एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 14)
रावसाहेबांचा पहिला मुलगा लहानपणीच विषबाधे नि वारला होता. त्यांचा पत्नी सौ सोनुबाई ह्यांनी घरातील पारंपरिक महालक्ष्मींना नवस केला व 1934 साली रावसाहेबांच्या मुलगा म्हणजेच श्याम उर्फ दादासाहेब पन्हाळे चा जन्म झाला. ते अतिशय हुशार होते. त्याचे अक्षर एवढे सुंदर होते कि शाळेचे मास्टर पण त्याची स्तुती करायचे, रावसाहेबांचा उदारपण, समाजसेवा, पसरलेल्या व्यवसाय व परिवाराच्या व्यापामुळे, दादासाहेब फर्गुसन कॉलेज चे शिक्षण सोडून व्यवसायात लक्ष द्यायला सुरुवात केली. जिद्द, गोङ स्वभाव. दुसर्याला आपलेसे करण्या मुळे त्यांनी लिलावाच्या धंद्यात चांगला जम बसवला. रावसाहेबांचेच व्यावसायिक गूण त्यांच्यात होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र सरकार ने पहिल्यांदा सरकारी भंगार चा माल ‘शंकर रामचंद्र’ ह्या फर्म ला लिलावाने विकायचे ठरवले. तद्पश्चात 1978 साली महाराष्ट्र परीवहन महामंडळ चे काम व एम.एस.इ.बी चे काम हि मिळाले. त्यांची ख्याती एवढी होती कि 1980 मध्ये भारत सरकारने त्यांना दिल्लीतील काही प्लॉट्स विकण्यास दिले. सदरचे प्लॉट्स काही केल्यास विकले जात नव्हते. परंतु श्याम उर्फ दादासाहेबांनी सादर चे प्लॉट विकून त्या काळात सरकारला चांगली किंमत आणून दिली. भारत सरकार नि त्यांच्या ह्या कामगिरी बद्दल 1981 साली ‘गोल्ड मेडल’ दिले होते. सदर चे समारोह ताज मुंबई येथे पार पडला. त्यांचा काळात लिलावाचा धंदा संपूर्ण देशभरात पसरला होता.त्यांनी ‘शंकर रामचंद्र’ चे नाव महाराष्ट्र व्यतिरिक्त गुजरात, तामिळनाडु , मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश गोवा, दमण व दिव मध्ये पसरवले होते. त्यांचे भारताचे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ह्यांच्याशी चांगले संबंध होते. पुण्यातील, जनरल मोहिते, व्ही .एन. गाडगीळ, बारामतीतील र. क. खाडिलकर ह्यांच्याशी घरोबा होता. तसेच ओरिसातील बिजू पटनाईक साहेबांशी, व अनेक नेतेमंडीळीशी, फ्रान्स जर्मनी चे अम्बॅसॅडर शी संबंध होते. कामाच्या निमित्ताने एकदा दिल्लीमध्ये त्यांची ओळख स्वर्गीय धीरूभाई अंबानीनशी झाली व मुंबईतील कोलाबाच्या घरी त्यांचे येणे जाणे होत. काळानी जणू परीक्षा घ्यावी 1984 साली भारत सरकार चे 200 कोटी चे ऑल इंडिया इर्रीगेशन चे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. सदर कॉन्ट्रॅक्ट कामी त्यांनी जवळ -जवळ संपूर्ण भारताचा दौरा केला. शेवटच्या टप्याला अहमदाबाद मध्ये पहुचले. नियती ने वेगळाच खेळ रचला आणि तिथेच त्यांचा वयाच्या 49 वर्षी मृत्यू झाला.
येथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे कि दादासाहेबांचा 1960 ला अपघात झाला होता व त्यात त्यांचा पायाला इजा झाली होती. परंतु त्यांनी शारीरिक यातना सहन करून धंद्यात जम बसवून एक प्रख्यात उद्योगपती चे बहुमान मिळविले.