मोहन देशमाने, सौ. केशर काकू गौरव ग्रंथ 31 मे 1992 तुन साभार
सूर्याची कवळी किरणे विजापूरच्या गोल घुमटावर पडली. रात्रभर झोपलेले विजापूर जागे झाले. शहा पेठे जवळच्या घरात रात्रभर जाग होती. आजूबाजूच्या दोन स्त्रिया रात्रभर थांबल्या होत्या. बाहेर ह. भ. प. नामदेव बाळोबा मचाले विठ्ठलाचे नाव घेत बसले होते. जेव्हा अंधारात जगणा-या माणसांना प्रकाश किरण देऊन जगण्याची नवी जिद्द देण्यासाठी सुर्य आपली किरणे घेऊन वर आला. तोच घरातून एक स्त्री लगबगीने आली. नामदेव बाबांना म्हणाली, मुलगी झाली बाबा पुटपुटले, आली रे आली केशर आली !
त्यांना त्या हुमायूनची आठवण झाली. बाबराने स्वार्या करून भाग जींकला पण तो परत गेला. गेलेले राज्य मिळविण्यास हुमायूनने रानावनात कवडी जवळ नसता भटकणे सुरू झाले. या वेळी मुलगा झाला ही बातमी सांगणारास बक्षिस दिले जाते, पण जवळ होती. फक्त डबीत कस्तुरी तीच चिमूटभर हातावर ठेवली. आणि म्हणाला या कस्तुरी सारखा सुगंध सर्वत्र पसरेल. आणि झालेही तसे त्या इतिहासाची पुनरावृत्ती येथे घडली.
बारामतीतून दरमजल करीत आलेले मचाले घराणे विजापूरात स्थिर झाले. संपत्तीचा कळस गाठला. पुन्हा एका पिडीत हालाखी आली. घरात गरिबी नियमीत वावरत होती. काही केल्या दोन वेळचा प्रश्न मिटत नव्हता. त्यात घरातली रांगती चालत होती. पळत होती. आणि त्यात ही केशर आली. बाबांनी धीर सोडला नाही. त्या लहान चेह-यावरचे तेज वेगळे सांगत होते. विठ्ठलाच्या नामस्मरणात गुंतल्याने असे वेगळेपण ओळखण्याची त्याना सवय झाली होती. सवय झाली होती संकटे झेलण्याची. काही दिवस असेच गेले आणि आईचे सुख हरवले. लहानपणी हा पहिला धडा गिरवीला. संकट परीक्षा आहे. त्या संकटाला त्याच ताकदीने उभे राहून उत्तर द्यायचे संकटांनाच तडीपार करावयाचे संस्कार झाले त्या वयात.
एक दिवस त्या रखरखत्या विजापूरात बातमी पसरली वार्यागत. पंडीत नेहरू येणार ! उद्या सकाळी प्रभात फेरी निघणार त्या इतिहासाच्या खुणा जपून असलेल्या शहराला पालवी फुटली होती. रंगी बेरंगी कपड्यात शहर नटून निघाले होते, भारत माता की जय ! इंग्रजांनो परत जा ! या घोषणात प्रभात फेरी सुरू झाली. त्या शहा पेठे जवळच्या त्या घरात. केशरची काल पासून फार धांदल सुरू झाली होती. आपले फाटके जुने कपडे रात्री धुतले, वाळविले सकाळी बाबांनी लवकर उठविले. दारासमोर सडा रांगोळी केली. तो पर्यंत सराफ कट्याकडून प्रभात फेरी आली शहा पेठेकडे केशर आपल्या दारात उभी होती. ती पहात होती माणसांचा समुद्र त्या पुढे नेहरूंचे लक्ष त्या आठनऊ वर्षाच्या मुलीकडे गेले आणि त्यांनी आपल्या खिशातले गुलाबाचे फूल केशरला बोलावून दिले. ते फूल कदाचित याच साठी दिले असेल. या देशाच्या भरभराटीला गरिबांच्या कल्याणाला ही केशर ? केशरच ठरो ! हा नियतीचा संकेत असावा.
त्याच गरिबीत आहे नाही ! अशा स्थितीत केशर मोठी होत होती. शिवाजी पेठ जवळच्या मराठी शाळेत शिकत होती. पुस्तक आहे तर पाटी नाही. नाही तर घरात ढिगभर काम पण केशर या शाळेला रत्न मिळाले एक वेळ शिकवले की पुन्हा ते न वाचता सुद्धा येत असे एक पाठी कुशाग्र बुद्धी शाळेतल्या शिक्षकांन ही बुद्धीमत्ता एक आव्हान होते. आजची सातवी व त्यावेळची व्हक्यूलर फायनल त्या पास झाल्या. या वेळी मराठी बोलणा-या त्या मुलांच्या शाळेला बुद्धीवान । शिक्षिकेची गरज होती. त्या शाळेत केशर शिक्षिका म्हणून वावरू लागल्या त्याच शाळेत एक पिडी घडनिणे या शाळेत जी मुले येतात ती आपल्या सारख्या गरिबांची या गरिब घरच्या काळजाच्या तुकड्यावर संस्कार करावेत हा देश घड विणारे नागरीक बनवावेत या इर्षेने ती शिक्षिका संस्काराचा वहाता प्रवाह झाली...
महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर बराच इतिहास जपला आहे. त्यापैकी चंपावतीराणीचे चंपावती नगर अष्टविनायक हे महाराष्ट्राचे दैवत त्या जोडीला नववा नवगण राजुरीचे नवगण राजा विक्रमादित्य अनेक विक्रम करीत होता. माझ्या सारखा मी ही ग ची बाधा त्या वेळी शनी महाराज होते. शनीची वक्र दृष्टी म्हणजे सर्वनाश शनी हा शेंगा, कर्डी बनविणारा त्यात जन्म घेऊन राजा झाला. एक वेळ विक्रमादित्याला शाप दिला, विक्रमादित्य लुळा-पांगळा होऊन चंपावती या बहिनीकडे आला. आणि एका तेल्याच्या घाण्यावर बसून दिपराग गायला आणि शाप मुक्त झाला ती ही चंपावती नगरी नाथ संप्रदायातील गोरक्षनाथ है। तेली होते त्यांची ही भुमी या पवित्र व इतिहासाच्या पानावर कोरलेल्या गावाजवळ राजुरी हे एक डोंगराच्या कुशीत वसलेले माळावर तरलेले गाव गावच्या आठ ही दिशेला आठ व गावात एक स्वयंभू असे नऊ गणपती, अष्ट विनायकनंतर हे नवगण राजुरी या साठी महाराष्ट्राच्या हृदयात ठाण मांडुन बसलेली. या गावचे क्षीरसागर हे घराणे.
