( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
आता पालखीला भक्कम पाया लाभला होता. चालणार्या वारकर्यांच्या पायाखाली जी वाळू होती ती संपली. आता ती सरकण्याचा प्रश्नच नव्हता सर्वानी जुने वयोवृद्ध व्यवहारे मामांना जवळ घेतले. पालखीचा मोठा ध्वज त्यांच्याजवळ दिला. त्यांना झेंडेकर्याचा मान दिला सर्व बांधवांनी दर्शन घेतल्यानंतर पुणे सोडले तरी अनेक बांधव पालखीबरोबर वडकी नाल्यापर्यंत सोबतीला आले.
वळणावळणानी दिवे घाट चढून पालखीला सासवड मुक्कामाचा वेध लागला. वडकी नाल्यानंतर ते परत गेले आणि जे उरले ते चोपन्न सुरूवातीच्या पाचाचे पन्नास होऊन गेले. पन्नासचे चोपन्न झाले. तळेगावचे बाळासोा पिंगळे हे तरूण तडफदार कार्यकर्ते मिळाले. जोडीला सुधाकरराव टेकवडे मिळाले. पडेल ते काम करण्याची तयारी. ते हलके आहे. कष्टाचे आहे म्हणून मी करणार नाही असा शब्दच नसे. तर हे काम माझे आहे. मला केलेच पाहिजे हा समज असे. यामुळे सोहळ्याला एका घरकुलाचे रूप आले. सासवडच्या शिवेवर जेव्हा पालखी गेली, तेव्हा सासवडच्या बांधवांनी शिवेवर भरगच्च स्वागत केले. इथे दोन दिवस मुक्काम होता. दोन दिवसांचे जेवण या बांधवांनी आनंदाने दिलेच उलट दुसर्या दिवसाचा एक वेळचा पन्नास जणांचा शिधा दिला. याच मुक्कामावर जसे थेंबा - थेंबाने तळे साचते तसे इथे वारकर्यांचे दोन थेंब मिळाले. ह. भ. प. लक्ष्मण नारायण कटके हे शिवणे (पुणे) तर शिद्धबा शेडगे, पेण सिद्धबा शेडगे यांना सर्वांनी चोपदारकीचा मान दिला होता. हरीनामाचा गजर करीत सर्वजन दुपारी यमाईच्या देवळाजवळ आले.