श्री. बाळासोा. अंबिके म्हणजे समाज सेवेची परंपरा.

Teli samaj pune vishvasti balasaheb Ambika

    पुणे परिसरात अनेक दशके आापली पाळे मुळे खोलवर रूतवुन वास्तव्यास असलेली  जी जी घराणे आहेत त्यापैकी अंबिके एक पुणे वसु लागले तेंव्हा ही मंडळी इथे स्थीर झाली. आजुबाजुला पिकणारे अमाप शेंगपिक त्या शेंगा खरेदी करणेे व गाळप करणे. त्या काळात कसबा ही बाजार पेठ होती. तेल पेंडी विक्री करणे ही परंपरा होती. अंबिके घराण्याची पंरपरा तेंव्हा पासून सुरू होती. आजचा संभाजी पुला जवळीस अलका टॉकीज चौकात अंबिक्यांची तेल घानी डॉलात सुरू होती. सकाळी ५ वाजता घाण्याला जुंपलेला बैल अंधार पडला तरी चालत रहात असे. मागणी एैवढे गाळप करताना दमून जावे लागे. तेला शिवाय लढाई होत नव्हती तेला शिावाय टेंबे पेटत नव्हते. तेला शिावाय समई तेवत नव्हती तेला शिावाय अंधार हाटत नवहता. तेल उत्पन्न करणारे तेली हे अंधार नष्ट करणारे अग्रदुत होते. त्यामुळे त्यांना एक किंमत ही होती. परंतु इंग्रज राजवटीत यंत्रे येऊ लागली तेल घानी निकामी होण्याच्या रस्त्यावर निघाली. जगण्याचा धडपडीला आडसर येऊ. लागला. लकडी पुला जवळच्या अंबीक्याच्या तेल घानीला गती कमी होऊ लागली कै. तुकारामशेठ यांना पर्याय शोधण्याची वेळ जवळ येऊ लागली घरात लहानाची मोठी हाेणारी चार मुले व २ मुली ते वाढली पाहिजेत व धडपडी पाहिजेत ही त्यांची जिद्द. १) नामदेव, २) सखाराम ३) रामचंद्र ४) लक्ष्मण ही मुले या पैकी कै. लक्ष्मण यांचा जन्म १९१८ मध्ये झाला ते जवळच्या शाळेत जावू लागले. इ. ४ थी मध्ये शिक्षण घेतले वडील आजारी पडू लागले त्यांनी शिक्षण सोडले आणि मिसरूड ही फुटले नव्हते त्या वयात ते तेल घानी घेऊ लागले. परंतु पहिल्या सारखी तेल व पेंडीला मागणी कमी होऊ लागली पर्याय सापडे पर्यंत विलाज नव्हता कारण लक्ष्मणरावांना घर चालवायचे होते. एका एकी वडील गेले. घरात लहान भवांडे त्यांची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. पुणे वाढत होते या परिसराला मोक्याचे स्वरूप येत होते. त्यांनी तेल घानी बंद करून  घरा समोर पानाची टपरी सुरू केली. व्यवसायात कोणता या पेक्षा प्रमाकिणा व जिद्द या बाळावर ते उभे राहिले. या उभे रहाण्यात भावंडे मोठी होत होती बहिणींची लग्न होऊ शकली. माझ्या खांद्यावर आलेली जबाबदारी मी संभाळणे ही जाणीव ते पुर्ण करीत होते.
    देहु रोड येथे नोकरी ही पकडली पण मन रमेना तेंव्हा टेलीफोन खात्यात नोकरी पकडली कै. लक्ष्मणराव हे एक जबाबदारी कुटूंब प्रमुख होते. पण तेवढेच जाणीवांचे समाज बांधव होते. तेली समाजाचे एक अविभाज्य घटक होते. त्यामुळे ते समाजाची कार्यवाही सदस्य काही  काळा होते मार्गदर्शक ही भुमीका ही यशस्वी पणे पार पाडली. ८२ भवानी पेठ व मंगळवार पेठेतील समाज वास्तु निगा दुरूस्ती व संगोपन करण्यात लक्ष दिली.
