सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जिंती टाकळी हे गाव. गावात व्यवसाय चालेना म्हणुन ते शोघ घेत बरड येथे आले. गावात तेल्याचे घर नव्हते गावात करडी पिक बर्यापैकी आल्या पावली गावी गेले गरजेचे समान व घरातला घाना गाडीत टाकून निघाले. प्रवासात बैलगाडी नादुरूस्त झाली. तरी त्यावर मात करीत बरडला आले. बरड येथे एक माळी समाजातील बांधवाची जागा घेऊन घाणा व्यवसाय सुरू केला. माल खरेदी गाळप व विक्री ते पाहु लागले धंद्याचा जम बसला. आणि प्रथम ती जागा खरेदी करुन व्यवसाय वाढवला व व्यवसायाची गणीत इतकी पक्की केली की तो व्यवसाय एकट्याला आवरेना म्हणुन त्यांनी परिस्थीतीला तोंड देत वावरणार्या अनेक बांधवांना बरड येथे घेऊन आले. त्यांना ही व्यवसायात उभे केले. ग्रामिण भागात एक तेली इतकी भरभराटी करु शकतो ही शक्यता फार कमी ठिकाणी समोर येते. त्यातुन अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागले. पण विचाराची बैठक पक्की वृत्ती धार्मिक बरड गाव पंढरीच्या वाटेवर असलेले त्यामुळे दोन वेळेच्या जेवणाला सोबत वारकर्याची असावी. ही इच्छा तसे वारकरी भेटत, जर नाहीच भेटले तर त्यांचा शिधा काढुन प्रथम ठेवत. आळंदीं त पंढरपुर मार्गावर आषाढी व कार्तीक वारीला वारकरी याच बरड गावातुन जातात. या मार्गावर बरड येथे मुक्काम पालखीचा आसतो अर्जुनशेठ यांनी आपल्या जीवनभर पालखीच्या मुक्कामा दिवशी पुर्ण पालखीलाच पोटभर जेवन दिले. हिंदु धर्मावर त्यांची निष्ठा त्यामुळे हिंदु धर्माचे शंकराचार्य ही त्यांची नोंद ठेवत असत नव्हे तर प्रत्यक्ष दौर्यात भेटत असत. ही एवढी वाटचाल अर्जुनशेठ चालु शकले होते. श्री. संत संताजी पालखी सोहळ्याचेे आधार स्तंभ होते. सुरूवात करताना त्यांचा असलेला प्रभाव हा पालखी सोहळ्यास उपोयोगी पडला ही बाब आज ही सर्व मान्य आहे.