सकाळी सकाळी उठाव आगदी झुंझरक पडायच्या दरम्यान दावणीचा बैल सोडावा. त्या बैलाला घानवडीत आनून त्याच्या खांद्यावर घाण्याचे ज्यू ठेवावे. खुंटीला अडकवलेली झापड त्याच्या डोळ्याला बांधावी घाण्यात करडी किंवा शेगा टाकून बैल घाणा घ्यावा ही हजारो वर्षाची परंपरा 1972 च्या दुष्काळा दरम्यान सगळेच बदल होत गेले. या बदलाला ना शासनाने आपले मानले नाही समाजपातळीवर या संकटाला तोंड दिले. या मुळे जगण्याचे प्रश्न कठिण होऊन बसले. हिच सोचनीय अवस्था मुरलीधर किर्वे यांच्या घरात वावरत होती. तेंव्हा त्यांनी आपल्या राजेंद्र या मुलाला जामगाव, ता. पारनेर इथे त्याच्या मामाकडे शाळे साठी पाठवले. या खेड गावात इ. 5 वी ते इ. 10 वी पर्यंत शिक्षण घेत होते. शिक्षण पुर्ण होताच पुढे काय हा घरात प्रश्न होताच बारामतीच्या मंडईत किंवा आजुबाजूच्या गावात जावुन बाजार करावा उत्पन्न ही तोकडे भांडवलही तोकडे ही कसरत एक वर्ष तरी ही करावी लागली. बारामतीतच श्री. हरीभाऊ पोटे काका होते. यांच्याकडे सन 1980 मध्ये कामाला लागले. पगार तरी किती फक्त 90 रुपये . हे 90 रुपये घराला गरजेचे होते. इथे तेल उत्पादनाचे नवे तंत्र समजुन घेता आले. नव्या ओळखी व श्री. पोटे यांचा विश्वास या बळावर दोन बहिणीचे लग्न लावले सहकार्याच्या बळावर खादी ग्रामोद्योग महामंडळाचे कर्ज काढले ते सुद्धा 15,700 रुपयाचे या बळावर इलेक्ट्रीक घाणा सुर केला तेल पेंड उत्पादन करू लागले. माल खरेदी स्वत:करु लागले उत्पादीत तेल पेंडीची विक्री ही करू लागले. आणि बरे दिवस येऊ लागले. डोक्यावर कर्ज नसल्याने सुखात झोप लागत होती. परंतु घरात रेखा ही अपंग बहिण होती. 1998 मध्ये वडील वारले. एक आधार संपला. भावाला शिक्षित केले आणि यामुळे तो बंँकेत नोकरी करुन सुस्थीर झाला. घर जुने होते ते घर बांधुन झाले तेंव्हा हा ही धंदा मोडीत निघला तेंव्हा रहात्या जागेत ऑइल मिल सुरू केली. मार्केट मधुन शेंग करडी सर्यफुल खरेदी करणे देण या बळावर आज ते स्वत: स्थीर आहेत. सौ. निर्मला राजेंद्र किर्व यांची सोबत महत्वाची मानतात.