गोष्ट इतिहासाने जपलेली उत्तरेकडून अनेक घराणी महाराष्ट्रात आली स्थिर झाली, आणि भूमिच्या रक्षणासाठी स्थिर झाली. त्यापैकी एक क्षीरसागर घराणे. राजूरी, सुपा, दिवा. नांदगिरी या गावात स्थिर झाली. संताजी धनाजी यांनी जो शिव काळात पराक्रम गाजविला त्याच्या खुणा आज ही पुरंदर परिसरात दिवे येथे आहेत. त्यापैकी नवगणाच्या साक्षीने राजुरी येथे वसलेले हे घराणे असावे अन्यथा एवढी झेप घेता आली नसती.
या घरात सोनाजीराव मिठुशेठ व सारजा अक्का होत्या. सोनाजीराव हे तर तानकट पोर. गावातल्या तालमित अंगातून घामाने जमिन ओली झाली तरी बैठका मारणारे डावाने डाव करून डोळयाचे पाते लवते न लवते तोच समोर च्याला चांदण्या मोजावयास लावणारे एक पैलवान राजुरीचे सोनाजीराव एक चांगले पैलवान. आजुबाजुला शंभर दिडशे गावात ही किर्ती गावातील दोन तीन पैलवान बरोबर घेऊन जत्रा, उरूस व कुस्त्यांचे फड चितपट कुस्त्या करत भिमा नदी काठच्या भिगवनला आले. भिगवनला भिसे नावाचा एक पैलवान त्याची मैत्री जमली. इथे बीडचा भारी पैलवान हा डंका पसरलेला फडात काही वेळा जोडच मिळत नव्हता. सिंहासारखा धिप्पाड पैलवान नुसता पहाताच समोरचा हादरत होता. कुस्ती संपताच भिसे यांना राजुरीचे येण्याचे आमंत्रण देऊन राजुरीला आले.
येतो म्हणालेले भिसे एक दिवस राजुरीत आले. दारात-घरात करडीचा ढीग घाण्याला बैल घाण्यातून निघणारे तेल व पेंड त्या पेंड तेलाची विक्री ही पिढीजात पद्धत भिसे यांची ही होती, म्हणजे सोनाजीराव आपल्यापैकी पहिली मैत्री अधिक वाढली. सुख-दु:खाच्या जीवाभावाच्या गोष्टी झाल्या. त्यांना समजताच ते जरा दुःखी झाले सार्या मुलखांत नावाजलेला हा पैलवान घरात दुःखी होते. संसार सुरू होता होताच संपला.
एक साक्ष राहिली मुलीच्या रूपाने आता काय हा प्रश्न होता. भिसे यांनी कसला तरी विचार केला. आणि भिगवण गाठले. भिगवणचे नाते विजापूरातील मचाले घरात आपल्या नात्यातील केशर सोनाजीरावाना द्यावी. नामदेव बाबांना सर्व सांगितले विजापूर बीड हे अंतर इतक्या लांब केशर नको पोरीची आठवण झाली तर इतके लांब जावे केव्हां परंतु होय नाही म्हणत म्हणत लग्न ठरले.
लग्न होणार होते राजुरीत मोजके पाहुणे घेऊन मुलीचे वर्हाड राजुरीच्या शिवेवर आले. या मातीचा सुगंध सात जन्माचा हे केशरबाईना पटले इकडे गावात शांतता निरोप आला हा रजाकराचा मुलख काय घडेल सागता येत नाही तेव्हा ही शांतता तरी गावात हुरुप आलेले घरचेच लग्न समजून गाव झटत होते. लग्न झाले वाजत गाजत बंदुकीच्या सात फैरी झाडून कु. केशरबाई मचाले सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर झाल्या घरातली लहान मुले केशर काकू म्हणू लागली घरातली काकू गावच्या मुलांची ही काकू झाल्या.
सोनाजीरावांना सर्वच नाना म्हणु लागले, तो काळ रजाकरा होता. देशावर इंग्रजाचे राज्य तर राज्यावर हे त्यांचे संस्थान न्याय हा नव्हता तर सुखा समाधानाने अन्याय नांदत होता. रजाकाराची वाकडी नजर सर्वत्र संपवित होती. पैलवान नानांना ही बांधीलकी कशी पेलणार ? त्यांनी कुठ तरी विरोध सुरू केला कानोकानी रजाकराला कळले, कळताच धरपकड सुरू झाली, घरात केशर काकु घर सांभाळत पहात होत्या रांगता रांगता चालणारा जयदत्त आपल्या डोळ्यांनी पहात होता. घरात गोविद मामा होते. मामाच्या खांद्यावर बसून भकासपणे पहात होते. दाटलेल्या कंठाने विचारी आई ! नानांना पोलिस कधी सोडणार ?
दिवस असे हात धुवून पाठी लागलेले. काकुंनी जयदत्तला घेतले आणि घर सोडले. रानावनाचा आसरा घेतला. वनवास आला पोलिसांना चुकवण्यास या चिमुकल्या पोराला झाडाच्या सावलीत ठेवलं. कुठं वस्ती पहावी भाकरी मागावी ती पदरात लपवून आणावी ती वाळलेली भाकरी पाण्याबरोबर त्या कोवळ्या मुलाला द्यावी. एक दिवस गोविद मामा, काकु व लहानगा जयदत्त निघाले हैद्राबादला, जावयास पैसे नाहीत. जेवणास अन्न नाही. डोक्यावर उन्ह, अंगातून घाम, पाय पोळत वाटचाल सुरू झाली. भेटेल त्या गावात गावातल्या देवळात मुक्काम करित हैद्राबाद गाठले. इथे रजाकराकडे आपले म्हणने मांडावयाचे होते. रात्र झाली शेजारच्या देवळात पोटभर पाणी पिऊन गोविद मामा काकू व जयदत्त झोपले होते. अंधारात चाहूल लागली.
‘कुठले आहेत ? का आलात !’ काकुनी देवळातला दिवा मोठा केला. ते अगडबंब लोक होते हातात कुन्हाड घेऊन.
‘तुम्हाला जिवंत मारावयास.’
‘का मारणार बाबा ? ’ काकू.
‘तुम्हाला जिवंत मारण्याची सुपारी घेतली आहे.’
