तेली गल्ली, एप्रिल 2010
यवतमाळ - विदर्भ तेली समाज महासंघा च्या अनुषंगाने दि. २०/ ३/२००७ दारव्हा येथे आप्पास्वामी मंदीरामध्ये दु. २ वा. तेली समाजाचे चेतना मेळाव्याचे आयोजन केले असता त्याच अनुषंगाने तेली समाजातील युवकांमध्ये नवचैतन्य सामाजिक बांधीलकी, राजकीय, आथर्भक, शैक्षणिक या मुल्याची समाजात प्रत्येक युवकाला जाणीव जागृती व्हावी या करीता विदर्भ तेली महासंघाने तसेच सामाजिक आर्थीक व दुर्बल संकट आपदग्रस्त कुटुंबाना समाजातील युवकांची मदत व्हावी, संकटकाळी समाज बांधव दुसऱ्या समाज बांधवाच्या मदतीला धावून जाऊन मदतीचा हात देण्या करीता दारव्हा नगरीचे नगराध्यक्ष मा. हरिभाऊ गुल्हाणे, डॉ. मंगेशभाऊ रूईकर भाजपा सरचिटणीस, सौ. संध्याताई सव्वालाखे महिला काँग्रेस कमिटी, यवतमाळ, विलास काळे, महासंघाचे कार्याध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर रायमल, जिल्हा संघटक किशोर सुरकर, संताजी अॅम्बुलन्सचे सचिव विशाल ठोंबरे, वासुदेवराय बलखंडे, आशिष साखरकर, गजेंद्र ढवळे इ. च्या शेकडापे उपस्थितीत संताजी ब्रिगेडची स्थापना करून विजय राम रूमाले यांना युवा मंडह संताजी ब्रिगेडचे अध्यक्षपद देण्यात आले असता गजानन मोतीराम गुल्हाणे उपाध्यक्ष, सोज्वल भा. गुल्हाणे, सचिव राहुल बलखंडे, सहसचिव गिरीष जिरापुरे, कोषाध्यक्ष, संदीप गुल्हाणे, सचिव, अमित गुल्हाणे, प्रणित शिरे, रवि गुल्हाणे, निलेश बलखंडे, भारत ढोले सदस्य इत्यादी संताजी ब्रिगेडची दारव्हा शाखा अशी प्रसिद्धी हेमंत गुल्हाणे यांनी कळविले आहे.