खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.वकृत्व स्पर्धा दोन गटात असून स्पर्धेसाठी " संताजी महाराजांचा इतिहास " हा विषय असून स्पर्धकाने २ मिनिटांचा व्हिडिओ चित्रीकरण करून पाठवायचा आहे. स्पर्धा फक्त तेली समाजासाठी मर्यादित असून स्पर्धेसाठी तयार व्हिडिओ दिनांक ९ जानेवारी २०२१ पर्यंत पाठवायचे आहेत.
स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे १) स्पर्धेसाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी विद्यार्थी गट व विद्यार्थी नसलेल्या समाज बंधू-भगिनीं साठी खुला गट असे दोन गट आहेत. २) संताजी महाराजांचा इतिहास या विषयावर दोन मिनिटांचा व्हिडिओ चित्रित करून पाठवायचा आहे. ३) व्हिडिओ मधील स्पर्धकांचा फोटो व आवाज स्पष्ट असावा गोंधळ असू नये. ४) स्पर्धा फक्त तेली समाजासाठी मर्यादित आहे स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. ५) स्पर्धेत तेली समाजातील विद्यार्थी,मुले-मुली, स्त्री-पुरुष भाग घेऊ शकतात. विद्यार्थी गटात कोणत्याही इयत्तेतील अथवा महाविद्यालयीन विद्यार्थी समाविष्ट होतील. खुल्या गटासाठी वयाचे बंधन नाही. ६) दोन्ही गटांसाठी स्वतंत्र रित्या प्रथम रुपये ११०१/-द्वितीय रुपये ७५१/- तृतीय रुपये ५०१/- उत्तेजनार्थ २ प्रत्येकी रुपये ३०१/- याप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. ७) स्पर्धकांनी आपला व्हिडिओ तयार करून व्हाट्सअप द्वारा मोबाईल क्रमांक ९९२२५८९९९९ (कैलास आधार चौधरी) व ९५४५०४२७५४ रविंद्र जयराम चौधरी ह्या दोनपैकी एका नंबर वर पाठवावा. व्हिडिओ पाठवताना संपूर्ण नाव, पत्ता,कोणत्या गटासाठी व मोबाईल नंबर कळवावा. ८) व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख ९ जानेवारी २०२१ असून त्यानंतर आलेल्या व्हिडिओचा विचार केला जाणार नाही. ९)स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरणाच्या बाबत सविस्तर माहिती कळवली जाईल. स्पर्धेविषयी सर्व अधिकार आयोजकांकडे राहतील. १०) व्हिडिओ पाठवताना दिलेल्या विषयावर वक्तृत्व असावे. वरील नियम व अटींचे पालन करून तेली समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व समाज बंधू-भगिनींनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रविंद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी,नरेंद्र बारकु चौधरी,तुषार भिमराव चौधरी,गिरीष गुलाबराव चौधरी,भटू पुंडलिक नेरकर(कुसूंबा),नरेंद्र सुदाम चौधरी(शिरपूर),दिनेश अशोक चौधरी(शिरपूर),सुनिल हिराचंद चौधरी(शिंदखेडा),गणेश दिलीप चौधरी(पिंपळनेर) यांनी केले आहे.