‘सुपारीच घेतली आहेस ना मग मार?’ काकू आणि त्या मिनमिनत्या प्रकाशात त्या देवळातली मूर्ती समोर काकुचा चेहरा पहाताच त्यांनी कुन्हाड खाली ठेवली.
‘तु मारणार होतास ना.’
‘तुम्हाला पाहिल्यावर या देवाची आठवण झाली त्याच्या चेह-यावर जे तेज आहे ते तुमच्या जवळ आहे.’ आणि ती राक्षस बनून आलेली माणसे माणूस बनुन गेली. हा प्रकार गोविद मामा पहात होते. हा छोठा जयदत्त पहात होता. काम होताच आपल्या भागात आले. तोपर्यंत सोनाजीराव भेटले छोट्या जयदत्तला. ‘नाना आले !’ हा आनंद गगनात मावेना नाना काकूनी विचार केला. थोडे हात पाय हालवुन एक घाना बैल, व चार पाच पोती करडीच्या गोळा केल्या उंदर गावात पुन्हा उद्योग सुरू केला नानांनी भल्या पहाटे उठून घाना जुपावा काकुंनी लहान मुलांचे आवरून स्वयंपाक करावा व करडी भरडुन पाकडून घ्याव्यात. मिळणाच्या चार पैशावर घर टापटपीत चालले होते. कशाचे काही कमी नव्हते.
देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर आलेला रजाकराची पक्कड ढिली होऊ लागलेली नानांनी राजुरी गाठली घराला घरपण आले, माणसांना भाव मिळाले धंदा तेजीत सुरू झाला. जयदत्त पाठोपाठ घरात चालणारी रांगणारी पाऊले वाढत होती. नाना पैलवानी माणुस हा सिहासारखा माणुस धंदा करित करित गावातल्या चावडीत पंचायतीत उठ बसू लागले. एक वजन होते. शब्दाला किमत होती. स्वातंत्र्याचे लोकशाहीने समाज कारणाचे संस्कार मनावर चांगलेच बिबले होते. त्याला वाव मिळू लागला.
काकु जेव्हा राजूरीत आल्या तेव्हापासून त्याना एक सलत होते. रजाकराच्या मुलखात ही पडदा पद्धत ही एक बायकावर सक्ती आहे. हा पडदा दूर झाला पाहिजे. आजूबाजूच्या बायकांना सांगितले पण त्या काय साथ देइनात, काकु जे करावयाचे ते ठरवून, आणि का याचा विचार करून, आणि मग मागे सरणे नाही. फावल्या वेळात गप्पा गोष्टी करता करता ही पडदा पद्धत बंद करावयास चांगलीच सुरूवात आणि ती पद्धतच बंद झाली. बायकांनी एकत्र यावे संक्रात व पंचमीला जास्तीत जास्त लग्नात इतरवेळी नाही. त्यांचे एक मंडळ असते ही गोष्ट कुठे पुण्यात मुंबईत नुसती सुरवात झालेली. काकुंनी हे वाचले आणि नवगण राजूरीत महिला मंडळ सुरू केलेही, या मंडळाने पहाता पहाता चांगलाच जोर धरला.
जेव्हा गावात सरपंच कोण असावे हा विचार सुरू झाला तेव्हा गावाने नानांना सांगितले गावची सरपंच काकु असाव्यात. नाना घरी गेले. काकुंना सांगितले, “गाव म्हणते सरपंच हो. महिला मंडळाचे काम ही एक फार मोठी किर्ती झाली आहे.”
“मग होते सरपंच.” काकू.
नानांनी क्षणभर विचार केला. गाव खेडेगाव, या गावात आपली घरेहाताच्या बोटावर मोजता येणारी. पण हिम्मत जिद्द ही लाख पटीची,आपल्यागतच केशर, नानांनी होकार आणि त्या दिवशी सौ. केशरबाई सोनाजीराव क्षिरसागर सरपंच झाल्या. गावचे कर्तेपण घरात आले. घराला घरपण आले.
एक दिवस बातमी आली. भूदान करणारे गांधींचे वारसदार विनोबा भावे राजूरीला येणार. काकुंना हुरुप आला. महिला मंडळाला सूचना दिल्या. या त्यागी पुरुषाचे पाय या भूमीला लागणार ! ही भूमी पवित्र होणार, विनोबा राजुरीत आले. आणि देशप्रेमाची त्यागाची, निष्ठेची, धडपडीची शिकवण देऊ लागले. त्यांनी काकुंना सांगितले, “या ठिकाणी थांबू नका. हे समाज कार्य यापेक्षा मोठे करा. तुमच्यासारख्या धडपडणार्या महिलांची गरज या देशाला या स्वातंत्र्याला आहे यासाठी माझे आशिर्वाद सदैव पाठीशी आहेत.”
स्वतंत्र भारताच्या या ऋषीचे मिळालेले आशिर्वाद काकू पाठीशी घेवून पहिल्यापेक्षा जोमाने कामाला लागल्या. गावात चौथीपर्यंत शाळा ती सातवी केली, पुढचे शिक्षण बीडला. बीडला कोण जाणार. आजूबाजूला नुसता उघडा माळ या माळावर गुरेही चरत नाहीत तेव्हा दिवाळी संपताच गुरेढोरे माणसे पोरे घेऊन साखर कारखान्यावर जावे. ऊस तोडावा मिळेल ते कनवटीला बांधून उन्हाळा संपता संपता घर गाठावे कसली शाळा कसले शिक्षण. काकू विजापूरला शिक्षिका होत्या. शिक्षण हे माणसाला माणूस म्हणून जगू लावते. हा त्यांचा जिवत अनुभव या गावाला हायस्कूल असावे ज्ञानापासून वंचित राहिलेली ही माणसे शहाणी होतील सुखी होतील हा विचार करून मनात ठरवून त्या उभ्या राहिल्या. मुले नाहीत आहेत. सहकारी देऊ पाहू या वातावरणात नवगणांचे दर्शन घेऊन 12 जुलै 1955 रोजी नवगण हायस्कूल सुरू केले. पावसाळ्याचे दिवस होते. चिखल तुडवत गावातल्या घरात आजुबाजुच्या गावात फिरू लागल्या शाळेचे महत्व सांगू लागल्या. आणि एक एक पोर गोळा करू लागल्या प्रत्येक घरात प्रत्येक गावात जेव्हा त्या फिरल्या तेव्हा डोळ्यात आसवे आटलेल्या या माणसांच्या सहन शक्तीची कीव करावी वाटली. आभाळाने झोडपले तर तक्रार कुठे करणार ही अवस्था या माणसांची काकुंनी त्यांना जीवन जगण्यास ज्ञानदान सुरू केले,
तरी प्रश्न सुटत नव्हता. शाळेत येऊन काय तेच सुगीत साखर कारखाना पाहिला तर जेवता येते. तेव्हा या पेक्षा तेच बरे ‘काकू’ ही शक्ती संकटांना पिळवटणारी त्यांनी मुलासाठी एक व मुलीसाठी एक वसतीगृह सुरू केले त्या मुलींना वस्त्या वस्त्या गावोगाव भटकुन गोळा करावे. त्यांना स्वतः शाळेत शिकवावे. प्रसंगी स्वयंपाक करून जेवू घालावे. घरातले अन्नधान्य वसतीगृहाला पुरवावे तेव्हा घरात जयदत्त, पुष्पा, सुनिता ही लेकरे वसतीगृहाची मुले व ही घरची मुले हा भेदच संपला प्रसंगी घरच्या मुलांची आबाळ होई पण वसतीगृहात नाही, शाळा नवीन होती शिक्षक मिळे न मिळे काकु स्वतः शिकवीत या मुलींना जेवण सुद्धा घालत त्यांची आई काकूच झाल्या प्रत्येकांच्या मनात काकू ही एक मानवता रुजली.
