भर पावसाळ्यात चासकमान धरणाच्या दर्या खोर्यात पावसाचा ठाव ठिकाणा नाही. ओसंडून वाहणारे धरण आपला तळ दाखवत होते. मी त्याच काळात वाड्याला गेलो. शोध घेत खानविलकरांचे घर शोधले शोधलेले हे घर प्रगतीच्या टप्यावर गेलेले ? हे प्रगतीचे टप्पे कसे सर केले ? प्रत्येक टप्यावर संघर्ष कसा केला ? संकटांनाच आपले सगे सोयरी मानुन आपले हित साध्य कसे केले ? हा एक समाज बांधवांना आदर्श मला शोधुन साठवायचा आहे हे खानविलकरांना सांगताच ते बोलते झाले.
सांगली जिल्हातील शिराळा तालुका या तालुक्यातील पांचग्री शिरसी हे मुळ गाव. गवातच शेतीवाडी होती परंतु एकलुत एक घर गावात त्यात शेतीला पाण्याची सोय नाही म्हणुन कै. सिताराम खानविलकर हे ड्रायव्हींग शिकल्याणे पुण्याच्या संपर्कात आले. येथेच स्थिर झाले. एका भाड्याच्या घरात संसार उभा केला. पुण्यात 10 वर्ष वास्तव्य केले. ड्रायव्हिग मुळे पुण्या परिसरात वावर सुरू झाला. खेड येथे गाडी घेऊन जात. बाजारपेठेत समाजाची हुकमत. समाजाने ही त्यांना आपले मानले. या आपले पणात हे कुंटुंब 15 वर्ष खेडलाच व्यवसाय करू लागले. आशा वेळी आजोबा समाज बांधवांच्या जाणीवेतुन वाडा, ता. खेड येथे स्थाईक झाले. ते सन 1940 च वर्ष होते. याच वाडा गावात वडिल गोविंदरावांचा जन्म झाला. चुलते ड्रायव्हींग करीत होते तर वडिलांनी लाँड्रीचा व्यवसाय सुरू केला. कमी भांडवलावर हा व्यवसाय कसे तरी घर चालवत होता. कसेतरी यासाठी की घराची अबाळ लहान असताना पहात होतो.
भिमाशंकर परिसरातील भिमा नदी काठचे गाव डोंगर दर्यातील गावांना हीच बाजरपेठ होती. त्यामुळे माणसांचा वावर मोठा मी ही लहान पणी वडिलांना हातभार लावण्यासाठी चणे फुटाणे, भाजक्या शेंंगा, ओले हारभारे, गोळ्या, बिस्कीटे विकु लागलो. स्टँडवर एस.टी. येताच त्या गाडीत जरा समाधानकार विक्री होत होती त्यावर घर चालत आसे. शाळा भरण्यापुर्वी शाळांना सुट्टी असेल तेंव्हा हाच उद्योग करीत असे. यातुन घरात चार पैसे जात. यातूनच माझा शाळेचा खर्च भागवत आसे. राधेशाम गुप्ताने माझी गरज व हुशारी पाहिली. त्यांने रोज 3 रूपये रोजावर कामावर बोलवले. काम काय करावयाचे तर त्याने बनवलेले सामोसे मोजुन घ्यायचे ते विक्री करावयाचे. उन्हाळ्यात त्याने बनवलेली कुर्ल्फी विकायची आसे करित करित 4 वर्षे गेली मोठा झालो. सायकल चालवता येऊ लागली या सायकलवर डबा बांधुन वाडा गावात व वाड्या व स्त्यावर कुल्फी विकु लागलो. रोधश्याम गुप्ता मला या साठी रोज 7 ते 10 रुपये देत होते. घराला घर पण येत होते. आशाच ओढाताणीत 12 वी पर्यंत शिक्षण खेड येथे पुर्ण केले. पोटाचा प्रश्न मिटवत मिटवत खेड येथे जाऊन बी.