तेली गल्ली (गावकुसच्या) मासिकाच्या प्रारंभीच्या काळात ओळख पाळख नसतानाही बारामतीच्या अमराई आळीतले कै. जयप्रकाश किर्वे यांनी सहकार्याचा हात दिलेला. परंतु त्यांचे काही वर्षात निधन झालेले. त्यांचे चिरंजीव श्री. संभाजी जयप्रकाश किर्वे शाळेकरी विद्यार्थी होते. इ. 12 वीला बर्यापैकी मार्ग मिळाले. आता शिक्षण घ्यायचे ते सुद्धा इंजिनेरींगलाच जवळ मार्क असल्याने ते प्रवरा नगर येथे इंजिनरींग कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यास गेले. जवळच्या मार्कामुळे प्रवेश मिळालाच उलट शासकीय स्कॉलरशिपही मिळाली सर्व घराला आनंद झाला. आयुष्याची क्षितीजे रूंदवण्याची सुवर्णसंधी आली श्री. संभाजींनी शिक्षणात आघडी सुरू केली. परिक्षा जवळ येऊ लागली. आणी तोच वडील वारले महणुन समजले. घरी आले बाकी घरात सर्व लहान. शिक्षण घ्यावे तर व्यवसाय बंद करावा. चालु व्यवसायात मोठी उडी वडिलांनी घेतलेली. जवळ 13 लाख रूपये कर्ज कर्जाचे महिना यणारे व्याज. प्रत्येक दिवसाला कर्ज व्याजा सह वाढत होते. एक वेळ जवळच मालेगाव येथे प्रवेश घ्यावा शिक्षण पुर्ण करावे. परंतु घरात आई श्रिमती मंगला जयप्राकश यांनी फाटलेल्या आभाळाला टाके देण्याठी मुलाच्या पाटीमागे पर्वता सारख्या उभ्या राहिल्या साठी गाठेलल्या आज्जी कै कौशल्याबाई यांनी अनुभवाची सोबत दिली. सर्वांचे भाऊ श्री. हरिभाऊ पोटे हे नात्यातील नात्या बाहेरील शेकडो सोबत्यांना भाऊ झाले. आणी पोटची पोरगी आडचणीत असताना ते शांत कसे रहातील ? त्यांनी अडचणीचे डाेंंगर पार करण्यास सहकार्य केले.
संभाजींनी इंजिनेरींगचे शिक्षण सोडुन एरंडी, करंडी कुठे चिंच खरेदी करून आपले व्यवसायीक पण सिद्ध केले. महाराष्ट्र कावेत घेणारे श्री. सुनिल पोटे यांनी या पडत्या काळात सहकार्य ही केले. जेंव्हा प्रश्न मिटु लागले तेंव्हा ऑइल मिल सुर करून तेल बिया गाळप व्यवसायात उतरले. तेंव्हा पोटेंनी सहकार्य ही केले. याच जोडीला बारामती मार्केटयार्ड मध्ये एक गाळा घेऊन खरेदी विक्रीचा उद्योग सुरू केला. आडत व्यापारी म्हणुन जम ही बसवला. शिक्षण अपूर्ण राहिले पण बुद्धीमत्ता तेज चालणारी याच व्यवसायावर अवलंबुन न रहाता जशी परिस्थिती व समोर येईल त्या प्रमाणे त्या व्यवसायाला झोकून देऊन तो करणे. जमेल तसा हा व्यसाय पहात नव्या व्यवसायात उडी घेतली संभाजी यांना बांधकाम क्षेत्र हाक मारू लागले. जागा खरेदी विक्री बघु लागले. त्याच वेळी गरजुंना त्यांच्या हाक्काच्या निवार्या साठी किफातशीर दरात प्लॉट देऊ लागले त्याच जोडीला विश्वासाने बांधकाम ही करून देऊ लागले. जीवनाच्या वाटचालीत कवळ्या वयात सर्व जबाबदार्या सर्व संकटे समोर येताच त्या संकटांना ते मित्र समजुन वावरू लागले त्यामुळे संकटांना पळवु लागले. या सगळ्या धडपडीत लहान भाऊ ऋषीकेश हा वयाच्या 15 व्या वर्षा पासुन खांद्याला खांदा लावून लढत आहेत. त्यामुळे लढण्यास साथ सोबत मिळालेली आहे. त्यातूनच ही वाटचाल यशस्वी झाली आहे.
कै. जयप्रकाश किर्वे श्रद्धाळु होते. सामाजीक जाणीवेचे होते. त्यातुन वावरत होते. श्री. संभाजींनी तोच विचाराचा धागा पुढे चालविला. शनी मंदिराच्या जीर्णोद्धारात ते आघडीवर होते. बारामतीची साठवण तेली पंच मारूती मंदिर या मंदिराचे सलग 5 वर्षे ट्रस्टी होत. त्यांनी या साठवण असलेल्या संस्थेचे उपाध्यक्ष पद ही विश्वासाने संभाळलेले आहे. याच बारामती येथे श्री. संताजी महाराजांचा जन्म उत्सव यशस्वी पणे पार पाडला आहे. कोणाताही समाज म्हणजे मते असणार नव्हे तर समाज भेद नसावा ही त्यांची प्रणाली. आहे. त्याच प्रणालीतुन संघटन व समाजकाम करीत आहोत. सिद्धेश्वर मंदिर महाशिवरात्र महोत्सवाचे ते उपाध्यक्ष पद ही संभाळत आहेत. वारकरी संप्रदायाला ही मदत करित असतात.
उमेदीच्या काळात शिक्षणा पासुन दुर जावे लागले व्यवसयीक शिक्षण हे मिळवुन ते उभे राहिले. आज स्वतःच्या पायावर खंबीर उभे आहेत. वडिलांनी दिलेली दिशा व आईने डोंगर कोसळला तरी खंबीर पणे उभे रहाताना उपासलेले कष्ट म्हणजे आम्ही दोन्ही भावांनी चाललेली वाट हे ते नम्र पणे नमुद करतात त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.