काकूच्या मनात रुजली होती गरिबी गावातल्या महिलांनी ठरविले एक नाटक बसवायचे नाटकात काम करणार सर्व महिला पण जेव्हा पात्र वाटप सुरू झाले तेव्हा प्रश्न उभा राहिला नाटकात भिकारनीचे काम कोण करणार काकू म्हणाल्या, ‘हे काम मी करणार,’ गावची सरपंच बाई भिकारणीचे काम करणार हे जरा बायकांना पटेना पण काकुचा आग्रह नाटक सुरू झाले. गरिबी दैन्य दु:ख व दारिद्र हे काकुंना नवे नव्हते. त्याच कुशीत राहून सलाखुन निघालेल्या ते रक्तात भिनलेले फाटकी कपडे काखेत तान्हे मुल घेऊन जेव्हा काकू स्टेजवर आल्या तेव्हा समोरच्या लोकांना गहिवरून आले. त्यांच्या समोर एक दैन्य उभे राहिले. कोणताही कलाकार यशस्वी कधी होतो. आपण पाहिलेले अनुभवलेले जेव्हा तो लोकांसमोर मांडतो ते लोकांच्या अंत:करणाला भिडते तेव्हांच तो यशस्वी होतो, समोरच्या लोकांना जेव्हां गहिवर आला हीच काकूच्या कामाची पोच पावती.
गावच्या विकासाला शाळा. वसतीगृह, रस्ता, पाणी यासाठी काकु राबत होत्या अनेक ऑफिसमध्ये हेलपाटे मारून आपला मुद्दा पटवून देऊन विकास साधत होत्या. एक वेळ बीडला सर्कस आली. काकू कामा निमित्त बाहेर गावी गेलेल्या वसतीगृहातल्या मुली घरात आल्या काकूच्या थोरल्या कन्या पुष्पाताई यांना त्यांनी घेतले व त्या दहा अकरा वर्षाच्या मुली 15-20 मैल बीडला सर्कस पहावयास गेल्या. सर्कस सुरू झाली बाहेर आकाशात ढग जमू लागले अंधार पडला वळीव पडणार हे दिसू लागले. काकु बाहेर गावावरून राजुरीत आल्या वसतीगृहात मुली कमी आहेत. घरात पुष्पा नाही. बाहेर वळिव सुरू होतोय. घरची पोर नाही यापेक्षा वसतीगृहात मुली नाहीत चौकशी करताच समजले. दारातली ट्रक सुरू करावयास लावली आणि बीड गाठले इकडे सर्कस वळव्या पावसाने बंद झालेली, त्या पावसात मुली राजुरीकडे निघालेल्या काकुंनी पाहिले गाडी थांबवून त्यांना घेतले राजुरी गाठली ओली कपडे बदलण्यास लावले आणि चुकीला शिक्षा ही झालीच पाहिजे हा त्यांचा स्वभाव असल्याने त्यांनी पुन्हा असे घडणार नाही अशी शिक्षा केली.
काकुंना अशा एका बिकट प्रसंगाला तोंड द्यावे लागले आणि यातच त्यांची पक्ष निष्ठा, कार्यपद्धती कोरली गेली. काकुंना दोन दिवसापूर्वी पूत्र रत्न झालेले. पाऊस काळ सुरू झालेला. त्यात पंचायत समितीची निवडणूक नद्या-नाल्यांना पूर आलेला त्यावेळी फक्त पंचायतीचे सदस्यच मतदान करू शकत. सकाळी सकाळी काकु उठल्या दोन दिवसाच्या मुलाला आपल्या थोरल्या मुलीजवळ ठेवले. सौ. पुष्पाताईनी त्याला मांडीवर घेतले आणि काकू निघाल्या ओली बाळंतीण असून भर पावसात वाटेत ओढा पाण्याने तुडुंब वहात होता. लोकशाहीची ही पालन कर्ती स्त्री त्या ओढयात त्या पाण्यात उतरली आणि मतदान करावयास गेली. विजापूरला जेव्हां नेहरू आले होते तेव्हा त्यांनी गुलाबाचे फुल दिले. विनोबांनीही दिलेले आशिर्वाद ते याच साठी असावेत. काकू मतदानाला जावून 4-5 तास झाले हे दोन दिवसाचे मुल रडू लागले, काही केल्या आवाज बंद होईना. काकुंची थोरली कन्या पुष्पाताई हवालदिल झाल्या आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता त्या बहिनीने या भावाला आपल्या पदराआड दडविले जेव्हा पोट भरले तेव्हा गाढ झोपले तेवढयात काकु आल्या. आणि त्या गाढ झोपलेल्या मुलाकडे पाहून समाधान वाटले.
तालुक्यात नाव निघू लागले. नवगण राजूरीला केशरकाकु नावाची बाई सरपंच आहे. या काकूने वसतीगृह काढले हायस्कूल काढले. महिला मंडळ काढले, पंचायतीद्वारे सुधारणांचा पाऊस आणला. जी माणसे डोळयातले पाणी आटवून भकास आकाशाकडे पहात होती. नशिबाला म्हणून रडगाने गात होती. त्या गावाला त्या माणसांना काकू ही एक किमया भेटली. हा गवगवा तालुक्यात पसरला जेव्हा पाच वर्षांनी पुन्हा पंचायत समिती निवडणूक आली तेव्हा काकु पंचायत समितीला उभ्या राहिल्या. लोकांसमोर काम होते लोकांनी काकुंना विजयी केले. गाव सुधारले आता बीड तालुका पंचायत समितीत पाऊल टाकले आणि सभापतीपद चालून आले.