    रस्ता म्हणजे पाऊलवाट, पिण्यास पाण्याची सोय नाही. गावाला लाईट नाही. डिसेंबर म्हणजे थंडीचा महिना. उघड्या रानात बांधव संताजी पुण्यतीथीला येत आशा वेळी लहान मोठ्या सह सर्वांचे हाल होत. अशा वेळी स्वयंसेवक संघ समााजातील बांधवांनी निर्माण केला. उत्सवा आधी कै. लक्ष्मणराव बांधवा बरोबर २/३ दिवस आधी जात, साफ सफाई, राहुट्या बांधने त्या उभ्या करणेे बांधवांची सेवा करणे ही कामे ते करित. सुदूंबरे संस्थेचे शिल्पकार रावसाहेब केदारी हे लक्ष्मणरावांचे मामे सासरे. रक्ताचे नाते या घरात होते. समाज सेवेचे धडे मिळालेले. ते स्वयंसेवक संघाचे घटक झाले. पुण्यतिथी साठी धान्य गोळा होत आसे ते संभाळणे गरजेचे साहित्य गोळा करणे. ८२ भवानी पेठेतुन ते सुदूंबरे येथे बैलगाडी किंवा ट्रकने  घेऊन जाने त्याची सर्व जबाबदारी ते पाहत असत. समाजाच्या सह विचार सभेत सहभाग ही घेत असत सन १७/१२/१९७९ च्या संत संताजी पुण्यतीथी सोहळ्याचे ते उद्घाटक होते. उद्घाटक या नात्याने विचार व्यक्त करीताना त्यांनी शिल्पकार रावसाहेब केदारी यांची साठ वर्षींची साठवण समोर मांडली समाजाचा विकासाला, सामंजस्य पणा एकी, शिक्षण या बाब गरजेच्या आहेत हे मांडले.
    श्री. बाळासाहेब रामचंद्र अंबिके हे कै. लक्ष्मणरावांचे नात्याने पुतणे परंतु बाळासाहेब त्यांच्या विषयी उल्लख करताना तेंव्हा सांगतात मी लहान होतो आगदी मला आठवते ही  आज नाही आशा कवळ्या वयात माझे वडील वारले. आम्ही भावंडे पोरकी झालो. देशोधडीला लागण्याचवी वेळ आली. आई समोर जगवणे हा प्रश्न उभा होता. माझे मामा कै. पुरूषोत्तमशेठ व्हावळ हे एक भले बांधव समाज सेवा व त्याग यांचे प्रतिबींब म्हणजे पुरूषोत्तम मामा मी लहान माझे हाल पहावेनात मामांनी मला घरी नेहले. जवळच्या शाळेत दाखल केले. ४/५ महिने झाले असतील लक्ष्मणराव आले हा अंबिके घराण्याचा पोरगा अंबिकेच्याच घरात मोठा होईल आणि चुलते त्यांना घेऊन संभाजी पुलावरील घरी घेऊन आले. घरात बाकी चुलते हात बांधनु वावरत होते. खिशाला जपत होते. परंतु लक्ष्मणरावांनी या सर्व भावडांना आपली मुले मानली वडिलांनी मुला साठी ज्या यातना सहन कराव्यात आगदी त्या ते सहन करित होते. चुलत्यांना मुलबाळ नव्हते पण भावाची मुले ही आपलीच मुले मानली त्यांना शिक्षण दिले. त्यांना विचार दिले. त्यांना संस्कार  दिले. त्यांना जिद्द दिली. जे वडिलांनी करावे तेवढे त्यांनी केले. बाळासाहेबांच्या बहिणीचे लग्न पोटच्या मुलीसारखे लावुन देऊन थांबले नाहीत तर जीवंत असे पर्यंत तिला महोरची उब ही दिली. बाळासाहेब शिकले पाहिजेत ही जिद्द त्यांची होती. ती त्यांनी पुर्ण ही केली. श्री. बासाळेब शासकीय नोकरीत रुजू झाले. हा आनंद श्री. बाळासाहेब चुलत्यांच्या चेहर्‍यांवर विसरू शकत नाहीत. श्री. बाळासाहेब रामचंद्र अंबिके हे लहान पणा पासुन समाज सेवेत गुंतलेले घरात चुलते व मामा पुरूषोत्तम व्हावळ यांच्या मुळे बाळकुडू पिलेले. ८२ भवानी पेठ मध्ये श्री. संाताजी उत्सवा पुर्वी स्वयंसेवक गोळा होत. लेझीमचा सराव करणे बॉंड पथकात सहभाग घेणे उत्सवा साठी धान्य व साहित्य गोळा करणे उत्साव पुर्वी १/२ दिवस अगोदर जावून झाडलोट करणे, तंबु ठोकणे अध्यक्ष व उदघाटक यांची सुंदूबरे फाट्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढणे. ही शिदोरी बालवयात मिळालेली संधी मिळताच ते ८२ भवानी पेठ तील समाज संस्थेचे विश्वस्त म्हणुन १०/११ वर्ष काम करित होते. आज कोण किती ही वधुवर मेळाव्याचे ढोल ताशे  पिटीत आसु द्यात परंतु यांच्याच काळात महाराष्ट्रात प्रथम वधु-वर मेळावे व सामुदाईक विवाह  सोहळे सुरू झाले हे बाळासाहेब नुसते नमुद करीत नाहीत तर पुणेकर बांधवांची गौरव परंपरा मानतात. श्री. संत संताजी उत्सव हीजीवनाची साठवण मानुन त्यात सहभाग घेऊन शक्य तो त्याग ही करतात. 
