पुस्तकी ज्ञानाच्या पदव्या देणारी अनेक विद्यापीठ आहेत. या पदव्या मुळे मान सन्मान मिळतो. नोकरी ही मिळते. ही वास्तवता आसते. या पदव्या पेक्षा ही माणूस वाचण्याची माणुस समजुन घेण्याची माणुसकी जपण्याची रोजची भाकर मिळवण्याची घराला घरपण देणारी जी पदवी आसते. ती पुस्तकांच्या अभ्यासातून मिळेलच असे नाही. इथे शिक्षक आपणच आसतो. इथे प्रश्नकर्ते व उत्तरकर्ते आपणच आसतो. इथे मिळालेल्या पदवीतून रोजची भाकर मिळते. ही कष्टाची भाकर शांत झोपू देते. ही कष्टाची भाकर जीवन घडवू शकते. याचा जीवंत पणा परवा पुण्याच्या डेक्कन जीमखान्यावरील श्री. प्रविण गोपाळ येवले यांच्याकडे गेल्या नंतर आला.
राजगुरूनगर हे त्यांचे जन्मगाव या गावात रांगता रांगता ते चालु लागले. अक्षर गिरवू लागताच त्यांना त्यांच्या आजीने पुण्यात नेहले. आजी शेजवळांची पुण्याच्या भाजी मंडईतील नेहरू चौकात तीचे घर घराजवळाच्या भाजी मंडईत भाजीवे दुकान. ते अज्जीकडे राहु लागले. मंडई जवळच्या महानगरपालीकेच्या शाळेत जाऊ लागले. शाळा सुटताच, शाळा भरण्यापुर्वी व प्रत्येक सुट्टीच्या दिवशी आजी सोबत भाजी विकण्यास जाई. या ठिकाणी पुस्तकी शिक्षणा पेक्षा समोरच्या गिर्हाईकाला कसा माल विकावा गोडबोलून पैसे कसे घ्यावेत. त्याला ओळखुन दर कसा ठरवावा न चुकता न सिरता हिशोब कसा करावा आणि आपल्या गल्यात पैसे कसे यावेत हे मंडईची पदवी मिळवू लागले. शिक्षण कसे तरी १० वी पर्यंत झाले. आज्जीला मदत करण्यात वेळ जाऊ लागला होता. याही पेक्षा वेगळे करावे ठरवीले योग्य वय होताच मित्रा करवी रिक्षा घेतली. या रिक्षा व्यवसायाला नावे ठेवणारे होते. परंतु प्रामाणीक, निष्ठेने, व्यसनापासून दूर राहून आपन राबलो तर पैसे कमवू शकतो. हे धडे अज्जी सोबत मंडईत घेतलेले. त्या मुळे ते रक्षा चालवू लागले. यातूनच डेक्कन जवळ भाजी विकावयाचे ठरविले. या साठी पत्नि यांनी मनावर घेतले व दोघेही सकाळ संध्याकाळ भाजी विकू लागले. यातून कष्टाचे पैसे मिळू लागले. आपण शिक्षण घेतले नाही हे ठिक होते. पण मुले शिकली पाहिजेत शिक्षण घेतले नाही हे ठिक होते. पण मुले शिकली पाहिजेत या शिक्षणासाठी पैसा लागतो म्हणून हे दोघे राबू लागले. या राबवण्यातून मुले शिक्षत होऊ लागली. ती आपल्या पायावर उभी आहेत.
पुण्याची महात्मा फुले भाजी मंडई विद्यापीठ हे येवले यांच्या संस्काराचे ठिकाण आहे. ज्याला स्वत: सुधारता येत नाही. याला स्वत: नीट चालता येत नाही त्याला दुसर्याला आधार देता येत नाही तो इतरा साठी काय करणार. ही यवले यांची जगण्याची रित. या रस्त्यावर खंबीर उभे राहिले. कोथरूड येथिल श्री. रत्नाकर दळवी दुकानावर भेटले आपला समाज व आपण याची तोंड ओळख त्यांनी दिली. अग्रहाचे निमंत्रण दिले. कोथरूड येथे समाज संस्था व समाजाचा फंड आहे. यात सामील व्हा म्हणाले. यवले श्री रत्नाकर दळवी यांच्या अग्रहाखातर कोथरूड येथे गेले. समाजकार्य समजून घेतले. आपल्या व्यापाने आपन सातत्याने सहभाग घेऊ शकणार नाही पण आपण सहकार्य करू शेतो हे ठरविले त्यामुळे त्या दिवसा पासून समाजाला आर्थिक अधार देऊ लागले. समाजाचे वधु वर मेळावे भरतात. या आलेल्या हजारो बांधवांना शुद्ध पाणी मिळत नव्हते. हे शुद्ध पाणी मोफत देण्याची जबाबदारी श्री. प्रवीण यवले यांनी स्विकारली कार्याकर्त्यांच्या मतभेदा पेक्षा मोफत पाणी देणे महत्वाचे ते मानतात कोथरूड व पुणे येथे झालेल्या अनेक मेळाव्यास त्यानी हजारो रूपयांचे लाखो लिटर पाणी आज पर्यंत पुरवले आहे. आणि भविष्यात पुरवणार ही आहेत श्री संताजी उत्सव सुदूंबरे व संताजी पालखी सोहळ्यास मदत करण्याची त्यांची धडपड आहे. मंडईच्या विद्यापीठात माणूस ओळखणे माणूसकी संभाळणे ही शिक्षित पदवी त्यांनी मिळवली आहे त्यामुळे सुखी माणसाचा सदरा ते वापरतात व सुखाने झोपतात ही त्यांना शुभेच्छा.