बाई सभापती होणे हा मराठवाड्यातील तसा पहिला प्रसंग असावा. प्रत्येक प्रश्नात घरात नानांची चर्चा त्यातून निर्णय व कार्यवाही प्रत्येक वस्तीवर. प्रत्येक गावात काय हवे याची प्रत्यक्ष पहाणी करून जे जे करता येईल ते ते करणे हे ध्येय ठरविले. ज्ञानाची ज्ञान गंगा या मराठवाड्यातील प्रत्येक घरात गेली तरच या ओसाड भागाचा विकास होऊ शकेल. हा भाग एकनाथ, ज्ञानेश्वराच्या तो वारसा तरच अखंड राहिल. सभापती पदावर असताना हा विचार बाळगून काकु उभ्या राहिल्या.
बीड येथे श्री. सरोदे यांचे विनायक विद्यालय होते. काकू व श्री. सरोदे यांच्या चर्चेतून विनायक विद्यालयाची सुत्रे काकूकडे आली आणि बीड शहराच्या भर वस्तीत रिक्क्षा सायकल चालविणारे, हमाली करणारे. पडेल ते काम असेल ते दाम घेऊन जीवन जगणारी ढिगाने काकूनी आपले लक्ष या कोपर्यातील माणसावर टाकले, या माणसांना शिक्षण मिळाले तर तो सुखी होईल. यासाठी त्यांनी विनायक विद्यालय हे ज्ञानदानाचे विद्यापीठ खर्या अर्थाने ज्ञानगंगा तयार केली. मग बीड शहरात गीता कन्या शाळा व प्राथमिक शिक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू केले.
काकुंची तळमळ व सर्व सामान्यांची धडपड पाहून कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आता आमदारकी पण या आमदारकीत काकुंना यश आले नाही. आपण अपयशी ठरलो. हा ठपका इतर कोणाचा नाही तर आपला आहे. आपल्या अपयशाचे जबाबदार आपण यश कार्यकर्तेची धडपड. सामान्य माणसे व त्यांची सेवा हीच खरी कार्यपद्धती. या कार्यानं काकु पुन्हा त्याच जोमाने उभ्या राहिल्या. आणि पुन्हा जेव्हा आमदारकीला उभ्या राहिल्या तेव्हा. रथी महारथीसमोर असताना काकु जवळ फक्त सामान्य कार्यकर्ते या बळावर व कार्याच्या पतीवर काकु आमदार म्हणून मुंबईला गेल्या.
सौ. काकु आमदार झाल्या हे बीडकरांना अभिमानाची बाब झाली. श्री. नाना बीड सभापती पदावर आले. बीड जिल्हा भू विकास बँक अध्यक्षपद मिळाले. नानांना सौ. काकूच्या कार्यपद्धतीचा, आचार पद्धतीचा अवलंब केला. विकास हा केंद्र बिंदू माणून सामान्यांचा शोध व प्रगती ही वाटचाल सुरू केली.
काकु मुंबईला गेल्या. काकु कुठे जरी गेल्या तरी ‘आपण एक शिक्षिका होतो.’ हे त्यांच्या लहानपणी मनावर कोरलेले लोपले नव्हते. आता बीडला कॉलेज सुरू करावयाचे जे करावयाचे त्यावर साधक बाधक विचार करूनच. पण काम सुरू करताना माघार नाही ही कार्यपद्धती बीडला कॉलेज काकु सुरू करणार हे कळताच अन्य लोकांनी अर्ज केला. वर पर्यंत हात होते. वर पर्यंत धावपळ सुरू झाली. काकु शांत होत्या हे पाऊल यशस्वी होणार हे त्यांना पटले होते. उलट सूलट बीडला चर्चा झाली. पण नवगण संस्थेला महाविद्यालय मिळालेच. आपल्या संस्थेला महाविद्यालय मिळाले ही गोष्ट नवगण संस्थेत हा बीडमध्ये वार्यासारखी पसरली. काकू या नावाला पहिल्यापेक्षा अधिक दबदबा आला.
पावसाळा सुरू झाला आणि महाविद्यालय सुरू झाले विद्यापीठाचे प्रतिनीधी मंडळ सुविधा पहाण्यास येणार होते. यावरच मान्यता होती. असा निरोप दुपारी आला. काकुंनी विनायक विद्यालयात जाऊन श्री. आगळेसरांना घेतले. अपुर्या गोष्टीची चर्चा केली आणि कॉलेजचे आवार होते. दोन कर्मचारी होते त्यांना कामास जुपले आणि स्वतः आगळेसरांच्या बरोबर काम करू लागल्या. रात्रीचे आठ वाजले, नऊ वाजले गेटवर नावाचा बोर्ड उभे करणे बाकी होते. पोटात भूकेचा डोंब उसळला होता. आगळे सरांनी व दोघा कर्मचार्यांनी खड्डा खांदावयास घेतला. पावसात भिजणार्या कर्मचार्यांच्या डोक्यावर छत्री धरून स्वतः काकु पावसात भिजत उभ्या होत्या. जेव्हा सर्व मना जोगे झाले तेव्हा त्या घरी गेल्या.
काकूने कॉलेज सुरू केले ही गोष्ट तशी काहीना बोचली त्यांनी आपले काम सातत्याने सुरू ठेवले. त्यामुळे कामात अडथळे येऊ लागले. काकु आमदार झाल्या पण एक गृहिणी ही होत्या. घरात नवरात्रीचे कडक उपवास सुरू झाले. त्या स्वतः उपवास करित होत्या. सहावा किंवा सातवा दिवस आला विद्यापीठाचे पत्र आले. पत्र वाचले आणि उपवासाने दमलेल्या काकु उभ्या राहिल्या औरंगा बादला जाण्यास. नानांनी समजावले पण मी जाणार आणि कॉलेजला आडवी आलेली धोंड अलगद बाजूला राहणार एवढे सांगून त्या बीड स्टॅडकडे निघाल्या. अश्विनमधले दुपाराचे कडकडीत उन्ह त्यात नवरात्रीचे उपवास पाई चालता चालता त्यांना चक्कर आली आणि काकू रस्त्यावर पडल्या. आजूबाजूच्या माणसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. काकुंना चक्कर येऊन पडल्या ही बातमी नानांना समजली.
