जळगाव संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित तेली समाज वधुवर मेळाव्यात १९०५ युवक-युवतींनी परिच्य करून दिला.दरम्यान,मेळाव्यात पाच विवाह जुळले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वधुवर सुचीचे प्रकाशन करण्यात आले. पुष्पमती गुळवे हायस्कूल व्या प्रांगणात आयोजित मेळाव्याचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणाव चे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी हे होते.
प्रमुख पाहणे नगरसेवक राजेंद्र चौधरी, युवराज करंकाळ, जिवन चौधरी, माजी महापौर विष्ण भंगाळे, नामदेव चौधरी, विजय चौधरी, नगरसेविका ज्योती तायडे मंगला चौधरी, शोभा चौधरी, निर्मला चौधरी, सुनंदा चौधरी, भगवान चौधरी, रामचंद्र चौधरी, संतोष चौधरी, भगवान चौधरी, संजय चौधरी, के. डी. चौधरी डॉ. मनिलाल चौधरी,नंदू चौधरी, सूरज चौधरी, सुरज चौधरी, अभिमन्यू चौधरी, जे, बी, चौधरी आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.तसेच वधूवर सूर्तीचे प्रकाशन करण्यात आले.त्यानंतर १९०५ युवक-युवतींनी परिचय करून दिला.
आई-वडिलांचा सांभाळ करा - आमदार सुरेश भोळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आगामी काळात परिचय मेळाव्या ऐवजी विवाह मेळावा घेण्याचा मानस अध्यक्ष चौधरी यांनी व्यक्त केला. निर्व्यसनी जोडीदाराची अपेक्षा युवतींनी परिचय करून देताना मुलगा निर्व्यसनी असावा ही अट प्रामुख्याने ठेवली तर युवकांमधून मुलीने आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मेळाव्याला महाराष्ट्रासह मध्यप्रदेश गुजरात येथील समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचलन रतन थोरात यांनी तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत मरकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी संताजी जगनाडे महाराज बहुद्देशीय पदाधिकारी अनिल चौधरी प्रशांत सुरळकर, सुभाष चौधरी, प्रकाश चौधरी, संदीप चौधरी देवीदास चौधरी, उमेश चौधरी, भरत चौधरी, विलास चौधरी, प्रकाश चौधरी महेंद्र चौधरी, अशोक चौधरी, आनंद चौधरी, डॉ दिपक चौधरी, अजय चौधरी मुकेश चौधरी, आदींनी परिश्रम घेतले.