नात्या गोत्यात व मुळशीच्या पौड मध्ये श्री. सावजी हरिभाऊ उबाळे यांना सर्वजन आप्पा म्हणुनच ओळखतात. घराला थोडीशी जमिनीवर कष्ट करून जगण्यात गेली सात पिड्या गरिबी समाधानात नांदत होती. कसे तरी वडिलांनी 11 वी पर्यंत शिक्षण दिले. 1967 साली वय नोकरी करण्या एवढे नव्हते. मग घरी म्हशी होत्या त्या वर्षभर त्यांनी संभाळल्या. विउलांना ते पटेना त्यांच्या मित्राचे पुण्यात एक गॅरेज होते. त्या गॅरेज मध्ये बिनपगारी शिक्षणासाठी ठेवले. नातेवाईकाकडे न रहाता त्या गॅरेज मध्ये राहु लागले. सकाळी तेथेच बाथरूम मध्ये ओघेळ करून डेक्कन वर जात आसे. त्याकाळी 6.45 वाजता पौड- पुणे बस पौड मधुन सुटत आसे. आई भल्या पहाटे उठुन भाकरी तयार करून फडक्यात बांधुन एसटीने पाठवुन देत आसे. तो डबा घेऊन येत आसत. सकाळी तोच डबा रात्री सकाळचे शिळे खाऊन गाडीत झोपत आसत. या अवस्थेत गॅरेज मधील कामाचा पुर्ण अनुभव घेतला. हाताला कला आली. याच कलेच्या जोरावर टाटा टेल्को, बजाज टेम्पो, बजाज ऑटो, भारत फोर्ज, सिपोरेक्स (बी.जी. शिर्के) या मध्ये मॅकॉनिक म्हणुन थोडे थोडे दिवस काम केले. आणि कामाचे खरे कौतुक मे. बी. जी. शिर्के कंपनीने सैदि अरेबिया येथे पाठविले 1978 ते 1979 पर्यंत तेथे काम केले. घरच्या अडचणीमुळे घरी यावे लागले परत बोलवले होते पण जाता आले नाही. ज्या आईने काबाड कष्ट करून वाढवले तिच पुण्याच्या रूबी हॉस्पीटलमध्ये ऑडमिट होती. खोर्याने पैसा मिळविण्यापेक्षा मी आई मोठी मानली. त्यानंतर घराची जबाबदारी माझी पत्नी सौ. सुरेखा हिने खांद्यावर घेतली. दोन वर्षात वडिल वारले. यावेळी एक भाऊ व बहिणीची जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतु भाऊ व बहिण यांना आई वडिलांची माया व कर्तव्य केले. श्री. शरद या भावाच्या विचाराने पुढे वाटचाल केली सर्वांच्या शिक्षणात लक्ष दिले. त्यामुळे निशा बि.एड. आहे. कु. पौर्णिमा बि.एस.सी. झाली. श्री. सागर हा मुलगा आप्पांच्या व्यवसायात लक्ष देऊन पहात आहे. अप्पांची नात कु. समुद्धीची घडण ते करीत आहेत. त्यामुळे एक सुखी कुटूंब म्हणुन वावरत आहेत. श्री. प्रशांत अभ्यंकर यांचे व ते श्री. सदगुरूचे उपासक आहेत. त्यामुळे प्रसन्न व सुखी कुंटूंब म्हणजे आप्पा उबाळे होत.