नाना आले. कार्यकर्ते काकू जेव्हां शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांनी प्रथम विद्यापीठात एक माणूस पाठविला आणि श्री. अंबेकर या शिक्षकाला बोलाविले तेव्हा ते नवगण संस्थेने सुरू केलेल्या एका ग्रामीण शाळेत होते. खास माणूस गेला अंबेकर आले. आणि डॉक्टर सांगतात काही दिवस सक्तीने विश्रांती घ्या. अशक्तपणा जाईपर्यंत शेवटच्या थेंबापर्यंत झगडने हा त्यांचा पिंड अंबेकर आले आणि शाळांच्या अपुर्या बांधकामावर चर्चा मार्गदर्शन व कार्यवाई सुरू झाली मरणाच्या दारात ही शाळा, आणि विद्यार्थी विकास, सामान्याची प्रगती साधु पहाणारी काकु ही अनेकांच्या जीवनाची सहज शिल्पकार झाल्या.
कॉलेज सुरू होताच त्याला जोडुन होमेपेथीक मेडिकल कॉलेज सुरू केले, शाररिक शिक्षण महाविद्यालय सुरू केले अनेक प्रामीण भागात माध्यमिक शाळा सुरू केल्या हे करित असताना त्यांनी पुणे मुंबईच्या बाजारात तयार झालेला शिक्षक न शोधता ग्रामीण भागाशी नाते असलेला शिक्षक शोधला शाखांच्या वाढी बरोबर विद्यार्थी गुणवता वाढविण्यास एस. एस. सी, निकालात दिसू लागली. याच मुळे या संस्थेचे अनेक विद्यार्थी भावी काळात मानाच्या जागेवर सहज जावू शकले.
काकुची कार्य पद्धती त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांना समजली मराठवाड्याच्या दौर्यात त्यांनी त्यांची जाहीर प्रशंसा केली. तो 1972 चा दुष्काळ होता. पाण्याचा सुकाळ असलेला पश्चिम महाराष्ट्र उघडा तर दुष्काळाचे कवच कुंडले लाभलेला बीड जिल्हा कसा असेल काकु या काळात अमदार निवासात क्वचित असत असतील तर दुष्काळी कामे मंजुर करण्यास इतर सर्व वेळ गागोगावी अन्न-पाणी विना वार्यावर जगणार्या माणसांना काम धंदा व जगण्यास जीवन देण्यासाठी धडपडत होत्या. ही धडपड शासनाच्या नजरेत आली. आणि महाराष्ट्र रोजगार हमीची जबाबदारी आली तशी ही योजना कष्टकर्यांना जीवदान देणारी राबविणे सुरू होती. कुशलपणे राबविली तर ही भविष्यात गंगोत्री ठरेल रोजगार हमी अध्यक्ष पदावरून संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा कायापालट करण्यास हातभार लावू लागल्या अनेक कामे बीड जिल्ह्यात राबवू लागल्या त्यातून संपूर्ण बीड जिल्हा काकू या नावाला कामाच्या पोचपावतीवर ओळखू लागला.
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आणि मंत्रालयात सातारा जिल्हा व महाबळेश्वर तालुका येथून रोजगार हमी कामगारांचे पत्र आले. मजूरी मिळत नाही अधिकारी बेफिकीर आहेत. काकुंनी ड्रायव्हरला सूचना दिल्या गाडी सातारा कलेक्टर ऑफिससमोर आली. जिल्हा अधिकारी सांगतात मी जाऊन पहातो. पण नाही मला वस्तुस्थिती पहावयाची. निघाल्या काकू महाबळेश्वरच्या पायथ्याला तापोले खोर्यात, कोयना धरणाचे पाणी पसरलेले लाँचमध्ये बसून वासौट्याच्या जंगलात आल्या. हा वासोटा ताई तेलणीचा स्वराज्यात इंग्रजांना नाकी नऊ आणनारी बाई. या ठिकाणच्या मजुरांच्या तक्रारी पाहिल्या. अधिकारर्यांना समज देऊन निघाल्या तोच पावसाळयातला पहिला पाऊस. त्या घनदाट परिसरात पहिला पाऊस सुरू होता. तोच त्या वादळात लॉच हेलकावत . निघाला. किनारा जवळ येण्याअगोदरच लाँचने वादळासमोर हार घेतली काकु त्या वादळात काठावर आल्या. एक बाई ! आमदार! अध्यक्ष ! याही स्थितीत साध्या मजुरांच्या अन्यायाला न्याय देण्यास प्राण धोक्यात टाकते, हे समाजसेवकाचे रुप त्यांना नविन होते
नेहरूंनी प्रभात फेरीत परकरातील संस्कार क्षम मुलिला गुलाबाचे फुल देऊन काँग्रेस हे संस्कार केले. त्या संस्काराला नानांच्या विशाल अंतकरणाने व विनोबांच्या आशिर्वादाने दिशा मिळाले, काँग्रेस ही काकुची रक्तवाहिनी झाली. या पक्षावर आणिबाणीनंतर अघात झाले. अनेक पट्टीचे म्होरके सत्तेच्या बेरजेत पटापट उड्या टाकून पसार झाले. काकू आपला बीड जिल्हा घेऊन उभी राहिल्या. । या सर्व कार्य पद्धतीने नाजूक अवस्थेत पक्ष असताना सौ. काकुंना पक्षाने खासदारकीचे तिकिटे दिले.
काँग्रेसचे तिकिट म्हणजे यशाचीच हमी ही अवस्था त्या काळात नव्हती. मी मी म्हणनारे हबकले होते. त्यात ही केशरकाकू नव्हती. काकू हे एक वादळ बीड जिल्हा गाव, माणूस, वस्ती इथे पोहचलेले. कार्यकत्यांचे अखंड मोहळ व परिश्रम या बळावर कामाच्या पतीवर त्या निवडूण गेल्या.
काकु सरपंच होते आम्ही गप्प बसलो. काकु सभापती होते. काकु आमदार होते. काकु अध्यक्षा होते. काकू खासदार होते. हे मात्र आती झाले, काहींनी ओळखले शिक्षण हा काकूच्या कार्याचा आत्मा, ज्ञानदान, संस्कार ही त्यांची गंगोत्री तीच संपली तर ? त्यासाठी नवगण संस्थेच्या कॉलेजला वादळात आणले. काकु हातबल झाल्या. दिल्लीत विचार चकरात अडकल्या. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांनी विचारल, “क्यों ? क्या हो गया !”
