रबोधन झाल्याने जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्याने उत्फुर्त प्रतिसाद दिल्याने आम्ही पोटी जातीचा उल्लेख टाळुन सांगली जिल्हा तेली समाज या बॅनरखाली 1998 साली समाज संस्थेची स्थापना केली.
वरील सर्व बाबीचा विचार करुन समाज धुरीनांनी आणि समाज सुधारकांनी आपले विचार स्पष्टपणे मांडावेत. चला तर चिंतन, मनन करून नवविचाराच्या नवसमाजाची निर्मिती करु या.
श्री. शांताराम गोपाळ देशमाने, संस्थापक अध्यक्ष , सांगली, जिल्हा तेली, समाज, पेठ, ता. वाळवा, जि. सांगली,