सन 1200 च्या दरम्यान या देशात विषमता नांदत होती ब्राह्मण्य व क्षत्रीय जाती या येथील बाकीच्या समुहाला पोळुन काढत होत्या आशा वेळी महानुभवानी मानवतेचा झेंंडा हाता मध्ये घेतला. आणि यादवांनी अक्षरशा त्यांचा ब्राह्मणी सरदारांच्या इच्छे खातर त्यांचा छळ केला. तेंव्हा ते म्हणाले या जुलूम शाहीचा पूरता तळपाट होवो आणी अक्षरशा भविष्यात तेच घडले. समता, मानवता पाया खाली तुडवल्या नंतर यादवांची, बोपदेव, हेमांड यांची वाताहत झाली. परंतु चक्रधर स्वामी आपल्या समता व मानवता या विचाराने जन मानसात जिवंत राहिले. याच समतेच्या विचाराचे पाईक असलेले कै. भीकूशेठ खळदकर भले बांधव होऊन गेले. चक्रधर स्वामींच्या विचाराचा मागोवा त्यांचे जीवीत कर्म. त्यांना श्री. सुर्यकांत श्री. दामोदर व धनंजय ही तिन मुुले व सौ. सुनंदा पोटराव पिंगळे ही कन्या.
श्री. सुर्यकांत यांनी शिक्षणा नंतर घराची जबाबदारी स्विकारली शिक्षण तरी अकरावी पास झाले. पण दुसरे बंधु श्री. दामोदर शिक्षणात रस असलेले. आज त्यांचे सर्व कुटूंबच वकिली व्यवसायात असलेले शिक्षणासाठी सुर्यकांत वडीलांच्या खांद्याला खांदा लावुन किराणा दुकान सुरू ठेवलेले. कडूस ता. खेड या पसिरात मुबलक पाऊस व मुबलक शेंग उत्पादन होत होते. पुर्वी घरात तेलाचा बैल घाणा होताच यंत्रामुळे तो आडगळीत गेला. तो चालु करणे अवघड झाले. आशा वेळी त्यांनी खांद्यावर पोते घेतले कडुसच्या वाड्या वस्त्यावर धने, घेवडे आसा भुसार माल खरेदी करावा. हा माल पनवेल येथे घेऊन जायचे. येताना रिकाम्या हाती न येता मिठ व इतर माल घेऊन येत शेंगा खरीदी करु लागले. मार्केट मध्ये शेंगा विकु लागले. या ही पेक्षा आपण गाळप केले तर या पेक्षा चार पैसे रहातील हा विचार आला. यातुनच कडूस येथे सुदर्शन ऑईल मिल सुर केली. शेंगदाणा तयार करणे तो मार्केट मध्ये पाठविणे शेंगा खरेदी करुन तेच तेल उत्पादन करणे याला गती आली. काही काळा नंतर शेंग पिक कमी येऊ लागले. यंत्राची चाके फिरेणात मग हाही व्यवसाय बंद पडू लागला. तेंव्हा नव्या व्यवसायात उडी घेण्याचे निश्चत केले. माल वहातुक करण्यासाठी वहातुक व्यवसाय निवडावा या ट्रान्सपोर्ट मध्ये ते राबु लागले. यातून अनेक प्रसंग समोर आले. संपुर्ण कुटूंबच ज्वालामुखीच्या तोंडावर उभे राहिले परंतु वडींलांची शिकवण मार्गदर्शन या बळावर त्यांनी दिला शब्द पाळला घेतला पैसा परत दिला.
कै. भीकुशेठ खळदकर एक सुजान व्यक्तीमत्व होते. श्रीकृष्ण या दैवत्वावर अढळ निष्ठा होती चक्रधरांच्या वचनांशी ते बांधील होते. यातुनच त्यांनी संसाराकडे पाठ करन चक्रधर मंदिराचा जिर्णेद्धार केला. या साठी स्थानीक बांधवांचा सहभाग व त्याग घेऊन ते गावो गावी फिरावयास गेले. आशा श्रद्धा स्थानाचे उद्घाटन त्यांनी 1987 मध्ये केले. उद्घाटना नंतर 1990 ला ते वारले पण आदर्शाचा ठेवा ठेऊन गेले. श्री. सुर्यकांत यांनी तो जपला, जोपासला व वाढविला सुद्धा श्री. सर्यकांत शेठ हे तिळवण तेली समाज कडुसचे अध्यक्ष सामाजीक प्रश्ना साठी सावध गोर गरिब बांधवांच्या घरात शिक्षणाचा दिवा प्रज्वलीत झाला पाहिजे. प्रज्वलीत दिवा विझला नाही पाहिजे ही त्यांची विचाराची बैठक गुरूच्या उपदेश ते पहिला मानतात. चोरी, दारु, मांसाहार या पासुन दुर राहुन जीवन जगतात. चक्रधर स्वामी यांना परमेश्वर मानुन वाटचाल करतात. या मुळे जीवनाला बराच काळ सेवा व त्याग या साठी खर्च करतात यामुळे समाधान मिळते. मी अडचनीवर मातकरू शकलो आता लहान भाऊ श्री. धनंजय याला ही सावरायचे आहे हे ते नमुद करतात.
श्री. सुर्यकांत यांना श्री. चक्रधर (शाम) श्री. शशीकांत ही दोन मुले. वडीलांनी वहातूक व्यवसाय पाहिला होता. परंतु त्यात यश आले नव्हते. काळ बदलला होता. चाकणच्या कारखानदारी मुळे वहातुक ही नवी क्षितीजे निर्माण झाली होती. गरज होती फक्त अत्मविश्वास, नियोजन, विश्वासाची. ही गरज या दोघांनी प्रथम ओळखली आणि ते ओळखून चक्रधर ट्रान्सपोर्ट द्वारे उभे राहिले. सौजन्य या बळावर चाकण ते सर्व महाराष्ट्रात गाड्या जाऊ लागल्या यातुनच व्यवहार साध्य करीत आज गाड्या स्वत:च्या व रस्त्यावर धावु लागल्या धावत्या गाड्यांच्या नियोजना मुळे अर्थिक सुधारणा होऊ लागली त्यातुन पुन्हा गुंतवणुकदार झाले. यामुळे चाकण परिसरातील अनेक कारखानदारांना या बंधुंचा विश्वास वाटु लागला हा विश्वास ते नफ्या पेक्षा टिकवण्यात समाधान मानु लागले. या मुळे काही कारखानदारांनी एक आदर्श वहातुकदार म्हणुन त्यांना सन्मानित ही केले. ते करिताना सांगितले भाऊ असावेत तर आशा विचाराचे. भाऊ असावेत तर एक मताचे. भाऊ असावेत तर एक निष्ठेचे. ही शाम व शशीकांत याची आजच्या उमेदीची खरी कमाई.
श्री. चक्रधर (शाम) व श्री. शशीकांत यांनी आपल्या वडिलांचा विचारांचा आपला रस्ता बनवला. तेली समाजाच्या अनेक उपक्रमात ते सहभागी असतात. अनेक कार्यक्रमास आपल्या त्यागाची हाजेरी ही लावतात. यामुळे राजगुरु नगर तिळवण तेली समाज. कडुस तिळवण तेली समाज, तेली महासभेत ते सहभागी असतात श्री. चक्रधर व श्री शशीकांत या बधुंच्या वाटचालीस अनेकांच्या शुभेच्छा व चक्रधर स्वामींची विचार प्रणाली पाठीशी आहे.