“मैं औरत होकर भी कुछ लोगों की सेवा करती हैं. और मुझे बहोत परेशानी पड़ती है ! ”
“डरो मत, औरत मैं भी हूँ-फिर डरना नही । आगे बढो, तुम सफल हो जायेगी । ”
काकुंना मिळालेला हा एक आशिर्वाद. कॉलेजचे वादळ शमविले. आणि या माणसासाठी काय करावयाचे हे खासदारकीचा फॉर्म भरतानाच ठरविले होते. ऊस तोडणे त्याची पाचड गोळा करणे हा नशिबाचा भोग. ऊस विकणार कोठून साधे कुसल न पिकणारा माळ, अशा माळावर साखर कारखाना काढावयाचा त्यावेळचे सहकार महर्षि व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना काकुंनी सर्व कथन केले. कारखाना मंजुरीसाठी फाईल दिल्लीला गेली. कारखान्याची फाईल खाली होती. काकुणी इंदिराजी, दादा व इतर ज्येष्ठ सदस्यांना आपलेमत स्पष्ट केले. काकुंची तळमळ पाहून सर्वच अवाक झाले. कारखाना मंजूर झाला. बीडला चर्चेचे मोहळ. जीथे कुसळ पिकत नाही तेथे ऊस काय पिकणार कारखाना चालणार कसा. पण या भूमिला काकु ही किमया माहितीची आहे. जिथे काकू तिथे काम. हा विश्वास भाग-भांडवल गोळा करू शकला. पहाता पहाता. राजूरीच्या माळावर नवगणच्या साक्षीने गजानन कारखाना माळातून स्वयंभू गजाननासारखा वर येऊ लागला. मान्यवरांच्या उपस्थित सर्वसामान्यांच्या पाठबळावर साखरकारखाना सुरू झाला. ऊसाचे फड तोडून जगणारे. ऊसाचे फड मालक होऊ लागल. बिदूसरेच्या पाण्यावर ऊसाची राने होऊ लागली. गाळप क्षमता पुरवू लागले. कारखाना तोट्यातून चालला होता. गाळप करण्यास ऊस मिळेना तेव्हा अत्यंत हालचाली केल्या. कारखाना तोटा भरून काढू लागले, स्थानिक शेतकर्याला बँके मार्फत, कारखान्यामार्फत कर्जपुरवठा अर्थिक सहकार्य देऊन ऊस उत्पन्न वाढवून हारितक्रांती सुरू झाली. गजानन कारखाना हा अनेकांना वरदान ठरला.
बीडचा विकास होत नाही याला हे शहर कोणत्याच रेल्वे मार्गावर जोडले गेले नाही. तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन अनेकवेळा शिष्टमंडळ नेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रेल्वेमंत्रालयाला या प्रश्नाची जाणीव झाली व कार्यवाहीस अल्प सुरवात झाली. वीसावे शतक निघाले एकविसावे आले. या पाश्वभूमीवर रेडिओ, टी. व्ही. ही लोक जागृतीची साधने झाली. यापासून हा भाग वंचित राहु नये यासाठी त्यांनी दिल्लीदरबारी प्रयत्न करून दोन्ही केंद्रे मंजूर करुन घेतली. एस. टी. डी. सारखी सोय ही त्यांनी करुन घेतली.
या सर्व धडपडीत त्यांनी शिक्षण या शब्दांना विसरल्या नाहीत. बीड शहर तालुका या बाहेर कार्यक्षेत्र वाढले. आजूबाजूच्या तालुक्यात कॉलेज, हायस्कुल सुरु केली. त्यांची स्थापना उभारणौ विना अनुदानावर सुरवात अनेक समस्या त्यातून शालेय गुणवत्ता साधन्यासाठी प्रयत्न ही त्यांची धडपड सुरू झाली.
सौ. केशरबाई सोनाजीराव क्षिरसागर ही महाराष्ट्राची अशी साठवण महाराष्ट्राच्या इतिहासात बीडची भामा तेलिण वासोट्याची ताई तेलिन, अफझल - खानापासून भवानीमातेचे तुळजापूरला रक्षण करणारा ब्रह्मानगरचा तेली. शिखर शिंगणापूरच्या मंदिराचा मानकरी भुत्या तेली. ही तेली समाजाची ही इतिहासाची साठवण. त्यात शिखरे ठरणारी बाब हा या समाजाचाच नव्हे तर महाराष्ट्राचा अभिमान. जो मराठी माणूस आहे त्याला तुकोबा गाथा ज्ञात आहे. भंग न पावणारे अभंग ही महाराष्ट्राची धनदौलत. अतिशय बीकट प्रसंगात स्वतःचे प्राणपणास लावून जपणूक व भर घालणारे चाकणचे संताजी जगनाडे. ही महाराष्ट्राची संस्कृतीची ठेवण. संताजी महाराजांचे सममाधीस्थान सदंबरे हे गाव. या गांवी दरवर्षी महाराष्ट्र पातळीवर समाजबांधव एकत्र येतात महाराष्ट्राची धुरा संभाळणारी ही संस्था सौ. काकुंना आपल्या घरात समाजानेमाहेरची साडी देऊन समाज भूषण हा गौरवाचा मान बहाल केला. समाजाच्या विकासासाठी काकुंनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बरेच प्रयत्न केले व करतात ही.
समाजसेवा हा वसा घेऊन वावरताना एक दिवस अस्थित्वाचा प्रश्न उभा राहिला. पावसाळा सुरु झाला. त्यांचे घर बिदूसरा नदीवरिल नव्या पुलाजवळ, नदीच्या काठावर-दिवसभर पाऊस होता. रात्र झाली पाऊस कमी न होता किंचीत वाढला. मध्यरात्र झाली. महापूर ! महापूर ! ही एक अर्तकिंकाळी नाना, जयदत्त, भारतभूषण, खडबडून जागे झाले. रहात्याघरात कंबरभर पाणी साचले. काकु त्याअवस्थेत घराबाहेर आल्या. सर्वत्र अंधार, धावा, पळा वाचवा या किंकाळया. नाना पुराने वेढलेले घर पहात होते. जयदत्त भारतभूषण व काकू. त्या पुरात त्या पाण्यात सर्वस्व वाहून निघालेल्या माणसांचे प्राण वाचवित होत्या. पाणी ओसरत नव्हते काकु घरात आल्या नवी साडी खन नाटळ घेतला. त्या नदीकाठी आल्या नदीची ओटी भरली व हात जोडले, “बिदुसरे तुझ्या जीवावर जगणारी ही तुझी लेकेरे. तुच जर असा अकाडतांडव करून सर्वस्वं हिरावणार असशिल तर आम्ही आसरा मागावा कोठन ? तूच वाचव !”