    समाज सेवा ही घराण्याची परंपरा त्यांनी वाढवली संभाजी पुला वरील विठ्ठल मंदिर हे एक पुण्याची ठेवण. या मंदिर ट्रस्टवर कै. लक्ष्मणराव काही काळ अध्यक्ष ही होते. श्री. बाळासाहेब या मंदिर ट्रस्टचे संचालक म्हणुन प्रदिर्घ काळ होते. शासकीय नोकरी प्रमाणिक व समाजहिताासाठी करीत असताना अनेक रंजल्या गांजल्या साठी त्यांनी शासकीय लाभनेमात बसवुन करन दिला. सेवा निवृत्ती समयी नायब तहसिलदार या पदावर होते. मी एक तेली आहे ही जाणीव ते विसरत नाहीत तर त्याचा त्यांना अभिमान ही वाटतो श्री. संत संताजी पालखी सोहळा सुरू होताच अंबिके कुटूंब त्यात सामील झाले. आगदी सुरूवातीस पाच जण सामील होते पालखी सोहळा लोक हातच्या बोटावर मोजता येण्या एवढे अंबिके कुटूंबीयांना ते पहावले नाही. डेक्कन वरून पालखी अलका चौकात येताच हे कुंटूंब समोर गेले. या महान संताना बर्फाच्या गाडीवर बसवून आनले हे पहावले नाही. पालखी सुद्धा जुनी व उसनवारी ची होती ही खंत स्वस्त बसु देत नव्हती अंबिकेंनी या साठी शाळा सोबत सुरू केली. याना वेडे आहेत म्हणनारे बरेच होते.  पण हा नवा इतिहास घडवूया म्हणनारो जे थोडे होते त्यातील हे एक यातूनच पहिली पालखी बनवून दिली व श्री संत संताजींना योग्य स्थान दिले गेले.
    मला अभिमान आहे मी तेली आहे त्याचा माझे तेली म्हणुन जसे प्रश्न आहेत तसेच तेली ओबीसी आहे. म्हणुन ओबीसी समाजाचे जे प्रश्न आहेत ते आपल्या सर्वांचे आहेत. याची जाणीव त्यांना झाली सेवा निवृत्तीचा काळ ते या साठी देऊ लागले सामुदाईक प्रश्न संघटने द्वारे सोडवू या भुमीकेतून राष्ट्रीय ओबीसी महासभा स्थापन केली. या संघटनेचे ते संस्थापक सदस्य असुन उपाध्यक्ष ही आहेत आंदोलने सभा, मेळावे भरवून ते संघटन  करतात याच मुळे श्री. मोहन देशमाने यांनी ओबीसी सेवा संघा तर्फे त्यांना सन २०१३ मध्ये शाल, गुच्छ स्मृती व फुले पगडी देऊन ओबीसी जाणीव पुरस्कार दिला होता. श्री. बाळासाहेब रामचंद्र अंबिके यांच्या वाटचालीस सर्वां तर्फे शुभेच्छा.

दिनांक 28-04-2015 00:18:50
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in