दामु धोत्रे हा चार अक्षरांचा आकाशाएवढा माणूस या देशात जन्मास येणे ही या देशाच्या भाग्याची गोष्ट. भारताच्या लोकसंख्येत मूठभर असलेल्या तेली समाज. समाजात जन्म घेणे ही या समाजाची अभिमानाची बाब.
माझे काळीजी कुरतडत गेले, जेव्हा दामू धोत्रे हा माणूस माझा आहे हे समजले तेव्हा. शाळेत पाठ्यक्रमात असलेल्या धड्यातून दामू मुलांना - विद्यार्थ्यांना मी शिकवीत होतोच समाजाच्या इतिहासात संताजी महाराज व गंगू तेलीण ही फक्त ठेव. यांची ठेव तर किती अपुरी ! जेव्हा आपले म्हटले तेव्हा शोधाशोध करून मिळविली त्या माणसाच्या नावाभोवती इतिहास आहे ही समाजाच्या अभिमानाची बाब. ती आम्ही उशीरा का होईना जपतोय.
पुणे तेथे काय उणे ! शिवाजीपासून एस. एम. जोशीपर्यंत या देशाला मोठमोठी माणसे या मातीने दिली. याच मोठ्या माणसांच्या माळेत बसणारा दामू धोत्रे पुण्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान कसबा पेठ, येथे जन्म झाला. ३
दी. ग्रेट इंटरनॅशनल सकॅस ही तुकाराम गणपत शेलार हे धोत्रे यांचे मामा. त्यांचा मुक्काम पुण्यात असताना धोत्रे सर्कस मध्ये दाखल झाले. सर्कस मामांची, पण ते मोठे व्यवहारी. पहिल्याच दिवशी सांगुन टाकले, काम चोख दाम चोख, हे चिमुरडे पोर शारीरिक कसरतीच्या व हिंस्त्र पशूंच्या जगात शिरले. हरएक मुक्कामाला नवा गाव, नवी माणसे नवी भाषा मुळात सर्कस ही अवघड. ही कला आत्मसात होणे गरजेचे होते. भूमितीतल्या तीनशे साठ कोनांत शरीर वळले पाहिजे. अवजड व जोखमीची कामे आली पाहिजेत. हे ज्ञान सावळाराम गुरूजींनी दिले.
शेलार मामांच्या मुळे अल्प काळात व अल्प वेतनात बरीच प्रगती केली. दामू या नावाभोवती सर्कस विश्वात एक वलय निर्माण झाले. वर्तमानपत्राचे रकाने भरून येत. रसिक प्रेक्षक काम पहाण्यास झुंबड करीत व या अजब माणसाचे करीत व या अजब माणसाचे कौतुक करीत. वयाच्या तिसाव्या वर्षी ऑलिम्पीया सर्कस द्वारे परदेशात जाण्याचा योग आला. या भारत मातेच्या सुपुत्राने तिरंगी ध्वज परदेशातल्या एका देशात नव्हे तर पृथ्वीवरच्या जवळ जवळ सर्व देशांत बरोबर नेला. त्या देशातल्या लोकांनी सर्कस पाहिली, धोत्रे यांचे जिवावर उदार होऊन काम करण्याची पद्धत पाहिली ज्यांनी पाहिले ते भाग्यवान होत. रोज वर्तमानपत्रातून रकाने भरून माहिती येत होती. त्या देशाला दामू धात्रे हे नाव वेड लावत होते भारताचा पुत्र दामू धोत्रे किंवा दामू धोत्रे ऑफ इंडिया असा मजकुर प्रत्येकाच्या तोंडी व मनात असे. जग जिंकणारी माणसे या मातीत आहे ही गोष्ट त्यांना उमजत व पटत होती या मोठ्या माणसाला त्या माणसांनी ओळखले कलेचे नुसते चीज नव्हे तर सोने केले. अमेरिकेने हा हिरा आपल्या मातीचा असावा म्हणून अमेरिकेचे नागरिकत्व बहाल केले. जवळ जवळ चौदा वर्ष असा प्रवास झालेल्या धोक्याच्या कामामुळे दिवसेंदिवस प्रकृती ठीक रहात नव्हती मनात आपल्या मातीचा सुगंध दरवळत होता. १९५३ रोजी मुंबईस आले. स्वागतासाठी जनसमुदाय लोटला.
हा झाला दामू धोत्रे या माणसाचा ओझरता स्पर्श. परंतु दामू धोत्रे हा माणूस एक सर्कस एक कलाकार हे आपण समजावून घेऊ तेव्हा अंगावर काटा उभा रहातो. सह्याद्री पर्वतासारखा निधड्या छातीचा हा वीर ज्यांनी पाहिला ते भाग्यवान होत. जीवनात एक एक क्षण सर्कस विश्वात, कसब्यात जन्म घेतलेला एक गरीब तेली कुटुंबातला हा सुपुत्र जेव्हा सर्व जग जिकतो, तेव्हा ही तुमची व आमची अभिमानाची बाब. आजची व उद्याची पिढी अभिमानाने सांगेल, हा आकाशा एवढा माणूस आमचा आहे.