आणि अशी ओटी भरताच पाणी ओसरु लागले. दिवस उजाडला तेव्हा महापूराचे स्वरुप जानवु लागले. समोरच नवा पूल वाकला होता. समोरचे हुतात्मास्मारक वाहून गेले. प्राणी संग्रहालय संपले. आणि नदीच्या काठावरची हजारो घरे भुईसपाट झाली जे वाहून गेले त्याचा शोध. निराधारांना नवगणचे कॉलेज हे केंद्र केले. सर्व सेवकांना मदतीचे आव्हान केले. अन्न, कपड़े, जेवन, पुरवु लागल्या. सर्वस्व हरवलेल्या या माणसांना जगण्याचे नवीन बळ ते देऊ लागल्या. सरकारदरबारात जावुन त्यांना अथक मदत व पुर्नवसन यासाठी प्रयत्नशील राहिल्या, स्वत:च्या घराला तडे गेले असताना तिकडे लक्ष न देता काकू सामान्यांचे संसार पुन्हा उभारू लागल्या.
खासदारकीची पुन्हा निवडणुक आली. काकु पुन्हा उभ्या राहिल्या. यावेळी दिल्लीपासून वारेच उलटे वहात होते. त्यात बीड ही अपवाद नव्हते. आपले काम हीच पोच पावती हा विश्वास ठेऊन कार्यकर्ते प्रचारात उतरले. परंतु यावेळी दिशाभुल सुरू झाली. मतमोजणी सुरु झाली. अगदी अल्पमतात हार खावी लागली. जसा विजय स्विकारला तसा हा पराजय ही. स्वतः आत्मपरिक्षण केले पुन्हा उभ्या राहिल्या. जयदत्त अण्णांना चौसाळा मतदार संघात विधान सभेला उभे केले. कार्यकर्ते कामाला लागले आणि यश खेचून उचांवले.
काकु संपली ही जाणीव झालेली मंडळी पुन्हा सावध झाली. पण काकु त्या माणसात गेल्या त्यांच्या नडी अडी अडचनी सोडवू लागल्या. त्या माणसांना प्रश्न पडु लागला. या बाईला मत दिले नाही. हा राग आपला यावा उलट ही बाई आपली विचारपूस करते. कामे करते. ही कसली समाजसेवा. सत्ता मिळताच मतदाराला विसरावे हा आपल्या लोकशाहीचा अलिखीत मळलेला रस्ता. पण समाजसेवा हा वसा घेऊन उभ्या राहिलेल्या काकू त्यांना उलट दिलासा देत होत्या. मतदारांना चूक समजली पण विलाज नव्हता.
दोन वर्ष होण्यापूर्वीच पुन्हा निवडणुक दारात आली. सौ. काकुंनाच काँग्रेस पक्षाने तिकीट दिले. मा. शरदचंद्र पवार यांना काकुंच्या कार्यपद्धतीवर विश्वास होता. होता. त्यांनी कै. राजीव गांधी यांनी बीड गाठले. काकूच्या निवडीस पोशख वातावरण निर्माण केले. या सर्वाचे फळ म्हणजे तिसर्यावेळी पुन्हा सौ. काकु खासदार म्हणुन निवडल्या गेल्या. हा विजय लोकशाहीचा, कार्यपद्धतीचा, सर्वसामान्यांच्या विकासाचा.
80 लाख बांधव आपल्या समाजाचे महाराष्ट्रात-भारतात 10-15 कोटी, या बांधवांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेली अखिल भारतीय तैलिक सभा, या तैलिक सभेच्या काकु एक जबाबदार घटक. महाराष्ट्र पातळीवर अध्यक्षा. देशात मंडल आयोग काही रोखत होते. मंडल अयोग तेली समाजाच्या विकासाचा बिंदू, जयदत्त अण्णा व सौ. काकुंनी महाराष्ट्रातील बांधवांचे एक अधिवेशन बोलविलेल्या अधिवेशनात त्यावेळचे मुख्यमंत्री मा. शरदचंद्र पवार यांनी समाज विकासाला शासन पूरक राहिल याची ग्वाही दिली.
काकू जेथे जातील तेथे या मंडल अयोगाचे समाजाचा विकास होईल हे पटवून देऊ लागल्या. लोक शिक्षण, व लोक जागृती करु लागल्या. सर्व सत्ता स्थाने जावुनही काकु खासदार होतात ही बाब कर्ते मंडळींना जानवली काकूचे थोरले चिरजीव श्री. जयदत्त अण्णा यांना महाराष्ट्र मंत्री मंडळात स्थान मिळाले.
बीडकरांनी आजपर्यंत अनेक सत्कार कार्यक्रम पाहिले. पण श्री. जयदत्त अण्णा यांचा सत्कार आगळा होता. बीडला त्यादिवशी माणसांचे पेव फुटले होते. चारही बाजुने माणसे गोळा झाली होती. जंगी सत्काराला. हा अभूतपूर्व सोहळा पहाण्यास,
सौ. काकूच्या जीवन प्रवाहात आपण सहभागी झालो की, ज्ञात होते. विजापूर या शहरात जन्म घेऊन श्री. सोनाजीराव क्षीरसागर यांच्याबरोबर अडचनीवर मात करुन संसार करणारी ही गृहिणी महिला मंडळ चालवीत सरपंचपद मिळवीले सभापती होते, आमदार होते. अध्यक्ष होते. तीनवेळा खासदार होते. मुलगा मंत्री होतो. अल्पसंख्याक, एक स्त्री ही सहज शक्य गोष्ट नाही. वेचक म्होरके विरोधात जवळ फक्त सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्या पाठबळांवर काकुंनी शुन्याचे एक विश्व निर्माण केले. हे करीत असताना त्या सर्व सामान्यांच्या झाल्या पोटच्या मुलांना, मुलींना त्या माया प्रेम देऊ शकल्या नाहीत. त्या मुलींच्या वेण्या घालू शकल्या नाहीत. सासरी गेलेल्या मुलिची बाळंतपणे करु शकल्या नाहीत. करु शकल्या फक्त समाज सेवा. करु शकल्या फक्त शिक्षण संस्थेद्वारे ज्ञानदान.