एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 2 )
अक्षरे गिरवावित आशा वेळी प्लेग व घराला अडचणींचा डोंगर मिळालेला. प्लेग जाताच ते शाळेत जावु लागले. उर्दु व मराठी शाळा होती. तेथे जमेना मग काही जण घरगुती शाळा चालवत होते तिकडे गेले. शाळा दोन तीन झाल्या पण शिक्षण फक्त इयत्ता तिसरीतच थांबले. या शाळे पेक्षा पोटाचा प्रश्न मोठा होता. या पुस्तकी शिक्षाणा पेक्षा बाहेरिल जगाची शाळा पोटाचा प्रश्न सोडवु शकते. त्यांनी व्यवसायात लक्ष दिले. पण लगेच परत प्लेगने आपली पाऊले पुण्यात भक्कम रोवली. सर्व कुटुंब राहुरीला गेले पण राहुरीत कोणच थांबु देईनात म्हणुन नगरला आले. नगर मध्ये माळी वाड्यात मुक्काम ठेाकला.
पुण्याच्या गणेश पेठेत शिवराम दादाची तालीम आहे तेथे आज ही पैलवान घडविले जातात. या तालमीत तेली समाज पुर्वी जादा होता. या भागात आज ही आहे. याचे कारभारी पण ही तेली समाजाकडे होते. जगन्नाथ अप्पासाहेब भगत हे या तालमीचे कारभारी होते. या वेळी रावसाहेब बरोबर दशरथ एकनाथ बागुल हे मावस बंधु व ते जात असत. चुडामन वस्ताद तालमीत ही दोघे जात असत. सकाळ संध्याकाळी तालीम करीत. खुराक कमी पडू लागला. जवळची मंडळी देऊ पहात होते आईने विरोध केला. दुसर्याच्या जीवावर पैलवानकी करणार नाही. घरची चटणी भाकरीवर पैलवान करेल. मातेने तेच केले. रावसाहेब यांनी कसलेल्या पैलवाना बरोबर लढती दिल्या होत्या. त्यांना ही चितपट करीत होते. घरच्या चटणी भाकरीवर तयार झालेली पैलवानकी ही अनेकांना विशेष वाटत होती.