ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ? ( भाग 4) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
मनुस्मृतीच्या विचार वंशााची आपण चिरफाड करतोय. ती चिरफाड केली तरच आकाशाला गवसणी घालणारे संत संताजी समजणार आहेत. प्रथम एक सत्य घटना मांडतो. संत ज्ञानेश्वरांचे पालन कर्ते संत भोजलिंग काका त्यांची समाधी संत ज्ञानेश्वर समाधी जवळ आहे. आपण जी ज्ञानेश्वरी पवित्र समजुन जपतो. त्या । ज्ञानेश्वरीत काय काय बदल केले हा भाग इथे गौन मानून प्रथम वाटचाल करू. तर आपल्या सुखाला साथ देणारे दुःखाला वाचा फोडणारे संत ज्ञानेश्वर हे ब्राह्मणा जातीत जन्म घेऊन सुद्धा त्या वेळच्या संत नामदेवासह सर्व आठरा पगड जातीतील संतांनी संत ज्ञानेश्वरांना बहुजनातील एक मानले होते. कारण त्यांना सुद्धा मनुस्मृतीच्या विचार वंशांनी लाथाडले होते. आशा या ज्ञानेश्वरांचा संभाळ भोजलिंग काकांनी केला. ते मराडवाड्यातील होते. संत ज्ञानेश्वरांचे मुळ ही बीड जिल्ह्यशातील होते. ते दोघेही आळंदीत होते. लहान पणीच ज्ञानेश्वर आदी भावंडे उघड्यावर आली. मनुस्मृतीचे वंशज पोळत होते. आणि अशा वेळी मनुस्मृतीच्या वंशाजांच्या पायाखाली तुडवल्या जाणाऱ्या सुतार जातीत जन्मलेल्या भोजलिंग काकांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना आई वडिलांची माया दिली व ते काका झाले. या संत भोजलिंग एकाच्या समाधीवर आज जो बोर्ड आहे तो सुद्धा भोजलिंग काका व्यवसायाने सुतार होते. त्या काळात कोणता ब्राह्मण सुतारकी करत असेल हे सहज पटेल. पण इतिहास बदलणारी ही माणसे आपल्या सोईचे बोलतात सोईचे सांगतात. मतलबा साठी खोटे नाटे रचतात. संत ज्ञानेश्वर हे मोठे होते ह्या बद्दल दुमत नाही पण त्यांना मोठे करताना ते जातीची किंमत जरूर देता. संत या पदावर गेलेली जी संत नामदेव ते संत गाडगेबाबा या पर्यंतचे जे संत आहेत त्यांनी जात, भाषा, लिंग , धर्म यावर हाल्ले करित मानवता मांडली. पण त्यांच्या नंतर सुद्धा त्यांना जात लावली आहे. अगदी काल परवा पर्यंत संत संताजी महाराज न म्हणता संतू तेली म्हंटले जात होते. संत सावता माळी, संत गोरा कुंभार अशा सर्व संतांना जाती वाचक नाव देऊन त्या संतांना त्या जातीचे बनवुन ठेवले आहे. असे ही म्हणु शकतील की ज्या ज्या जातीने आपले संत हुडकले व त्यांना जातीचे बनविले. हे पूर्ण सत्य नाही. मनुस्मृती पूर्वीच नोंदी ठेवताना त्यांना जातीचे लेबल लावले आहे. आणि त्यामुळे संतांची मानवतेची ओळख पुसट होऊन त्या जातीची ओळख अधीक घट्ट झाली आहे.