कॉम. परिक्षा पास झालो. वाडा जवळील धोंडीभाऊ वाडेकर यांची शेती संभळावयास घेतली. धंद्याचे गणीत समजुन घेतलेले होते. आई गावात धुनी भांडी करीत होती. तीचे हाल पाहवत नव्हते. तेंव्हा मग वडा पावाची गाडी लावली. आई, बहिण व मी वडापाव बनवणे, शेंगा भाजणे हा उद्योग करू लागलो यातुनच मिळेल तेंव्हा कॉलेज शिकू लागलो. शिक्षणा शिवाय पर्याय नाही ही खुणगाठ मनाला नवी चैतन्य देत होती. यामुळे मंचर येथे जाऊन एम.कॉम. पास झालो. शिक्षणाने नवी क्षितीजे दिसू लागली. यामुळेच पुणे येथे सॅनेटरी इन्स्पेक्टरचा अभ्यासक्रम पुर्ण केला. नोकरी हमखास मिळणार हि आशा निर्माण झाली. परंतु नोकरी साठी लाखो रुपये द्यावे लागतात हे घास तोंडा जवळ आला तेंव्हा समजले. ते देण्यास पैसे नव्हते मग नोकरी मिळुच शकली नाही पण निराश झाले नाही मागे सरलो नाही उलट त्यावर ही आक्रमण करू लागलो. दिलीप पांडुरंग वांबरे हे संबंधीत बांधव पिअरलेस मध्ये काम करीत होते. मार्केटींग मध्ये उभे होते. त्यांच्या बरोबर जोडीदार म्हणून काम करू लागलो. या नव्या क्षेत्रात अनुभव घेऊ लागलो. नोकरीचा ठरावीक तासापेक्षा ठरावीक पैसा पेक्षा इथे भरपुर काम भरपुर पैसा हे सुत्र समजुन आले. याच अनुभवाच्या शिदोरीवर हॉलिडे क्लब मेंबर शिप मध्ये सहभागी झालो. या सहभागातून जीवनाला नवी दिशा मिळाली नवी क्षतीजे कवेत आली. कामाची खान उपासता उपासता दामाची खान ही सापडली.
वडिलांनी लाँड्रीचा व्यवसाय करावा यात भागत नाही म्हणुन आईने गावात धुणे भांडी करावी . कळु लागले तेंव्हा शेंगा हरबरे विकावेत राधेश्या गुप्ताकडे रोजंदारीवर काम करावे. सामोसे, कुल्फी विकावी ही कामे खानविलकरांनी केली. पण संस्कारक्षम वयात हे करत असताना मुळात घउू लागले. माणुस वाचु लागले. आपले विचार समोरच्याला पटवुन देऊ लागले. कोणत्याही व्यवसायाचे हेच मुळ गणीत आहे. तुम्ही तुमच्या व्यवसयाची बारीक सारीक माहिती गोळा करुन उभे राहिलेत समोरच्याची गरज तुमची व्यवसायीक सेवा यांची सांगड घालने महत्वाचे आहे. हे खानविकलकर यांनी साध्य केले. म्हणुन वाड्याच्या एस.टी. स्टँडवर शेंगा - हरबरे विकणारे खानविलकर आर्थिक बाबत भक्कम होऊ शकले. ते एवढ्यावर स्थीर राहिले नाहीतर वाडा गावच्या ग्रामपंचायतीचे सलग दहा वर्ष ग्रा. पं. सदस्य ही राहिले आहे. भिमा शंकर गणेश मंडळाचे ते खजिनदार म्हणुन कार्यरथ आहेत. भिमा शंकर ग्रा. वि. स. पत संस्थेचे संचालक म्हणुन गावाचा विकास साध्य करित आहेत. खेड येथील जेष्ठ बांधव श्री. सत्यवान शेठ कहाणे, श्री. प्रदिप कर्पे, श्री. अनिल कहाणे यांच्या संपर्कात राहिल्या मुळे एक वेगळी विचाराची बैठक तयार झालेली. खेड तालुका तेली महासभा, पुणे जिल्हा पश्चिम तेली महासभा या संघटनेच्या उभारणीच्या कामात सहभाग यातुन सामाजीक जाणीव बळावत गेलेली.
वाडा ता. खेड येथील त्यांच्या टुमदार घराच्या पायर्या उतरताना मला प्रश्न पडला जीवनाची सुरवात शेगा, सामोसे, वडापाव विकत केली. आणी व्यवसायीक गणीते जवळ ठेऊन एक गरूड झेप घेतली हा अदर्श अंधारात चाचपडणार्या समाजातील युवकांना नक्कीच प्रेरणा दायी आहे.