एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 3)
1905 साली दुसर्या प्लेग मध्ये रावसाहेबांचे मोठे बंधू भाऊसाहेब वारले. त्याआधीच्या प्लेग मध्ये रामचंद्र वारले . वाताहत झाली. सावकाराने घरे ताब्यात घेतली. 1906 साली रावसाहेब शंकर रामचंद्र नगरहून पुण्याला आले. एका कार्नेलिया नावाचा युरोपियन हॉटेलात त्याने 20 रुपये पगारावर नौकरी केली. नौकरी करून भांडवल जमवले आणि ते जुने फर्निचर विकत घेऊ लागले. नौकरी वरून आल्यावर फर्निचर दुरुस्त करीत आणि जुन्या बाजारात रविवारी व बुधवारी विकून येत.. यात चांगले पैसे मिळाले. पुणे लष्कर मध्ये जागा भाड्याने घेऊन फर्नीचरचे दुकान सुरू केले. हे दुकान घालताना आईने ( काशीबाई) व अण्णाने ( किसनशेठ) विरोध केला . पण रावसाहेबांनी कोणाचेही ऐकले नाही. दुकान चांगले चालु लागले. घरातील विरोध संपला, हॉटेलची नोकरी सोडली. रावसाहेबांची व्यवसायीक दिशा या मुळे पुणे लष्कर भागात हे दुकान चांगलेच रूजले होते. लष्करी अधिकार्यांशी संबंध वाढले. तिसरी शिकलेले हे जुजबी इंग्रजी ही बोलु लागले. लष्करी अधीकारी आपली पाऊले इकडे वळवु लागले. गोड भाषा, उत्तम कारागीरा कडून तयार केलेले फर्नीचर किफायतशीर दर वेळेचे बंधन या साठी सार्वबरोबर डोळ्यात तेल घालुन कष्ट या मुळे सरकारी व खाजगी क्षेत्रात नाव कमवीले यामुळे हे नाव फक्त पुण्यातच स्थिर न रहाता मराठी मुलखातुन देशभर गेले. परदेशात ही या उत्तम रेखीव फर्नीचरचे नाव पोहचले. त्याचे काही पत्र ही आज उपलब्ध आहेत. या कामामुळे इंग्रज अधीकारी पाठीमागे लागले शासकीय कंत्राट घ्या. एम.इ.एस. चे गॅरिसन इंजिनीयर होते. आग्रहाखार टेंडर भरले येथे मिळवीताना कस लागला. एकदा अनुभव येताच व दर्जा देताच. शासकीय कंत्राटे मिळु लागली नगर येथे फर्नीचर कारखाना सुरू करावा लागला स्वातंत्र्य पुर्वी काळात त्यांच्या कडे 200 कामगार नगरला होते. एक वेळ कारखान्यात कुशल कारागीरात धार्मीक तेढ निर्मीण झाली. रावसाहेबांना समजले ते नगरला गेले गेटवर दोन्ही समाज एकमेका विरोधात उभे. सोबतीला स्थानीक बोलवले होते. पण रावसाहेबांनी त्यांना आत बोलवुन असा एकोपा केला की वाद झाले होते हेच सर्व विसरले. या ही पेक्षा एक प्रसंग मला भावला. त्या काळात कलेक्टर ही एक मोठी पॉवर होती. कारखान्या जवळ कलेक्टर रहात होते. आवाजाने वैतागत त्यांनी कारखान्याची जागा बदलण्याचा आदेश दिला. पण यांनी त्याच कलेक्टरला आपला बंगलाच बदलवण्यास लावला. लाकडी फर्नीचर हे ‘शंकर रामचंद्र’ या फर्म चेच सर्व शासकीय ऑफीस मध्ये दिसते. आज ही अनेक ठिकाणी एक एैतिहासीक ठेवा म्हणुन जपलेले फर्नीचर हे याच फर्म मध्ये तयार झालेले आहे. काळाची पावले ओळखणे हा यांचा विचार धागा. त्यांनी स्टील फर्नीचर ही बनवणे सुरू केले. दुग्धालया साठी लागणारी कडब्याची कुटी ही ते बनवु लागले. दारू गोळा व हत्यारे खरेदी व विक्रीचा व्यवसाय ते करू लागले. आगदी डनलॉप उशांची मेन एजन्सी ही मिळाली होती. अशा अनेक व्यवसायात पण शेती घेऊन ही त्या क्षेत्रात सिंचन नसतानाही अडचणीवर मात करून शेती फुलवली हे विशेष.