कारंजा येथील श्री. संताजी क्रेडिट को-ऑप सोसायटी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, शाखा कारंजा व श्री. संताजी सांस्कृतिक व सेवा मंडळाचे संयुक्त विद्यमाने तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांची 396 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संताजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले.
त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक श्री. श्रीरामजी धांदे तर श्री. अरविंदजी चरडे, अध्यक्ष, संताजी क्रेडिट को-ऑप सोसायटी, कारंजा, श्री. राजेश काळबांडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, वर्धा जिल्हा, श्री. सुनिलजी वंजारी, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, शाखा कारंजा, श्री. शिरीषजी भांगे, माजी सरपंच, सौ. पार्वताबाई टुले, माजी सदस्या यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे संचालन श्री. रामेश्वरजी सरोदे तर श्री. राजेंद्रजी वंजारी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने सर्वश्री. सुदिपजी भांगे, रामेश्वरजी सराेदे, घनश्यामजी मेंघरे, भागवत लोखंडे, सोहन टुले, विनायक मेंघरे, पुरुषोत्तमजी वंजारी, विश्वनाथजी चाफले, सुमित बारई, प्रविण ढबाले, मारोतराव लोखंडे व इतर समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर अल्पोपहार व चहापाणी घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.