पुणे शहराची जुनी सीमा रेषा रूंदावत चालली उपनगरे पुर्ण भरली महानगर पालीका लगत समाज बांधव स्थीर होऊ लागले. काही मोकळ्या जागेत रहावयास निघाले. काम व व्यवसायाने आनेक बांधव स्थलांतरीत झाले आणि पुण्या लगत स्थिर होऊ लागले. महानगर पालीके बोहेरील या बांधवांचे अनेक प्रश्न होते हे सर्व जन पुणे महानगर पालिकेत नसल्याने ते पुणे समाज संस्थेत सभासद होऊ शकत नव्हते. मग यासाठी भैरोबा नाल्याच्या पुढील बांधवासाठी १९९५ मध्ये श्री संताजी तेली समाज संस्था हडपसर या नावाने कार्य सुरू झाले. या कार्याची संस्था झाली. या संस्थेला रजिस्टर करण्यात आले.
संस्थेला रजिस्टर पणा होता. संस्थेला सभासद होते पण एकत्र येण्याचे ठिकाण नव्हते. या वेळी हडपसर गावातील श्री. विठ्ठल मंदिर, लोहिया उद्यान सासवड रोड व बंटर स्कुल येथे बांधव एकत्र येत समाज विकासाच्या विचार सभा होत. मुठभर एकत्र आले बांधवांची संख्या वाढु लागली. ती आज पय्रंत २०० पर्यंत झाली. आपली गरज, विकास बंधुभाव व संस्कृती वाढावी या साठी सर्व विचार करीत होते. यातुनच २००५ मध्ये तुकाई टेकडी येथे तुकाई मंदिर मागे काळे पडळ येथे जागा पाहुन तेथे विठ्ठल रुक्मीणी व संताजी महाराजांच्या मुर्तीची स्थापना केली. समाजाच्या विचार प्रक्रियेला एक ठिकाण मिळाले. यामुळे संस्थेतर्फे महिला साठी तिळगुळ समारंभ होऊन महिला संघटन होऊ लागले. परिसरातील गुणी व होतकरू विद्यार्थी व बांधव साठी गुणगौरव समारंभ आयोजित केले जातात. सांस्कृतीक साठवणी साठी कोजागीरी पौर्णिमा त्रिपुरा पोर्णिमा श्री. संत संताजी महाराजांची वाढदिवस व पुण्यतिथी साजरी करणे. सामुदाईक पणे सर्व बांधवांनी एकत्र येऊन सुदूंबरे येथे पुण्यतिथी दिनी उपस्थीत रहाणे ही एक परंपरा निर्माण केली.
पुण्यानंतर पंढरपुरच्या वाटेवरचे हडपसर हे एक ठिकाण जेंव्हा संत संताजी पालखी पुण्याहुन मार्गस्थ होते तेंव्हा एकादशी आसते या दिवशी दुपारी पालखी हाडपसर येथे येते संस्थेतर्फे वारकर्या साठी पाणी व्यवस्था व फराळाची सोय केली जाते यासाठी भोकराई नगर येथे सर्व सभासद एकत्र येतात ही व्यवस्था सन १९८८ पासुन सातत्याने सुरू आहे. असंघटीत समाज बांधव संघटीत होऊन बंधु भाव मुळे अडीअडचनी सोउवून एक संघ उभे राहिलेत आपल्या कष्टाचा एक एक रूपया देऊन संताजी मंदिर उभे केले आहे. अजुनही मंदिराचा कळस व सभा मंडप बांधकाम अपुर्ण आहे ते पुर्ण व्हावे यासाठी आपण सर्व बांधवांची सहकार्य करावे.
संस्थापक शामराव अंबाजी भगत