ह. भ. प. जगन्नाथ दहितुले बुवा दिंडी क्र. १

santaji maharaj jagnade palkhi adhyaksha jagannath Dahitule

    टाकळी हे गाव भीमा नदी काठचे म्हणुनतीला टाकळी भिमा आज ही म्हणतात गावात तेल घाणा चालेना घरातले प्रश्न बिकट झाले. आशा वेळी आई तान्हुबाई यांना मुलगा मोठा करणे हाच प्रश्न पडला. त्या नातेवाईकांच्या आश्रयाने वालचंद नगर (जंक्शन) करीत करीत अकलूज येथे गेल्या. आपल्या जगन्नाथाला वाढवू लागला. इथेच जगन्नाथ यांनी दुकानात काम करून हातभार लावला. या भाकरीच्या प्रश्नात ते गुंतू लागले. भक्तीतून शक्ती मिळेल ही त्यांची धारणा. त्यांना परीस्थितीनेे बरेच शिकवले परस्थितीने ते माणूस वाचू लागले. काही काळ मंबई येथे दुकानात काम ही केले. ते वास्तव्यास पुण्यात आले. मिळेल तेथे राहून काम करू लागले. मुंबईत योगी भेटले त्यांनी दिक्षा दिली होती. पुण्यात रिक्षा चालवू लागले. एका मित्राला घेऊन धंदा सुरू केला. भरभराट येताच भागीदार पळाला पुन्हा वण वण सुरू झाली कोंडवा येथ माणिकचंद दुगड भेटले. कोंडवा ते भवानी पेठ पायी जावून दिवानजी म्हणुन राबू लागले. या राबण्यातून जीवनाला दिशा मिळाली व्यवहारातुन चार पैसे मिळवावेत घराला दोन ठेऊन दान धर्म करावा. गुरूच्या सांगण्याप्रमाणे ते वागत होते. घरात पत्नि विमल  घर चालविण्यासाठी मोल मजुरी सुद्धा करित होत्या ह. भ.प. जगन्नाथ बुवा बराच काळ हिमालयात ज्ञान संपादन करावयास जावे लागे. त्यावेळी घर त्याच चालवत होत्या यातूनच जमीन देवघेव करू लागले. हा व्यवहार अळवावरचे पाणी. कधी पैसे मिळेल याचा भरवासा नव्हता पण जिद्द चिकाटी व मेहनत या बळावर ते उभे राहिले.

    पुण्यातून वाघोली येथे संसार उभा केला. आपला व्यवसाय उभा केला. एक दिवस पुण्यातून दादा भगत त्यांना शोधत आले. त्यांनी संताजी पालखी सोहळ्या विषयी माहिती दिली. आपण धार्मिक विचाराने वावरता. यासाठी ज्ञान घेण्यास हिमालयात ही जात. मग आता या पालखी सोहळ्यात सामील व्हा सुदुंबरे ते पंढरपूर पायी जावू या. दहितुले बुवा पालखी बरोबर पायी निघाले. पायी जाताना बरिच जाणीव झाली. आपण ही यात सहभाग असावा या साठी. स्वतंत्र दिंडी सुरू करावयाची ठरवीले ही सुरू करताना किमान शंभर वारकरी गोळा करावयाचे या शंभर जनांचा सर्व खर्च किमान ५ वर्ष आपण स्वत: करावयाचा हे निश्‍चीत करून पंढरपूर मुक्कामी तसे जाहीर केले. आणी दुसर्‍या वर्षी ह.भ.प. जगन्नाथ बुवा दहितुले दिंडी क्रमांक १ सुरू केली. बोलल्या प्रमाणे पाच वर्ष किमान १०० वारकर्‍यांचा खर्च स्वत: केला. यात फक्त तेली न घेता इतर समाजातील वारकरी घेतले. त्यांना हा अगळा उपक्रम आवडला यातील बरेच जन आज याच दिंडीत जात आहेत. बुवानी हा उपक्रम बरेच राबवला. त्यांच्या निधना पर्यंत ते स्वत: दिंडीत सर्वाबरोबर आसत. त्यांच्या नंतर त्यांची मुले चंद्रकांत व दिगांबर यांनी ही लक्ष दिले  परंतू या दिंडी क्रमांक एकची जबाबदारी बुवांच्या पत्नी श्रीमती विमल या चालवित आहेत. त्या ही वयोवृद्ध आहेत परंतू त्या सर्व समवेत राहुन दिंडी घेऊन जातात. या कामासाठी दहितुले बुवांचे सुरूवातीचे सोबती, वारकरी व मित्र गण हे व्यवस्थापक म्हणुन काम पहातात या वेळी सर्वजन तन मन धन खर्च कारतात विशेष म्हणजे या दिंडी साठी फक्त तेली बांधव असतात असे नव्हे तर विठ्ठलावरील प्रेम, बुवांच्या विषयी निष्ठा ठेऊन येणारे इतर जाती समुहातील ही बांधव असतात.

    ह.भ.प. दहितुले बुवा मानव म्हणुन जगले. चार रूपये कमवुन देान रूपये इतरा साठी देत होते. अनेक गोर गरिब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत त्यांनी केली. अनेक मंदिरांना त्यांनी साह्य केले. मंदिरात मुर्ती दिल्या. गरिबांची लग्ने लावून दिली अडचनीत आलेल्या संसाराला हातभार लावला पंढरपूर येथे  पालखी सोहळ्यास १४ गुंठे जागा घेण्या साठी उसनवार पैसेे दिले. पंढरपुर येथे संताजी मंदिर ही उभे केले. संत संताजी जगनाडे तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे ते काही वर्ष अध्यक्ष ही होते. गाणगापूर येथे जावून त्यांनी आश्रमाची उभारणी केली. आयुष्याच्या शेवटी शेवटी त्यांनी आपला वेळ येथे खर्च केला. त्यांच्या त्यागातून, विचारातून अनेकांना उभारी आली आहे आसे उभे राहिलेले बांधव त्यांच्या स्मृती जपून आहेत.

दिनांक 12-07-2015 02:12:15
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in