बुर्हानगर येथे आज ही त्यांचे वंशज आहेत आजचे वंशज श्री. अर्जुन किसन भगत यांच्याशी चर्चा करित असताना काही एैतिहासीक घटना ही सांगितल्या बाळाजी भगत यांचा पराक्रमा प्रमाणे एक कथा ही प्रचलीत आहे. जानकोजी भगत आपला तेल घाना घेत होते. त्यांना मुल बाळ होत नव्हते. देवीला नवस बोलोवा हा विचार करून त्या रात्री झोपी गेले. गाढ झोपेत असताना एक लहान बालिका दिसली. ती जानकोजीच्या जवळ आली. ते मोठ्याने झोपेत ओरडत होते, ए अबिंके ए जागे होताच स्वप्न बायकोला सांगितले पण त्या सकाळी एक घटना घडली 7-8 वर्षाची एक मुलगी गावात कोठून तरी आली. आसाध्य रोगान ग्रासलेली त्यामुळे कोणच तिला जवळ करेना जानकोजी भगत दुपारी जेवणासाठी हात पाय धूत होते तोच लक्ष घराबाहेर ओट्यावर गेले. मुलीची चैकशी केली तेंव्हा मी अनाथ असुन. उपाशी पोटी टिरत आहे. रात्रीच्या स्वप्नातील परमेश्वराने हीच मुलगी पाठविली तर नाही ना तिलाच मुलगी मानुन आंघेळ घातली खरूज होती त्यावर करडीचे तेल व चुलितिल राख लावली. घरातील बाजरीची भाकरी व पेंडभाजीचे जेव.ण दिले दोघा नवरा बायकोच्या सेवेमुळे ती काही दिवसात रोग मुक्त झाली. तेव्हां गावातील सर्वांना गावाची वाटु लागली प्रेमाने तिचे नाव अंबा ठेवले सर्वजन अंबिके म्हणु लागले.
जानकोजी कष्टाळु होत. पण भांडवल नव्हते म्हणुन धंदा निट नव्हता पण छोट्या अंबिकेला हे बरे वाटेना गावाच्या सावकाराच्या स्वप्नात अंबिका गेली आणि त्याला सांगितले. तो सावकार सकाळी उठला पैसे व बैल घेऊन जानकोजीकडे आला, आणि जानकोजीचे दिवस बदलू लागले. गरीबी दुर झाली. थोड्या काळात बलाढ्य व्यापारी झाले. त्या काळातील रिवाजा प्रमाणे लग्नासाठी मागणी येऊ लागली ती रूपवान व तेजस्वी होती ही गोष्ट राज्याला समजली. त्यांने शिपाई पाठविलेत्या वेळी तिने सांगितले सांगा त्या राजाला, की तुझे बुर्हानगर र्निमनुष्य होईल हा माझा शााप आहे.
गाव रोगाने ग्रस्त झाले. जो तो गाव सोडु लागला लोक अंबिकेकडे आले तिने जगदंबेचे रूप धारण केले. बाळोजी समजुन चुकले. आपण जिला मुलगी म्हणुन वाढविले तीच साक्षात आई जगंदंबा आहे हे पाहुन आनंदाश्रू आले पण त्याच क्षणी अंबिका अर्दुश्य झाली. ते वेड्या सारखे फिरत तुळजापूरला आले भारती बुवांच्या मठात थांबुन अंबिकेची आठवण करू लागले. देवी भेटेना म्हणुन जीव देण्यासाठी उंचावन उडी कारणार. तोच मुलगी अंबिका प्रकट झाली. तिने जानकोजीचा हात धरला बाबा असे का करता काय हवे ते मागा अशी विनवणी केली. आई माझ्या सर्व इच्छा पुर्ण झाल्या आहेत, मात्र तुझी सेवा मला घडली तशी माझ्या पिढ्यान पिढ्या ती लाभावी हीच इच्छा आहे.
तु माझी सेवा करण्याचे म्हणत असशील तर तुम्ही पाठविलेल्या पलंगावर पाच दिवस मी निद्रा करेल व तु पाठविलेल्या पालखीवर बसुन मी सिम्मोलल्ंघन करेल असे म्हणून देवी अदृश्य झाली. (तेव्हांपासुन पालखी व पलंग निघु लागला ती प्रथा आजही अस्तित्वात आहे.)
त्या दिवसा पासुन पालखी तुळजापूरला जावू लगली हिंगणगावच्या पाटलांनी राहुरी येथे लोहार, सुतार याकडून पालखी बनविण्याची परंपरा सुरू केली आज ही तीच परंपरा सुर आहे. दुसर्या माीेस बुर्हानगरला येते दुसर्या दिवशी यात्रा भरते पुन्हा मग पालखी भिांगार येथे जाते तेथे पालखी पलंगाची भेट होते हा पलंग तेली समाजाचा असतो बाळाजीची बहिण हडकोबाई हिची मुले जात. आज त्यांचे वंशज घेऊन जातात.