अर्जुनराव मारुतीराव इंगळे, B.Sc. special Executive magistrate
सेकेटरी, तिळवण तेली समाज ट्रस्ट, अहमदनगर अर्जुन राव यांचा जन्म अहमदनगर येथे १८ मार्च १९३९ रोजी झाला. यांचे इंगळे घराणे हे अहमदनगर येथील तिळवण तेली समाजातील प्रसिद्ध व सुखवस्तु घराणे म्हणून ओळखले जाते. कै. काशिनाथ भिवसेन इंगळे तसेच कै. दशरथ व कै. बाबुराव इंगळे हे तीन बंधु या घराण्याचे आधार स्तंभ होत. लहान मोठ्या शंभर जणांचे असे आदर्शनीय एकत्र कुटुंब म्हणून इंगळे कुटूंबिय ओळखले जाते. अशा प्रतिष्ठित घराण्याचा वारसा अर्जुनराव इंगळे यांना लाभला आहे.
प्राथमिक शिक्षण अ. ए सोसायटीचे नवीन मराठी शाळेत झाल्या नंतर त्यानी माध्यमिक शिक्षणासाठी अ. ए सोसायटी हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला. शाळेत असतांना एक हुशार विद्यार्थी म्हणुन त्यांचा लौकीक होता. तसेच क्रिडा क्षेत्रातही त्यांनी नैपुण्य मिळविले होते. विशेषतः क्रिकेट, अॅथलेटिक्स व खोखो आणि कुस्ती हे त्यांचे आवडीचे खेळ होते याच वेळी झेंडीगेट तालमीत व्यायाम करुन अहमदनगर किल्ला येथे एक कुस्तीही केली. त्यावेळी होणार्या आंतर जिल्हा क्रिडास्पर्धेत मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत 100 मीटर धावणे तसेच 4X 100 रिले व खो खो या संघात त्यांचा 1956 - 57 मध्ये समावेश होता. त्याबद्दल त्यांना प्रशस्ती पत्रकेही मिळाली आहेत. 1957 साली इयत्ता अकरावीत सोसायटी हायस्कुलचे जनरल सेक्रेटरी म्हणुन त्यांची 2000 विद्यार्थ्यांतुन निवड झाली. येथुन पुढे त्यांना राजकारण व सर्वजनिक कामाची आवड निर्माण झाली. त्यांनी मेट्रीक परीक्षा विशेष प्राविण्यासह पास करून अहमदनगर कॉलेज मध्ये शास्त्र शाखेत प्रवेश घेतला कॉलेजमध्यें असताना दोन वर्ष ते कॉलेज जिमखान्याचे सेक्रेटरी ॅहणुन निवडुन आले होते. या काळात क्रिकेट मध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले व इंटर कॉलेज टुर्नामेंटस व पुणे युनिर्व्हसिटीच्या श्री देवधर ट्रॉफी मध्ये विशेष चमक दाखविली. 1963 ला ते पुणे युनिर्व्हसिटीतुन बी.एस.सी. ही शास्त्र शाखेची पदवी उर्तीर्ण झाले.
पुढे चिनी आक्रमणामुळे आपण सैनिकीपेशा स्विकारावा व ऑफीसर म्हणुन भारतीस सैन्य दलात जावे अशी इच्छा होती.. पण घरातील लोकांचे विरोधामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी भारतीय तोफखाना दलातील इंजिनिबरींग विभागात प्रवेश मिळविला. सहा वर्षे या विभागात त्यांनी अधिकारी म्हणुन काम केले. त्या निमित्ताने पुणे येथे C. I. A. मध्ये दोन वर्षे तसेच दिल्ली येि सुरक्षा दलाचे जबाबदार अधिकारी म्हणुन काम केले. दारूगोळा व शास्त्राचे या विषयातील नऊ कोर्स त्यांनी पुर्ण केले. व या शास्त्रातील तज्ञ म्हणुन ते ओळखले जाऊ लागले.
पुढे नोकरीचा राजीनामा दिला व आपल्या वडिलोपार्जित हॉएल, ट्रक वाहातुकीच्या व्यवसायात लक्ष घातले. व आतापर्यंत हे व्यवसाय ते करीत आहेत. राजकारणाची आवड असल्यामुळे अहमदनगर शहर युवक काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. व आपले राजकीय मार्गदशक मा. खा. यशवंतराव गडाख व स्नेही डी. एम. कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे काम सुरू केले. शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. युवक काँग्रेसची दिल्ली, मुंबई व गोहाटी (आसाम) येथील अधिवेशनात त्यांनी भाग घेतला. कै. संजय गांधी व माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी यांचेशी त्यांनी बर्यांच वेळा भेटी घेतल्या होत्या. युवक चळवळीत असताना नगर शकरात 3000 युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची मजबुत संघटना बांधली. आता ते शहर इंदिरा काँग्रेस उपाध्यक्ष म्हणुन काम करीत आहेत. त्यांच्या समाजसेवेचा गौरव म्हणुन महाराष्ट्र शासनाने त्यांची स्पेशल एक्सिक्युटीव्ह मॅलिस्ट्रेट (विशेष कार्यकारी दंडाधिकारी) या पदावर नेमणुक केली गेली 8 वर्षे ते या पदावर आहेत.
नगरमध्ये त्यांनी बर्याच संघटना स्थापन करण्यात पुढाकार घेतला. शहर हॉटेल हलवाई संघाचे सेक्रेटरी तसेच अहमदनगर जिल्हा ट्रक ऑनर्स व ट्रान्सपोर्ट असो वर सेक्रेटरी म्हणुनही त्यांनी काम केले. नगर शहरातील ट्रक ड्रायव्हर्स व क्लिनरची त्यांनी इंटकच्या मार्फत युनियन बांधली व त्या युनियनचे ते अध्यक्ष होते आताही ते नगर शहर इंदिा काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी म्हणुन काम करतात. तसेच कुशल संघटक म्हणुन ओळखले जातात.
एवढे सर्व करीत असतांना आपण ज्या तिळवण तेली समाजात जन्मलो त्या समाजाचे ऋण कांही अंशी फेडावे या तळमळीने त्यांनी समाजातील सर्व कामात भाग घेतला व गेली 7-8 वर्ष समाजाचे सेक्रेटरी म्हणुन उत्साहाने काम करीत आहेत. मागील वर्षाच्या समाजाच्या निवडणुकीत ते निवडुन आलेलेे आहेत. समाज बांधवाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांची सदैव धडपड चालु कसते. आपल्या वार्डातुनही त्यांचं काम चांगले असुन ते बरेच लोकप्रिय आहेत. त्यांच्या जनसंपर्कही फार मोठा आहे.